शेतकऱ्यांचाही सन्मान व्हावा

  • 1.6k
  • 483

*शेतकऱ्यांचाही सन्मान होण्याची गरज?* *अलिकडील काळात शेतकरी वर्गाला सन्मान मिळत नाही. त्यांची सतत हेळसांड केली जाते. त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. जरी तो उत्पादनकर्ता असला तरी. समजा त्यानं जर माल उत्पादीतच केला नाही तर सबंध जगच उपाशी राहिल वा उपासमारीनं तडपून मरेल यात शंका नाही.* शेतकरी जीवन. अतिशय दुःखाचं असतं शेतकरी जीवन. हे जीवन जो जगतो, त्यालाच कळत असतं. म्हणूनच आजचे शेतकरी आत्महत्या करु लागले आहेत. कारण अलिकडील काळात शेती ही परवडत नाही. त्याचं कारण आहे. शेतीत होत असलेलं नुकसान. शेतीत एवढं अतोनात नुकसान होत असतं की कोणीही शेती करायला पुढं येत नाही. शेतीत नुकसान होतं. कोणतं नुकसान होतं?