मी जय शिवराय मित्र मंडळ ✨ छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र पावन भूमीत तुम्ही नेहमीच मला त्यांची आठवण होत राहील व त्यांच्याच प्रमाणे माझ्यातही जिद्द आणि विशेष गुण येतील असे मला नाव दिलात (जय शिवराय मित्र मंडळ) म्हणून मी प्रथम तुमचा सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा आभारी आहे...? मी जय शिवराय मित्र मंडळ बोलतोय...
Jay Shivray mitra Mandal - 1
मी जय शिवराय मित्र मंडळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र पावन भूमीत तुम्ही नेहमीच मला त्यांची आठवण होत राहील त्यांच्याच प्रमाणे माझ्यातही जिद्द आणि विशेष गुण येतील असे मला नाव दिलात (जय शिवराय मित्र मंडळ) म्हणून मी प्रथम तुमचा सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा आभारी आहे...मी जय शिवराय मित्र मंडळ बोलतोय...माझा शुभारंभ 1989 साली झाला. सुरुवातीचे माझे दिवस खूप साधे-सुधे आणि हालअपेष्टेमध्ये गेले. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच कार्यकर्ते माझ्यासोबत होते. त्यांच्या सोबतीला होती ती फक्त त्यांची म ...Read More
Jay Shivray mitra Mandal - 2
*पहिला दिवस – प्राणप्रतिष्ठा*आज दिवस पहिला... माझ्या बाप्पाचा... माझ्या घरातला आनंदाचा.काय म्हणालात "आनंदाचा कसा?"... अहो, आनंदी वातावरण का नसणार...? माझ्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा आज होणार होती. या आलौकिक सोहळ्यासाठी प्राणप्रतिष्ठेसाठी सायंकाळचा मुहूर्त ठेवण्यात आला होता.पण जेव्हा समजलं की मुहूर्त उशिरा आहे, तेव्हा थोडं मन अस्वस्थ झालं. कारण बाप्पा घरी आले होते, पण प्राणप्रतिष्ठा सायंकाळी होणार होती. आता मी दिवसभर काय करू...? बाप्पा माझ्याशी बोलणार नव्हते... मनात विचार आला आणि बेचैनी वाढली.एकीकडे माझ्या लाडक्या बाप्पाच्या मिरवणुकीचा आनंद मनात उसळून वाहत होता, तर दुसरीकडे बाप्पा घरात असूनही गप्प बसले आहेत, असं वाटत होतं.जन्मलेलं बाळ आईच्या मांडीवर झोपलेलं असतं... आई त्याला हाक मारते, ...Read More
Jay Shivray mitra Mandal - 3
दिवस दुसरा : जागर स्त्रीशक्तीचाआरे बापरे... "रात्र कशी संपली काय कळलंच नाही!" मी स्वतःशीच बडबडत उठलो.लाडक्या बाप्पांकडे पहिले तर आधीच उठून ध्यानमग्न बसले होते. उंदीर मामा माझ्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होता. क्षणभर मला कळलंच नाही, हा बरं का असं हसतोय? पण मी त्यावर जास्त विचार केला नाही. बाप्पांचं ध्यान मोडू नये म्हणून मी खूप काळजी घेत होतो.पण उंदीर मामा काही गप्प बसत नव्हता... दातांनी स्वतःच्याच शेपटीला चावत होता आणि चूक... चूर... असा आवाज करत होता. मी त्याला फटकारलं.पण तो काय, अजूनच हट्टाने गप्प बसायच्या मूडमध्ये नव्हता. शेवटी न राहवून त्याने मला विचारलंच,"मंडळ दादा, नैवेद्य कधी येणार?"मला खुदकन हसू ...Read More