हिरव्यागार शिवारात
सारवलेले अंगण
कुणीतरी घेतसे
अधिकाचे वाण
नात्याच्या जपणुकीचे
ते आनंदाचे लेणे
दाण्यादाण्यातून
भरले चंदेरी चांदणे
फुले ते शिवार
मोर नाचे मनभर
कुणी सई सांगतसे
गुज रानीचे अपार

-Aaryaa Joshi

Marathi Good Night by Aaryaa Joshi : 111583501

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now