त्याने प्रेमाला ईतकं मुश्किल का बनवलं
दोन्हीकडून होकार होता
आणाभाका ही होत्या
मग नेमकी माशी शिंकली कोठे?
जुन्या वैराची बदल्याची भावना
प्रेमाला वरचढ ठरली.
कुणाचा राग कुणावर निघाला...
सूड ज्याचा त्याचा पूर्ण झाला
पण तिने यात आख्ख भविष्य हरले.
@शब्दप्रिया_ती लिहिते✍️