बायको
लग्न करुनी बायको
घरी परक्या ती येते
उरी असे आठवणी
नाती नवी ती जोडते.
विसरुनी ती स्वतःला
जपे ती सारीच नाती
सुखदुःखा साथ करी
सदा ही आधार देती.
असे तिच्यात ममता
सदा काळजी घेतसे
सान थोर साऱ्यांनाही
तिचा आधार असे.
संकटांना झुगारून
बळ पतीला ती देते
कसी कंबर लढण्या
जसी ढालच बनते.
होई सारं चांगलंच
आस मनी बाळगते
स्थिती जरी विपरीत
तरी सखी सांभाळते.
शीतयुद्ध कधी कधी
असे कधी लाडी गोळी
सदा कष्ट उपसुनी
बने स्वतः हाड कुळी.
शून्य किंमत ती तिची
सारं घर ठरविते
"घरी झोपा काढतेस"
पती चीढून बोलते.
होई सारं ते साहून
हेळसांड शरीराची
जरी क्षणाची ती पत्नी
माता अनादी काळाची.