🥕गाजर मशरूम सूप ..
🥕साहित्य
चार केशरी गाजरे
सात ते आठ मशरूम
चार मोठे चमचे मिल्क पावडर
मिरी पावडर
मीठ चवीनुसार
🥕कृती
प्रथम गाजर व मशरूम चे तुकडे करून
तुपात परतून झाकण ठेवून वाफवून घेणे
गार झाल्यावर दोन्ही मिळून मिक्सर मध्ये थोडी जाडसर पेस्ट करून घ्यावी
आता दोन मोठे बाउल पाणी यात घालून
मिश्रण उकळण्या साठी ठेवावे
उकळी आल्यावर चार मोठे चमचे मिल्क पावडर पाण्यात कालवून ती पेस्ट यात हळूहळू घालावी
सूप आवडीप्रमाणे दाटसर करून घ्यावे
गरज असल्यास थोडे पाणी वापरावे
एक ते दोन लहान चमचे मिरी पावडर व चवीनुसार मीठ घालावे
सजावटी साठी वर चमचाभर लोणी आणि पुदिना पाने घालावी
मिल्क पावडर मुळे एक गोडसरपणा
आणि मिरी पावडर मुळे तिखटपणा अशी दुहेरी चव या सुपला येते .