अलिकडील शिक्षण फारच जड वाटतंय

  • 1.7k
  • 486

अलिकडील शिक्षण ; फारच जड वाटतंय? अलिकडील काळात शिक्षणाला फारच महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळंच ते कोणत्याही माध्यमातून का मिळेना. लोकं आपल्या पाल्यांना शिकवू लागले आहेत. त्यातच हा काळ स्पर्धेचा आहे व तो काळ स्पर्धेचा असल्यानं मुलांना दर्जेदार शिक्षण हवं आहे व असं दर्जेदार शिक्षण हे कॉन्व्हेंटलाच मिळतं असा कयास पालकांचा असल्यानं पालक वर्ग आपल्या पाल्यांना कॉन्व्हेंटला टाकत आहेत. दर्जेदार शिक्षण........ अपडेट झालेलं शिक्षण. ज्याला भविष्यवेधी शिक्षण असंच म्हणता येईल. परंतु ते शिक्षण विद्यार्थ्यांचा जीव घेते की काय? अशी भीती आज पालकांच्या मनात होवू घातली आहे. त्याला कारणंही तसंच आहे. ते कारण म्हणजे दप्तराचं ओझं व दुसरं कारण म्हणजे विद्यार्थ्यांना