परटाची अनशी तिच्या पोराला सखारामाला घेवून माहेरी चवान वाडीला जायला बाहेर पडली. चार सालामागे तिचा घोव मेल्यापासून तिला भावांचा मोठा उपराळा होता. मळ्यात तिच्या निर्वाहापुरती जमिन होती. शेतीच्या टायमाला उखळदुरा करून पायली भात नी दोन शेर नाचण्याचापेरा ती मजुरीची जोतं लावून करून घेई. दाड(भाताची रोपे) वीत भर झाली की माहेराहून तिचे भाऊ चार जोतं नी गडी पैरी धाडीत. आलेले जोतये नी पैरी दोन तीन दिवस आगरेवाडीत थांबून तिची लावणी पुरी करून देत. भात कापणी झाल्यावर मळ्यात कुळीथ, चवळी, कडवे, वरणे अशी कडदणं (

Full Novel

1

चकवा - भाग 1

चकवा भाग 1 परटाची अनशी तिच्या पोराला सखारामाला घेवून माहेरी चवान वाडीला जायला बाहेर पडली. चार सालामागे तिचा मेल्यापासून तिला भावांचा मोठा उपराळाहोता. मळ्यात तिच्या निर्वाहापुरती जमिन होती. शेतीच्या टायमाला उखळदुरा करून पायली भात नी दोन शेर नाचण्याचापेरा ती मजुरीची जोतं लावून करून घेई. दाड(भाताची रोपे) वीत भर झाली की माहेराहून तिचे भाऊ चार जोतं नी गडी पैरी धाडीत. आलेले जोतये नी पैरी दोन तीन दिवस आगरेवाडीत थांबून तिची लावणी पुरी करून देत. भात कापणी झाल्यावर मळ्यात कुळी ...Read More

2

चकवा - भाग 2

चकवा भाग 2 गुरं परतीला लागली त्यांच्या मागोमाग मायलेकरं चालत निघाली नी थोड्याच वेळात घाटीचं आलं. ही कुठची वाडी काय त्याची ओळख पटेना. पण थोड्याच वेळात घरं दिसायला लागली. पहिल्यानेच लागले त्या घराकडे अनशी निघाली. घरातला कोणतरी बापया आंगणात उभा होता. "भावजीनू , मी चिचेबुडच्या देवू परटाची मागारीण..... माजा म्हायार चवान वाडीत बाबू हडकराकडे...... परत येताना आमी वाट चुकॉन हय उतरलंव......." त्यांच हे बोलणं सुरु असताना घरातून दागिन्यानी मढलेली गोरी बाई पुढे आली. " तू चिचे बुडच्या साईत्र्ये परटीणीची सून ना ग्ये? तुजी सासू येवची आमच्या कडेन. तुजो घोव पण जीवत आसताना कवटां घेवन् येयाचो. ...Read More

3

चकवा - भाग 3

चकवा भाग 3सकाळी उशिरा कौल प्रसाद घ्यायला सदू गुरव आणि सातेकजण देवळाकडे निघाले. टेंबावरून पुढे येवून चढण संपल्यावर चिरेबंदी सुरु झाली. देवीचे देवूळ नजरेच्या टप्प्यात आले त्यावेळी डाव्या हाताला पाच साखर दाबोटे पडलेले दिसले. मंडळी कुतुहलाने जवळ गेली. पोत्यांचे बंद सोडल्यावर आत भांडी, सामान दिसले. रात्री बहुतेक देवळात चोरी झाली असा तर्क करून स्वत: सदू गुरव चोरीची वर्दी द्यायला गावात गेला. तासाभरात एकेक करीत मंडळी जमू लागली. पोलिस पाटील आणि देवस्थानचे मुख्य मानकरी दत्ताजी भावे यानी तालुक्याला जावून पोलिस स्टेशनला तक्रार करायची, तो पर्यंत कुणीही मुद्देमाल हलवायचा नाही असा निर्णय घेतला. मध्यान्हीपूर्वी पोलिस आले. मग पोती मंदिरात नेली. पोत्यातल्या ...Read More

4

चकवा - भाग 4

चकवा भाग 4जरा हुषारी आल्यावर त्याने चौफेर नजर फिरवली. तुरीची ढाकं पुरुषभर उंच वाढलेली होती. तटक्यांवर सोडलेले चवळी, तोवशीचे फुलायला कागले होते. तोवशीच्या वेलावर वीतभर लांब कोवळ्या काकड्या धरलेल्या होत्या. त्याने दोन काकड्या काढल्या. त्या पिशवीत टाकल्या नी कोवळी शिसं (अगदी छोट्या काकड्या) चावीत इकडे तिकडे बारीक नजरेने न्याहाळताना ओथंबून धरलेला पडवळीचा वेल दिसला. धाकुची खरी म्हणतात ती हीच हे त्याच्या लक्षात आले. खरीचा सध्याचा रत्नू कुंभार गेले पंधरा दिवस तीस चाळीस पडवळांचा भारा बांधून गावात नेवून विकीत असे . त्याने दोन पडवळी मोडून ती पिशवीत भरली. खरीतले जित्रब बघून त्याचे डोळेच फाटले. आता तो माघारी जायला निघाला. तो ...Read More

5

चकवा - भाग 5

चकवा भाग 5ती सात एकर जमिन दोन एकर गुरवाकडे,दोन एकर देवस्थानला तेल घालायचा मोबदला म्हणून रावताकडे आणि तीन एकर कुड असलेल्या कोकाट्यांच्या ताब्यात होती. कोकाट्यांची पिलग़ी वाढून वीस उंबरे झाले होते . पण त्यापैकी पाच मुख्य घरवडींकडे जमिनीचा ताबा होता. स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसच्या राज्यात कुळकायदा आला. त्याचा फायदा घेवून मराठ्यांच्या ताब्यात असलेली जमिन कुळाना कसायला दिलेली होती ती बरीचशी कुळानी बळकावली. पुजारी मराठ्यांच्या ताब्यातली बरीच जमिनही अशीच कुळानी बळकावली. पण त्यातही काही पापभीरू कुटुंबानी आपला ताबा सोडला. गुरव , तेली नी कोकाट्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनीही अशाच कसणारानी बळकावल्या. मात्र बाबूने त्याच्या ताब्यात असलेली एक एकर जमिन आपल्या नावावर लावून न ...Read More

6

चकवा - (अंतिम भाग )

चकवा अंतिम भाग 6तासभर दम खावून ते उतरणावरून पुढे निघाले. गावकुसाजव्ळ गेल्यावर कोंबड्याची बांग ऐकू आली. आता चांगलं फटफटायला होतं. दमा दमाने अंदाज घेत ते पुढे निघाले नी थोड्या अंतरावर वहाळ लागला. एकाने परिसर ओळखला...... ह्यो नाडणचो व्हाळ सो वाटता....... म्हंजे आमी विजेदुर्गाकडे न जाता उलट्या दिशेन नाडणात इलव.... म्हंजे आमका बत्ती दिसली ती गडारची नव्हती..... देवगडची हुती.....अंदाज खरा होता. ते नाडणात आले होते. आता चांगलं दिसत होत. त्यानी चांभारघाटीच्या दिशेने मोहरा वळवला. तासाभराने परबाचं होटेल उघडलं. चुकार माकार माणस यायला लागली होती. सकाळच्यावेळी हे शिख़ इथे कसेकाय आले ? म्हणून माणसं वळून वळून त्यांच्याकडे पहात होती. आता त्यानी ...Read More