'यमराजांशी गप्पागोष्टी!’
स्वप्नात आले यमराजे,
मी म्हटले, थांबा -थांबा,
एवढी काय घाई,
कुठे निघाले लगबगीने!
यमराजे म्हणाले, काय म्हणतोस,
बोल लवकर लवकर,
बरीच कामे आहेत मला,
फुरसत नाही मला!
मी म्हटले,
तुमच्याजवळच्या यादीत,
नाव आहे कां,
बघता कां!
ते म्हणाले, कसा आहेस रे तू,
अनेकजण घाबरतात मला,
दरवाजे बंद करतात,
आणि तू म्हणतोस, नांव बघा!
नाही यमराजे, तसे नाही,
आमची मित्रमंडळी म्हणते,
आपल्यासाठी झाले खुले दरवाजे,
म्हणून म्हटले, बघा यादी!
यमराजे म्हणाले, वेळ आहे तुला,
एवढी कशाला घाई करतो रे,
पण मी म्हटले, भेटीगाठी,
तयारी करून ठेवायला बरे!
यमराजे, माझे एक काम कराल कां,
देवाला तेवढे सांगाल कां,
जरा थोडी पूर्वसूचना,
मिळाली तर बरे होईल ना!
व्हाट्सअँप वर मेसेज केला तरी चालेल,
यमराजे म्हणाले, आमच्याकडे,
तसे काही नाही,
बरं येऊ कां?
यमराजे, तुम्ही येऊ नका हो,
जातो असे म्हणत चला!
तुमचे येणे म्हणजे भीती वाटते,
तुम्ही नाही आले तरी चालेल आम्हाला!
दि. 31 ऑक्टो. 2026.
प्रा. डॉ. विनोद राऊत,
से. नि. प्राध्यापक,
अमरावती..