अध्यात्म रामायण

  • 972
  • 270

अध्यात्म रामायण.पार्वतीदेवी महादेवांना म्हणाल्या मला आपल्याकडून श्रीरामचंद्रांची कथा ऐकायची आहे. महादेव म्हणाले मी तुला महान असे अध्यात्मरामायण सांगतो.तापत्रयाचे हरण करणारे असे अध्यात्मरामायण सावध चित्ताने ऐक.हे ऐकून भक्त अज्ञान मुलक भयापासून मुक्त होतो. एकदा रावण व इतर राक्षसांच्या त्रासामुळे पृथ्वी गायीचे रुप धारण करून देवता व मुनींना घेऊन ब्रह्मदेवांना भेटण्यास गेली व आपले दुःख सांगितले.ब्रह्मदेव या सर्वांना घेऊन क्षिरसागराच्या किनाऱ्यावर गेले व निर्मल भावनेने व भक्तिने भगवान विष्णूंची स्तोत्रांनी स्तुति केली. तेव्हा सहस्र सूर्यासमान तेजस्वी असे भगवान हरि पुर्व दिशेला प्रगट झाले. आभुषणे व कौस्तुभ मण्याच्या तेजाने सजलेले विष्णू ना पाहून ब्रह्मदेवांचे डोळे पण दिपले. शंख,गदा,चक्र ही आयुधे असलेले आणि सोनेरी