🌸 अनाहूत भेट ✨
(An Uninvited Meeting of Souls)
🌧 शब्दांच्या प्रवाहातून
तो नकळत
माझ्या आयुष्यात आला.
जणू भूतकाळच वर्तमान बनून आला...
☕ गप्पांच्या मैफलीत तो
बिनधास्त बोलत राहतो,
आणि कशाचीही परवा न करता
सगळं मन रिक्त करून जातो.
🏹 शब्दरुपी बाणांचा
त्याने प्रचंड वर्षाव केला,
त्याच्या लेखणीपुढे
मेघराजही शरण गेला.
🌊 पावसाच्या सरींनी
धरती नाहून गेली,
आणि त्याच्या वेडाने
मी चिंब भिजुनी गेली.
🌀 शब्दांची जादू करून
वेड लावतो जीवाला,
कितीही प्रयत्न केला तरी
विसरता येईना याला.
🧱 समाजाच्या भिंती भेदून
तो अनेक गोष्टी सांगतो,
जीवनाच्या कॅनवासवर
शब्दांचे चित्र रंगवतो.
💔 त्याचे शब्द येताच
मन घायाळ खूप होते,
आणि एक एक वाक्य
मनाला स्पर्श करून जाते...
🤐 त्याच्या शब्दांना मज
उत्तर देता येईना,
आणि मनात जे दाटले
ते मला सांगता येईना.
🌑 शब्द असूनही
मौनात हरवून गेले मी,
व्यक्त होताना
स्वतःलाच हरवत गेले मी.
📜 समजून घेशील का एकदा
माझ्या मनाची व्यथा?
माझ्या भावनांना आणि शब्दांना
आहेत खूप मर्यादा...