Marathi Quote in Poem by Vinod

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

गजानना, कृपा असु द्या!

गजानना, तुम्ही मला सुखी केले,
आप्तस्वकीयांनाही सुखी करावे,
एवढीच प्रार्थना तुमच्या चरणी,
नको काही आता, फक्त तुमची कृपा व्हावी!

देव म्हणाले, 'ठीक आहे,
पण अधूनमधून कधी तरी,
भेटायला येत जा शेगावला,
मलाही तुझ्या भेटीची आतुरता असते रे!’

मी म्हटले, ‘हो देवा,’
पण कधी कधी वेळ मिळत नाही,
मनात इच्छा असते पण येणे जमत नाही,
काय करावे देवा, तेच काही सुचत नाही!

अरे! तुझ्या मनात भाव असला,
तरी चालेल मला,
तू म्हणशील तेव्हा होईल हजर,
भक्तांसाठी मी असतो तत्पर!

तू मात्र कर्म करायचे सोडू नको,
नाही तर म्हणशील,
झाले माझे काम,
मग होशील नेहमीसारखाच स्वार्थी!

नाही देवा, कळले मला आता,
तुम्ही पाठीराखे असल्यावर,
उरणार नाही चिंता,
फक्त तुमची कृपा असू द्या!

दि. 27 ऑक्टो. 2026.

— प्रा. डॉ. विनोद राऊत,
से. नि. प्राध्यापक,
अमरावती.

Marathi Poem by Vinod : 112040610

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now