देश सुसंस्कारी बनवायचा असेल तर.......

  • 1.4k
  • 480

देश सुसंस्कारी बनवायचाय, तर.......? अलिकडील काळात बालंकांच्या सुरक्षेला जास्त महत्व आहे. बालगुन्हेगारी ही वाढतच चालली आहे. ज्याची सुरुवात वयाच्या अगदी लहानपणापासूनच होते. मुलं लहान असतात. अगदी दोन तीन वर्षाची. त्यावेळेस त्या मुलांसमोर मायबाप घरी भांडत असतात. एकमेकांना शिव्याही देत असतात. त्यांना वाटत असते की माझं मुलांसमोर लहान आहे. त्याला काहीच कळत नाही अन् काही कळणारही नाही. तसं पाहता त्याचं वय लहान असतं. त्यामुळं त्याला काही कळतही नाही. परंतु तो आपला भ्रम असतो. त्याही वयात त्याला कळत असतं. वरील बाबतीत अशीही एक म्हण आहे की दिसतं तसं नसतं. म्हणूनच जग फसतं. ते अगदी खरं आहे. मुलांचा विकास हा गर्भ जेव्हा शरीरात