शिवबा माझ्या घरात नको

  • 3k
  • 1k

शिवबा माझ्या घरात नको आज आम्ही आमची मुलं जन्माला घालतो.त्यांना लहानाचे मोठे करतो.त्यांच्यासाठी स्वप्न पाहातो.कुणी डाँक्टर बनविण्याचे स्वप्न बघतात.तर कोणी आपल्या मुलाला इंजीनियर बनविण्याची स्वप्न पाहतात.पण कोणाला जर विचारलं की शिवबा बनवा तर मात्र बोबडी वळते.कारण शिवबा माझ्या घरात नको.तर दुस-याच्या घरात आम्हाला हवा आहे. शिवरायाबद्दल आमच्या मनात आदर आहे.पण खरंच आम्ही शिवबाला मानतो का?अन् मानत असेल तर आम्ही शिवबाला जन्म दिलाच पाहिजे.त्याला शिवबासारखं घडवलं पाहिजे.असा विचार कोणी करीत नाही.त्याने आदिलशाही,निजामशाही एवढंच नाही तर मोगल बादशाहीशी युद्ध करावं.त्या द-याखो-यातल्या वाटा शोधाव्या.मावळ्यांसोबत राहावे.जे मावळे कसेतरी राहात होते.काटक जरी असले तरी कोणाच्या पायात चप्पल नसायची.कोणी शेंबडं असायचं.कोणी नग्नही.अशा समस्त महार,मांग,चांभार,कुणबी,धानबी,रामोशी या सर्वच