Marathi Quote in Poem by Fazal Esaf

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

पणतीचं दुःख

मातीची पणती रात्रभर जळत राहिली,
अंधाराच्या काळजातच ती फुलत राहिली.

वाऱ्यानेही येऊन तिला छळलं,
तरी ती उजेडात स्वतःला वितळवत राहिली.

वितळत राहिली तिची निःशब्द ज्योत,
ती मात्र मुकाट्यानं वेदना सोसत राहिली.

पहाट झाली, सूर्याची चाहूलही आली,
ती कोपऱ्यात विझून स्वतःतच मिटत राहिली.

कुणी विचारलं नाही, काय गमावलं तिनं,
कुठल्या आगीत ती रात्रभर जळत राहिली.

ज्यांना उजेडाची गरज होती,
ते सारेच पुढे निघून जात राहिले.

या जगाचाही अजब न्याय होता,
जी जळत राहिली, तीच जळत राहिली.

स्वतःची राख करून ती उजेड देत राहिली,
आणि दुनिया त्याच प्रकाशात जगत राहिली.

कधी विचार कर, ए दुनिया, हा कसला रिवाज?
जळूनही कुणीतरी सगळ्यांच्या नजरेआड राहिलं.

ज्यानं स्वतःला जाळून पहाट घडवली,
त्याच्याच नशिबी मात्र काळोखी राहिली.

— फज़ल अबुबक्कर एसाफ़

Marathi Poem by Fazal Esaf : 112040265

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now