Majha Hoshil na re ? - 1 books and stories free download online pdf in Marathi

माझा होशील ना रे ? - 1

आगळी वेगळी प्रेम कथा...
 
भाग क्र: 1 ...
 
साथ ही तुझी जणु उन्हात गारवा !
सांग ना सख्या, तुझं सहवास लाभेल का?
 
लेखण : जयेश झोमटे.
 
त्यांना ही भावना असतात ,ती ही मांणसच आहेत! मग जग त्यांच्याकडे अस का पाहत? जस की कोणी वेड्या मांणसाकड़े पाहत आहे!
 
ती पन तुमच्यासारखीच मांणसच आहेत ना? आवाज कमी येतो म्हंणुन ती काय वेडी-कमी बुद्धी असलेली मांणस आहेत का? कानात सफेद वायर घालून ते जवळून गेल्यावर तूम्ही त्यांच्याकड़े पाहून हसता. का?
 
एकवेळ माणुस आंधळ्या मांणसावर दया करतो, त्याला अंध मांणसाची किव येते.-पन कानाने ऐकू कमी येणा-या मांणसांची टिंगळ टवाळी का केली जाते? का तर तूम्ही जे बोलत आहात ते त्यांना ऐकू जात नाही ! आणि ते बिचारे तुम्हाला काही बोलत नाहीत म्हंणुन का? मानवी युग इतक बदल्ल आहे पन त्यांची मानसिकता तीच आहे! असो !.
 
माझी ही कथा एक्शन,लव्ह आणि रॉमेन्सने भरलेली आहे. ह्या कथेत एका कानाने ऐकू कमी येणा-या युवकाला मी माझ्या कथेत हिरोच रोल दिल आहे-जे वाचून तुम्हाला नक्कीच आवड़ेल.अशी मी अशा करतो.कथेची धाटणी-मांडणी एकदम जगावेगळी आहे. वाचुन मजा येणार हा कथाकाराचा..शब्द आहे!
 
ह्या कथेतुन तुम्हाला काहीतरी नव शिकायला मिळेल. ह्या कथेत प्रेम काय असतं? त्यासहितच ह्या कमी ऐकू येणा-या मांणसांच्या भावना तुम्हाला समजतील! की ऐकू कमी येण, काय असत? त्यांना कोणी जेव्हा हसत तेव्हा कस वाटत? त्यांच्या भावना तुमच्या पर्यंत ही कथा पोहचवेल! ऽऽऽऽ
 
******
कथा सुरु...
 
भाग क्र:1
 
मुंबई अज्ञात क्रीकेट स्टेडीयम:
 
मुंबईच्या एका क्रीकेट स्टेडीयमवर ती मैच सुरु होती. गोल रिंगमध्ये,हिरव्या गवताची चादर पसरली होती. कडक मातीचा तो तपकीरी पिच, त्या पिचच्या बैटींग करणा-या बैटसमैनच्या जागेवर एक पंचवीस वर्षीय युवक, अंगात सफेद कपड़े , पायांतही सफेद बुट! डोक्यावर हेल्मेट होत. हातात ग्लोव्हज-आणि सीजनची बैट धरली होती. त्याच्या हेल्मेटच्या जाळ्यांमधून त्याचा बिनादाढीचा तुलतूलीत चेहरा ,टोकदार नाक-तीक्ष्ण घारे डोळे व दोन्ही कानांत दोन कानाच्या काळ्या मशीन घातलेल्या दिसत होत्या , आणि मशीनला जोडुन असलेले लहान हेडफोन्स कानात घातले होते! त्याच्या अंगात असलेल्या सफेद फुल् बाहीच्या टी-शर्टच्या पाठीवर 07 असा आकडा आणि इंग्रजीत नाव होत. जेय ( 07 SHRAVAN) हातात बैट पकडुन ती हवेत ठेवत त्याने एक कटाक्ष रिंगमध्ये चारही बाजुंना टाकला. कोणता प्लेयर कुठे उभा आहे ? कोणत्या बाजूने गैप आहे, जिथून चौकार-षटकार मारला जाऊ शकतो. रिंगणात एकूण अकरा खेळाडु होते.एक विकिट किपर ,
 
विकिट किपिर श्रेत्रातच दोन स्लिपर होते, एक डाव्या-दुसरा उज्वया बाजुला. पावर प्ले एरियात तिघे उभे होते. दोन जण उजव्या बाजूला-तर एक डाव्या बाजुला! उर्वरीत चारजण बाउंड्री एरीयात उभे होते.
 
दोन जणांनी उजवी बाजू धरली होती-तर आणखी दोन जणांनी डाव्या बाजूची जागा धरली होती. आणि उर्वरीत एक जण बॉलिंगसाठी सज्ज उभा होता. स्टेडीयमबाहेर एका काळ्या बोर्डवर सफेद अक्षरात मैचच स्कोर,विकेट,ओव्हरज , बैटसमनच नाव -स्कोर, आणि बॉलरच नाव दिसत होत.
 
"मुंबई दिनानाथ चौहान कॉलेज ग्रुप अ च स्कोर आहे . २०९ ! "
 
कमेंट्री करणारा तो तीन फुट उंचीचा युवक म्हंणाला. त्याचा आवाज पुर्णत स्टेडीयम मध्ये घुमत होता. बाकी कमेंट्रीवाले म्हंणजेच त्याच जोडीदार तो खुर्चीवर बसला होता पन हा गडी खुर्ची ऐवजी सफेद लाकडी टेबलावरच बस्तान मांडुन बसला होता. जस की तमाशा पाहायला आला आहे आणि समोर माईक चिल्लम धरावी तशी ओठांना लावली होती.त्याच्या बाजुला बसलेल्या कंमेंट्रीवाल्यानेही आपल तोंड उघडल. हा बोलतोय? मग आपण का गप्प बसाव!
 
"ह्यां ! २०९ !"दुसरा कंमेंट्रीवला अस म्हंणाला. जणू २०९ रन काहीच नव्हते त्यांच्यासाठी .तसा तो बुटका युवक काहीश्या वेगळ्याच नजरेने त्याच्याकड़े पाहू लागला.
 
"मुंबई दिनानाथ चौहान कॉलेज ग्रुप ब चे रन आहेत! " तो कमेंट्री करणारा एकक्षण थांबला त्याने दोन वेळा जिभल्या चाटल्या. आजुबाजुला सहज नजर फिरवली.
 
" किती रन आहेत ? ब वाल्या टिमच?" त्याने हलक्याच स्वरात विचारल कोणी ऐकू नये म्हंणुन! पन माईक मध्ये मात्र आवाज गुंजला तो सर्वीकड़े.
 
तसे पिचवरचे अ टीमचे प्लेयर दात काढत हसू लागले.
 
" स्कोरच लक्षात नाही मग टिम काय घंटा जिंकणार आहे? "तो बुटका दात काढत हसत माईक चिल्लम सारख तोंडाला लावत म्हंणाला.
 
" ए नीट बोल! " तो दूसरा कमेंट्रीवाला खुर्चीवरुन उठला,त्याची उंची पाच फुट होती. आणि हा दुसरा तीन फुट, मगहा सुद्धा टेबलावरच उभा राहिला तस दोघांचे डोके एकमेकांना स्पर्श करु लागले.
 
" ए..ऽऽऽऽऽऽ"
 
" एऽऽऽऽऽऽऽऽ" दोघेही दोघांचा स्वर उंच ठेवण्याचा प्रयत्न करत ओरडत होते. हाच आवाज माईक मुळे पुर्णत स्टेडीयमवर गुंजत होता.
 
फुकटचा शो सुरु झाला होता. ग्रुप ब च्या टिम प्लेयर्स एक ठिकाणी उभे होते. नऊ प्लेयर्स आणि उर्वरीत त्यांचा एक कोच ! त्यांच नाव रघुनाथ वय ४६ , ते क्रिकेटचे कोच होते. सर्व त्यांना रघूसर म्हंणायचे.
 
"अरे काय आहे हे ? का भांडतायेत ही दोघ नेहमीप्रमाणे !" रघुसर उभे राहून चाळीस पावलांवर उभ्या त्या मंडपात असलेल्या कंमेंट्रीवाल्या मुलांकड़े पाहत म्हंणाले.
 
" सर !"एक मुलगा उभा राहिला, कुरळे केस, जाड भुवया, नवीनव उगवलेली दाढी- त्यांच नाव शंभुराज देसाई उर्फ शंभू !
 
"हं काय?" रघुनाथसरांनी विचारल. ते अद्याप त्या दोघांच भांडणच पाहत होते.
 
" सर टाईम निघुन चाललंय! मैच ऑफ़ व्हायला फ़क्त पंधरा मिनीटे शिल्लक आहेत. आणि मैच जिंकण्यासाठी फ़क्त सहा रन्स हवे आहेत.
 
सो समजतय का तुम्हाला?" शंभू म्हंणाला.
 
"ओह हो, म्हंणजे ही नाटक सुरु आहेत की काय? " रघुनाथसरांनी मागे वळून पाहिल.
 
"येस सर !" शंभू पटकन म्हंणाला. त्याने तेवढ्यात एक जाडजूड छडी-काढली. छडी नको हो दांडूकच म्हंणुयात दांडुक! कारण छडी कशी पातळसर असते, आणि हा रॉड सारखा काहीतरी उसासाचा तुकडा भासत होता.
 
" ए पेन-टोपनऽऽऽऽऽ" सर मोठेनेच ओरडले ( पेन म्हंणजे तो उंच मुलगा-टोपन म्हंणजे, तो बुटका मुलगा) सरांच्या आवाजाने त्या दोघा कंमेंट्रीवाल्यांनी मागे वळून पाहिल. त्यांना रघुसर हातात दांडूक घेऊन
घालू का डोक्यात अशी रीऐक्शन करताना दिसले.
 
"बस बस्स ! म्हातारा पिसाळला ."तो बुटका युवक हळकेच पुटपुटला . तसे दोघेही मूग गिळून असे बसले जस काही झालंच नाही .
 
"तर कुठे होतो मी?" तो दुसरा कंमेंट्रीवाला माईकमध्ये तोंड खुपसत निर्लज्जपणाचा आव आणत म्हंटला. मग एकदम लक्षात आल्यासारख करत.
 
"हं ऽऽऽ!स्कोर- तर ग्रुप ब चे स्कोर आहे 203 रन्स 9 विकेट. आणि मैच ऑफ़ व्हायला फ़क्त दहा मिनीटे उरलेत. जर एक विकेट पडल तर अ जिंकेल आणि जर सिक्स पडल तर ब! " त्या कंमेंट्रीवाल्याने पिचकड़े पाहिल. मैच पुन्हा सुरु झाली होती. पंचांपासुन बारा पावलांवर एक बॉलर उभा होता. त्याच्याही अंगावर तेच सफेद कपड़े होते. पाठीवर 150 SAJIT अस नाव होत. उंचीने साडे पाचफुट.
 
डोक्यावरचे केस जेल लावून उभे होते-खाली रुंद कपाळ, वी आकाराचा चेहरा . त्याच्या चेह-यावर उद्धट -गर्विष्टपणा जणु छापल्यासारखा वाटत होता.
 
" सजित ब्रॉ फास्ट ! विकेट हवाय!" एक प्लेयर त्याचा आत्मविश्वास वाढवत म्हंणाला. (तो नक्कीच त्याचा मित्र असावा!) सजितने फक्त हसत होकारार्थी मान हलवली.व एक रागीट कटाक्ष थेट समोर उभ्या बैटसमैनवर टाकला. मग जिभ तोंडातूनच गालावरुन फिरवत "थु " आवाज करत थुंकला. श्रवणने ते आपल्या जाल्यांच्या हेल्मेटमधुन पाहिल, परंतु काहीही बोलला किंवा, तिरस्कार युक्त प्रति टिप्पणी , कृती केली नाही. गर्विष्टबापाच्या एकुलत्या एक मुलाची वागणुक श्रवण बाळासारखी थोडीना अशणार? आणि ह्या कलियुगात तरी ते असंभव आहे.
 
बैटींग मध्ये श्रवण हा उजवा होता. तो आपल्या पॉजिशनमध्ये उभा राहिला. दोन्ही हातांत बैट धरुन ती दोनवेळा जमिनीवर(टक,टक आवाज देत ) आपटली.
 
तेवढ्यात. तिच्या गो-यापान हातातल्या लाल-निल्या बांगड्या खण,खणल्या - आकाशातल्या सुर्याची किरणे त्या काचेच्या बांगड्यांवर
 
पडली, त्या बांगड्यांच्या काचेवर पडलेली किरणे, आरशी वठवत लाल- निळ्सर प्रकाश फेकत श्रवणच्या डोळ्यांवर पडली. बूस्ट वॉल्यूम वर ठेवलेल्या कानांच्या मशीनमध्ये तो बांगड्यांचा खण-खणनारा आवाज झाला. श्रवणचे डोळे त्या आवाज व उजेडाच्या दिशेने संमोहीत झाल्यासारखे फिरले.
 
आजुबाजुला सर्वकाही मंद गतीने घडत होत. सुक्ष्म वेळ,काळ जणु सेकंद -मिनिट- काटा तासकाट्याच्या गतीने धावत होता. श्रवणने एक कटाक्ष सरळ थेट बाउंड्री लाईन पल्याड- ग्रुप अ च्या टिम मेंबर्सच्या चमूवर टाकला.तिथेच ती आणि तिची मैत्रिण उभी होती.तिला पाहताच त्याच्या डोक्यात झणत्कार झाला, हजारो-लाखो आनंदीत धुळीकणांचा स्फोट त्याच्या मनात फुटला. तीची गोरीपान मोहित त्वचा, तिने अंगावर निळसर रंगाचा घागरा चोली घातला होता.त्या घागरा चोलिवर फुलांच्या,मोराच्या पिसांच्या डिझाईन आणि काही मोती अडकवले होते. जे उन्हाच्या प्रकाशाने ही-या-नाण्यांसारखे चमकत होते. साडेचार फुट उंचीची ती गोरिपान परी-तिच्या त्या गो-यापान देहावर तो घागरा आणि चोली कसला रापचिक दिसत होता. श्रवण नूसता तिच्या चेह-याकड़े पाहतच राहिलेला .. दुधासारखा गोल गोरा चेहरा , बारीक कपाळ,डोक्यावरचे केस फिकट ब्राऊन कलरने रंगवले होते. कपाळामधोमध एक काळसर बिंदू एवढी टिकली होती, टपो-या काळसर डोळ्यांच्या पापण्यांवर तपकीरी रंगाचा सुरमा घातला होता..गोबरे गोबरे गाल पिठासारखे मऊ होते - ओठांवर लालसर स्ट्रॉबेरीज फ्लेवर लिपस्टीक लावली होती, ज्या ओठांमधुन स्ट्रॉबेरीच सुगंधीत वास येत होता.कानांत झुमके घातले होते आणि गल्यात एक महागडा हार-ज्याच्या मधोमध निळसर हिरा होता. श्रवण अगदी मंदावल्या सारखा तिच्याकड़े पाहत होता. नकळत त्याच्या ओठांच्या पापण्या बाजुला सारल्या व तोंडातले पांढरेशुभ्र दात बाहेर आले
 
ते हसू तिला पाहून बाहेर आल होत- (जेव्हा आपण तरुनपणात प्रवेश करतो , ! आपल्याला प्रेम काय असतं ? ते कस करतात ? काहीच माहीती नसत ! प्रेमा बद्दल आपल्याला काहीही ठाऊक नसत . त्याच वेळेस आपण एका व्यक्तिला पाहतो- त्याक्षणाला त्या व्यक्तिकड़े पाहून नकळत आपलें शरीरातले आनंदीत हार्मोन्स चटकन उत्तेजित होतात , शरीर स्वत:हाच मग पुढील क्रिया करतो. आपल तोंड उघडत दात बाहेर येतात ! किंवा ओठांवर हसु तरळत.- त्या व्यक्तिला पाहुन जेव्हा. मनमोकळेणाच हसू बाहेर पडत ना?
 
(उसीको प्यार बोलते है दोस्त) सरळ सोप्या भाषेत बोलायचं तर लव्हस्माईल!) जी आपल्या नकळत बाहेर पडते आणि आपल्याला समजतही नाही की आपन किती उशिर असंच त्या व्यक्तिकड़े पाहुन हसत आहोत.
 
श्रवण सोबत ही तेच होत होत ना? एका मंद-बधीर , मांणसासारखा तो एकटक त्या निळ्सर घागरा चोली घातलेल्या मुलीकड़े हसत पाहत होता! हे बर झाल की त्याच्या डोक्यावर हेल्मेट होत नाही तर सर्वजन त्याला वेडाच म्हंणाले असते,आणि दुसर म्हंणजे.
 
"आरे काय करतोय हा? असं ढम्म्या वाणी का उभा आहे! " रघुसरांनी श्रवणकड़े पाहिल. तो त्याच्या नेहमीच्या पॉजिशनमध्ये उभा नव्हता. पाठ सरळ होती, बैट हाती पकडली होती पन ती पॉजिशन त्याची नव्हती. तो खेळण्यासाठी तैयार नव्हता. शंभूनेही ते ओळखल होत.
 
इकडुन बॉलर सजितने धावायला सुरुवात केली.
 
" अरे बापरे ! अरे थांबवा कोणीतरी बॉलरला. ए श्रवणऽऽऽऽऽ, ए श्रव्याऽऽऽ!" शंभूने एक मोठी आरोळी ठोकली- पन श्रवण?तो मात्र हरवला होता. तिच्या रूपावर फिदा झाला होता. त्याला उभ्या-उभ्याच सामाण्य माणसांना उन्हात ह्दयाचा तीव्र एटैक येतो-पन श्रवणला लव्ह एटैक आला होता.
 
"श्रवण ऽऽऽऽऽ! श्रीऽऽऽऽऽऽऽ! अरे बॉल बघ बॉल...!" शंभू हात हळवत त्याच लक्ष स्व्त:कड़े खेचण्याचानिष्फळ प्रयत्न करु लागला पन काही फायदा होत नव्हता. धप्प,धप्प आवाज देत माती हवेत ऊडवत सजित वेगाने स्टम्पस पर्यंत पोहचला - व जस पोहचला त्याने स्टंम्पपासुन दोन फुट दूरुनच..हवेत एक उडी घेतली. दुसरा पाय नॉ बॉलच्या रेषेपासून मागे टाकत त्याने उज्वया हातात असलेला बॉल वेगाने पुढे भिरकावला. तपकीरी कडक पिचवर तो लालसर सिजनचा चेंडु हवेतुन गोल गोल भिंगत खाली येत कडक जमिनीवर आदळला आणि
 
तिप्पट वेगाने बाऊंस झाला. रघुसर-शंभू बाकी टीमचेही छातीत श्वास अडकले. श्रवण एकटक हसत तिच्याकड़ेच पाहत होता. तेवढयात तो बॉल येऊन टॉक आवाज करत त्याच्या हेल्मेटवर बसला. श्रवणच्या हातून बैट सुटली तोच उजवा हात छातीवर आला, ओठांवर एक मंद हसू तरळल जात ( ओम शांती ओम शाहरुन खान प्रमाने तो) ! मंदगतीने मागे मागे पडु लागला , व तिन्ही स्ट्ंम्पवर तो पडलाही, पंचाने एक बोट वर केल " आऊट " !
 
जिंकल्याने विरूद्ध अ टिम घोड्यासारखे उड्या मारु लागले. ती ही तीचा घागरा दोन्ही हातांत पकडुन,हसत उड्या मारत होती. जणु ती अ टीम मेंबर्सला प्रोत्साहन देत होती.जमिनीवर पडलेला श्रवण मात्र छातीवर हात ठेवून मंद स्मित हास्य करत तिच्या आकृतीकड़े वेडावल्यासारखा -लव्ह एटैक आला जात पाहत होता..मग मग हलु हलू त्याच्या डोळ्यांच्या पापण्या ब्लर दृष्यासहित मिटल्या गेल्या.
 
" उचला रे उचला.... म्ह्ढ उचला!
 
श्रवणच्या बंद डोळ्यांमागून कानांत आवाज घुमला.
 
क्रमश:..
 
 
पुढील भाग लवकरच !