तुझे आणि माझे नाते..
तुझ्या नजरेचा तो एक साधा इशारा..,
मनात माझ्या आणतो आनंदाचा वारा...
काही न बोलताही खूप काही सांगून जातो ,
तुझा एक चेहरा माझा दिवस बनवून जातो..
शब्दांशिवाय समजते ते प्रेम असते,
तुझ्या असण्याने माझे जग हसते..
कधी रुसणे, कधी हसणे, हा तर खेळ भावनांचा,
पण प्रत्येक क्षणी ध्यास असतो फक्त तुझ्या साथीचा..
तुझ्या सोबतीने प्रत्येक रस्ता सोपा वाटतो,
तुझ्याच आठवणीत हा जीव वेडावून जातो..
नाते आपले हे असेच आयुष्यभर टिकावे,
मी तुझ्या मनात आणि तू माझ्या हृदयात राहावे.. ❤️