If you want to make the country civilized.... books and stories free download online pdf in Marathi

देश सुसंस्कारी बनवायचा असेल तर.......

देश सुसंस्कारी बनवायचाय, तर.......?

अलिकडील काळात बालंकांच्या सुरक्षेला जास्त महत्व आहे. बालगुन्हेगारी ही वाढतच चालली आहे. ज्याची सुरुवात वयाच्या अगदी लहानपणापासूनच होते.
मुलं लहान असतात. अगदी दोन तीन वर्षाची. त्यावेळेस त्या मुलांसमोर मायबाप घरी भांडत असतात. एकमेकांना शिव्याही देत असतात. त्यांना वाटत असते की माझं मुलांसमोर लहान आहे. त्याला काहीच कळत नाही अन् काही कळणारही नाही. तसं पाहता त्याचं वय लहान असतं. त्यामुळं त्याला काही कळतही नाही. परंतु तो आपला भ्रम असतो. त्याही वयात त्याला कळत असतं.
वरील बाबतीत अशीही एक म्हण आहे की दिसतं तसं नसतं. म्हणूनच जग फसतं. ते अगदी खरं आहे. मुलांचा विकास हा गर्भ जेव्हा शरीरात राहतो. तेव्हापासूनच होत असतो. त्या गर्भात बाळावर जसे संस्कार पडतात. तसा बाळ निपजतो. ती आई बाळ नऊ महिने पोटात असेपर्यंत जो जो आणि जसा जसा विचार करते, तसतसे गुण बाळाच्या अंगात उतरत असतात. याला गर्भसंस्कार असे देखील म्हणता येईल. तसं पाहिल्यास हे गर्भसंस्कार अतिशय महत्वाचे असे संस्कार असतात. याचाच अर्थ असा की जर या नऊ महिन्यात चांगले संस्कार जर त्या बाळाच्या गर्भावर झाले तर त्या मुलाला पुढील जन्मानंतरच्या आयुष्यात कितीही वाईट संस्कार झाले तरी त्याचा परिणाम बाळावर होत नाही. म्हणूनच भरणपोषण करतांना बाळ गर्भात राहतो. तेव्हाच खऱ्या अर्थानं चांगलं पोषण करण्याची गरज आहे. तद्वतच बाळ गर्भात असतांना त्यांच्या चांगुलपणासाठी असे गर्भसंस्कार शिबीरं आयोजीत करण्याची गरज आहे. परंतु त्या गोष्टीला कोणीच प्रमाण मानत नाहीत व कोणीच तसे गर्भसंस्कार आजच्या काळात तरी आयोजीत करीत नाहीत. उदा द्यायचं झाल्यास आपल्याच पुराणकथेतील भक्त प्रल्हादाचं देता येईल की ज्यावेळेस कयाधू गर्भावस्थेत होती, तेव्हा देव व दानवाचं युद्ध झालं. त्यात देवांनी काकूला पळवून नेलं व पळवून नेवून तिच्यावर संस्कार केले. परंतु त्यावेळेस तिच्यावर काहीच संस्कार झाले नाहीत. मात्र तिच्या गर्भातील बाळावर ते संस्कार झाले व ते बाळ त्यालायक जन्मास आलं. पुढं कयाधू जेव्हा दानव राज्यात आली आणि तिनं बाळाला जेव्हा जन्मास घातलं. तेव्हा बाळ थोडंसं मोठं झाल्यावर त्याला शिकविण्याचा प्रयत्न केल्या गेला. तेव्हा बाळ भक्त प्रल्हाद दानववृत्तीच्या गोष्टी शिकत नव्हता तर तो त्यांनाच शिकवून जायचा. याचं कारण काय असाव? तर ते गर्भात झालेले संस्कारच होय. तसेच संस्कार झाले होते अभिमन्यूवरही. त्यानं तर चक्कं चक्रव्यूह भेदण्याचं ज्ञान प्राप्त केलं होतं गर्भात.
महत्वाचं म्हणजे गर्भातही संस्कार होतात. त्या मुलांना चांगलं बनवायचं असेल तर..... गर्भसंस्कार महत्वाचेच. त्यातच जन्मानंतरचे पाच सहा वर्ष मुल शाळेत जाईपर्यंत त्या बालकाचा विकास होणे महत्वाचे. परंतु अलिकडील काळात या बाबी कोणीच लक्षात घेत नाहीत. तसं पाहता अलिकडील काळातील महागाईची झळ पती पत्नी, या दोघांनाही पडल्यामुळं त्यातच पैशाला अलिकडील काळात महत्व प्राप्त असल्यामुळं पैसा कमविण्थाची अलिकडील काळात जणू स्पर्धाच लागल्या आहेत. त्याचाच परिणाम मुलांवर होत आहे. मुलांना त्यांच्यावर संस्कार होण्याच्या उमेदीच्या काळात आपण पैसा कमविण्याच्या हव्यासानं पती पत्नी म्हणून आपले कर्तव्य असतांना आपण कामाला जातो. मुलांवर विशेष असं लक्ष नसतंच आपलं. मग आपण मुलांवर संस्कार करण्यासाठी काय करतो? तसा पैसा असतोच आपल्याजवळ. त्या पैशाच्या भरवशावर मुलांना त्याच्या वयाच्या दोन तीन वर्षापासूनच कॉन्व्हेंटला नेवून टाकतो. काही पालक तर असे आहेत की जे पैसा कमविण्यासाठी बाहेर जातात आणि बाळाला कोण पाहिल म्हणून पाळणाघरात टाकतात.
वरील सर्व बाबी व आपलं वागणं आपल्या अनुषंगानं बरोबर आहे. कारण आपल्याजवळ वेळ अजिबात नाही. परंतु त्या बाबी जरी बरोबर असल्या तरी मुलांवर संस्कार होण्याच्या दृष्टीकोनातून घातक आहेत. वरील सर्व बाबींतून मुलांवर सुसंस्कार नाहीत तर कुसंस्कार होत आहेत व मुलं अगदी लहान वयापासूनच गुन्हेगारीकडं वात आहेत.
आज वरील बाबींच्या अनुषंगाने आपल्याला दिसून येत आहे की लहान असलेली ती मुलं लहान वयातच खोटी बोलत असतात. काहीही म्हणत असतात. कशीही वागत असतात. परंतु आपल्याला त्यावेळेस मजा येते व आपण त्यांच्या लीला पाहून हसतो. म्हणतो की किती चांगल्या बाललीला करीत आहेत. परंतु त्यावेळेस आपल्याला त्या बाललीला घातक वाटत नाहीत की ज्या बाललीला बालगुन्हेगारी निर्माण करु शकतात. मात्र त्या बाललीला जेव्हा गुन्हेगारी स्वरुपात बदलतात. तेव्हा विचार येतो की आपण त्या बाललीलांना त्यावेळेसच रोखलं असतं तर आज ही वेळ आली नसती.
विशेष सांगायचं झाल्यास या बाललीला घातक अशा बाललीला असून त्याची दखल वेळीच घेण्याची गरज आहे. त्याची दखल जर वेळीच घेतल्या गेली नाही तर त्या बाललीला खतरनाक होवू शकतात यात शंका नाही. तेव्हा ह्या बाललीलांना वेळीच थांबवावे. जेणेकरुन प्रत्येक मुलात कुसंस्कार नाही तर सुसंस्कार निर्माण होतील व त्याचाच फायदा देशालाही होईल व संबंध देशच सुसंस्कारी स्वरुपाचा होईल. कुसंस्कारी स्वरुपाचा नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०