Is the Lord Jesus not the Son of God? books and stories free download online pdf in Marathi

प्रभू येशू देवाचा पुत्र नाही?

प्रभू येशू देवाचा पुत्र नाही. प्रत्यक्ष.........

प्रभू येशू जन्मास आले ते देवाचा एक पुत्र म्हणून ज्यानं सर्व जगाचा उद्धार केला. ते देवाचे पुत्र जरी असले तरी ते आजच्या काळात देवच वाटतात असं म्हटल्यास आतिशयोक्ती ठरणार नाही.
प्रभू येशूचा जन्म हा गव्हाणीत झाला असं म्हटलं जातं. त्यावेळेस धरणीवर संबंध अन्याय अत्याचार माजला होता व जनतेवर अनन्वीत अत्याचार सुरु होते. अशावेळेस लोकं देवाचा धावा करीत होते. म्हटलं जातं की ती लोकांची आर्त हाक प्रत्यक्षपणे देवानं ऐकली व प्रभू येशूचा जन्म झाला.
प्रभू येशूच्या जन्माच्या वेळेस त्याची आई मरीयम गरोदर होती अशावेळेस फर्मान निघालं की रहिवासी दाखला हवा. तसा तो दाखला मिळविण्यासाठी मरीयम आपल्या पतीसोबत त्याच्या जन्मगावी जात होती. तिला दिवस भरतच आले होते.
तो रस्ता मुळातच दगडधोंड्यांचाच होता. त्रास होतच होता. तसा त्रास सहन करुन व जीवाचा वैताग करुन ते दांपत्य जात होते. तोच तिच्यानं चालणं होत नव्हतं. अशावेळी प्रभू येशूच्या वडीलानं गावात कमरा शोधला. परंतु तो त्याला न मिळाल्यानं त्यांनी त्यावेळेस तात्पुरत्या स्वरूपात मिळालेल्या गव्हाणीत आसरा घेतला व इथंच प्रभू येशूचा जन्म झाला.
म्हणतात की ज्यावेळेस प्रभू येशूचा जन्म झाला. त्यावेळेस आकाशवाणी झाली व त्या आकाशातील देवदुतानं म्हटलं की आपण येथेच जवळपास असलेल्या गावात जा. तेथे देवाच्या पुत्रानं जन्म घेतला आहे. तुम्ही तेथे जा व देवाचे आभार माना. तसंच ज्या मातेनं जन्म दिला देवाच्या पुत्राला. त्या मातेलाही धन्यवाद द्या.
ती आकाशवाणी व तो आवाज अंतर्धान पावला. तोच ती मेंढपाळ मंडळी खरंच ती आकाशवाणी खरी आहे का? हे पडताळून पाहण्यासाठी त्या गावात आले. त्यांना तसं पाहता आश्चर्य वाटतच होतं. तसा त्यांनी गव्हाणीचा शोध लावला. त्यातच त्यांना ती गव्हाणी सापडली. तिथं एका स्रीनं एका गोंडस बाळाला जन्म दिला होता.
मेंढपाळ तिथं गेले. त्यांनी बापाला पाहिलं. तसं त्यांना आश्चर्य वाटत होतं. कारण ती आकाशवाणी सत्य झाली होती. परंतु एक समस्या उत्पन्न झाली होती की असं कसं होवू शकते? परंतु काहीही असो त्यांनी आकाशवाणीवर व त्या बोलण्यावर विश्वास ठेवला व त्यानंतर त्यांनी ती गोष्ट मरीयमला सांगीतली. तिला धन्यवाद दिलं व ते रवाना झाले.
मरीयमनं या आपल्या पुत्राचं नाव येशू ठेवलं. पुढं तो दहा वर्षाचा होताच त्याला सोडलं व तो स्वतःच लहानाचा मोठा होवू लागला. त्याला भय वाटत नव्हतं. कारण तो देवाचा पुत्र होता. अशातच त्याची परीक्षा घेण्यासाठी की काय, शैतानांनी त्यांना छळलं. परंतु त्यातूनही प्रभू येशू तरुण निघाले व ते ज्ञानी बनले. प्रभू येशूचा बातिस्मा होताच ते लोकांना ज्ञानदान करु लागले. उपदेश देवू लागले. सत्य काय हे सांगू लागले. त्यांनी खरं तर लोकांचं वागणं अभ्यासलं. त्या वागण्यावर आक्रोश व्यक्त केला. तसं वागू नये असं सांगीतलं. प्रतिपादनही केलं. तसं पाहता ते लोकांना सांगत असतांना लोकं काही ऐकत नव्हते. त्यामुळंच त्यांनी प्रत्यक्ष परमेश्वराला विनंती केली की त्या परेश्वरांनी त्यांचं कृत्य पाहावं व त्यांच्या वाईट कृत्याला त्यानं माफ करावं. त्याचं कारणही येशू देवांना सांगायचे की ते नादान आहेत. त्यांना कळत नाही की ते कोणतं कृत्य करतात?
प्रभू येशूचं असं वागणं. पदोपदी विचार देणं. नवीन नवीन विचार प्रसवणं. यावरुन हे दिसून येते की ते हिंसक नसावेत. त्यांना हिंसा आवडत नसावी. तसेच ते सत्य बोलत असावेत. त्यांच्या ठायी कुटकुट सहनशिलता भरलेली असावी व ते क्रुर नसावेत. त्यांनी क्रुरता सांगीतलेली नसावी व हा धर्म पवित्र असावा. कारण हा धर्म प्रभू येशूच्या तत्वानुसार शांतता प्रस्थापित करणाराच वाटतो. कारण प्रत्येक कर्माची माफी आहे त्यात. प्रभू येशू स्वतःच माफी मागत फिरतो. त्यांच्या निदर्शनास आलेले लोकं वाईट कृत्य करतात. तरीही त्यांच्यावर ते न रागवता प्रत्यक्ष देवाला ते त्यांचा प्रतिनिधी बनून माफी मागतात व क्षमा करायला लावतात. ते म्हणतात की हे परमेश्वरा तू यांनाआता माफ कर. ते नादान आहेत जेव्हा ते नादानपणातून बाहेर येतील. तेव्हा प्रत्यक्ष त्यांना आपली चूक कबूल व ते त्यानंतर पापच करणार नाहीत.
पाप पुण्यावर आधारीत असलेलं हे ख्रिश्चन धर्माचं तत्वज्ञान. त्याचा मार्गदर्शन करणारा प्रभू येशू. त्यांनाही लोकांनी आपल्या वाईट विचारानं घेरलं. त्यांना क्रुसावर चढवलं. बेड्या टाकल्या व तो क्रुस गाडून त्यांना हवेत तरंगत ठेवलं.
ते रक्तबंबाळ हात. त्यातच ते वेदनादायी त्यांचं शरीर. तरीही येशूच्या मनात संताप तो नव्हताच. त्यानंतर बरंच रक्त शरीरातून वाहून गेलं. दिवसभर जेवन नाही. पाणी नाही. त्यातच सकाळी तो क्रुस त्यांच्या खांद्यावर होता. तो त्यांनीच वाहून आणला होता. त्यामुळंच शरीर अशक्त पडलं होतं. तसं त्यांच्याजवळ कोणीच नव्हतं. ज्यावेळेस त्यांना शैतानांनी पकडलं होतं व क्रुसावर चढवलं होतं. कारण लोकांना भीती होती की आपलेही हाल असेच करतील. जर आपण येशूंना क्रुसावर चढवीत असतांना विरोध केला तर........
सायंकाळ होत आली होती. येशूंना क्रुसावर चढविल्यानंतर ते काही वेगानं बेशुद्धच झाले होते. काही वेळानंतर ते जेव्हा होश मध्ये आले, तेव्हा काही जवळची मंडळी तिथं समोर बसली होती. त्यांच्या होशमध्ये येण्याची जणू ते वाट पाहात होते. त्यांना क्रुसावरुन काढण्यात आलं होतं. अशातच येशू होशात आले व म्हणाले, " मी आता मरणार आहे. मला गाडू नका. मला असेच तीन दिवस ठेवा. मी तीन दिवसानं पुन्हा जीवंत होणार आहे व असाच स्वर्गात जाणार आहे. मला माझ्यासोबत या लोकांनी जे काही केलं. त्यांच्या कृत्याची माफी प्रत्यक्षात परमेश्वराजवळ मागायची आहे. याचा अर्थ असा नाही की मी कायमचा जात आहे. कधी ना कधी मी पुन्हा जन्म घेणार. जेव्हा हे लोकं सुधरतील आणि तो जन्म घेतांना मी प्रत्यक्ष देवाचा पुत्र बनूनच जन्म घेणार व सोबतीला माझ्या पित्यालाही आणणार.
ते प्रभू येशूचे बोल. त्यानंतर त्यांचं प्रेत बर्फात सुरक्षीत ठिकाणी ठेवण्यात आलं व त्या प्रेताजवळ पहारा ठेवण्यात आला. परंतु तशी ती रात्र उजळली व पहारेक-यांना तीन दिवसाच्या जागरणानंतर ते बोलणं थोतांड वाटून डोळा लागला. तोच पहाट झाली व पहाटे पहाटे सर्वजण झोपलेले असतांना येशू अचानक झोपेतून जागे झाल्यासारखे उठले व स्वर्गात जायला लागले. तोच त्याच समयी एक पहारेकरी उठला. त्यानं आकाशात लख्खं प्रकाश पाहिला व प्रत्यक्ष येशूला स्वर्गात जातांना पाहिलं. तसं त्यानं लोकांना जागं केलं व प्रत्यक्षात पाहिलेली घटना सांगीतली. तसा काहींनी विचार करुन येशूला बघितलं. परंतु ते पाहण्यापुर्वीच येशू दूर निघून गेले होते. फक्त त्यांची एक अंधूक आकृती तेवढी दिसत होती. तसा त्यांनी त्या पहारेक-यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. परंतु जेव्हा त्यांना तिथं येशूचं प्रेत दिसलं नाही. तेव्हा मात्र खरा विश्वास बसला होता.
आज प्रभू येशू नाहीत. येशू काळाच्या ओघात बरेच दूर गेले आहेत. फक्त त्यांचे उपदेश व ती शिकवण आज उरलेली आहे. मी परत येणार व येतांना मी माझ्या बापालाही सोबत आणणार. हे आजही लोकांच्या लक्षात आहे आणि मी येणार, जेव्हा हे लोकं सुधारणार. हेही लोकांच्या लक्षात आहे. त्यानंतर त्यांचे अनुयायी धर्माचा प्रसार करीत आहेत. प्रचारही करीत आहेत. काही नक्कीच सुधारले आहेत. कारण त्यांना नक्कीच वाटतं की प्रभू येशू नक्कीच येणार. त्यासाठी सुधारायला हवं. परंतु काही मात्र आजही सुधारणारे नाहीत असंच दिसतं. त्यांना न सुधारण्याचं कारण म्हणजे लोभ. अति लोभानं हानी होते म्हणतात. अशी हानी नंतर होवू लागली. त्यातच प्रभू येशूंना हिंसा चालत नसावी. परंतु पुढं धर्मातीत पुस्तकातच हिंसा शिरली. त्यांना व्याभीचार आवडत नव्हता. परंतु कालांतरानं जगात व्याभीचारही वाढला.
महत्वाचं सांगायचं म्हणजे ज्या गोष्टी येशूंना चालत नव्हत्या. त्या गोष्टी आम्ही नित्यनेमाने करतो. त्या करतांना आम्हाला प्रभू येशू दिसत नाहीत आणि जेव्हा आमची दुर्गती होते. तेव्हा आम्हाला येशू दिसतात हे बरोबर नाही. विशेष सांगायचं म्हणजे अशानं येशू येणारच नाही ना येणार त्यांचे वडील. कालपरत्वे त्यांना जर प्राप्त करायचेच असेल तर हिंसा सोडावी लागेल. मग प्राणीमात्रावरील हिंसा का असेना. संयम बाळगावा लागेल. चांगले वागावे लागेल. वाईट विचार त्यागावे लागतील आणि प्रत्येक चुकावर माफी मागण्याचीही सवय त्यागावीच लागेल. कारण नेहमी चुका करणे व प्रत्येकवेळेस माफी मागणे हेही प्रभू येशूंना अभिप्रेत नव्हते. एवढं जर आपण करु. तरंच प्रभू येशूंची प्राप्ती होईल यात शंका नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०