#काव्योत्सव (सामाजिक)

प्रतिमा बापुजींची

या रंगाची वस्ती जाळण्यासाठी
त्या रंगाने दिली सुपारी
अन् अनामत रक्कम म्हणून
ठेवले बंडल पाचशेच्या नोटांचे
हातात त्याच्या.
घेतली तपासून त्यानेही
प्रत्येक नोट,
आरपार पहात
प्रतिमा बापुजींची...


-नागेश पदमन

English Poem by Nagesh Padman : 111163079

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now