#श्रावण
🏵️साबुदाणा खिचडी
साबुदाणा खिचडी सगळ्यांच्या घरी केली जाते
प्रत्येकाच्या कृतीत थोडा फार वेगळेपणा असू शकतो
🏵️साहित्य
दिड वाटी साबुदाणा
एक बटाट्याच्या फोडी
अर्धी वाटी शेंगदाण्याच कूट
दोन हिरव्या मिरच्या
दोन मोठे चमचे साजूक तूप
अर्धा चमचा जिरे
चवीपुरते साखर, मीठ
कोथिंबीर खोवलेले खोबरे
लिंबू
🏵️कृती
रात्री साबुदाणा बुडेल ईतके पाणी घालून भांड्यात साबुदाणा भिजवावा
सकाळी व्यवस्थित मोकळा करून घ्यावा
त्यात दाण्याचे कुट साखर आणि मीठ घालुन चांगला एकत्र करुन घ्यावा
कढईत दोन चमचे तूप गरम करावे.
त्यात जीरे आणि बारीक चिरलेल्या मिरच्या घालून फोडणी करावी.
त्यात बटाट्याच्या काचर्य़ा घालून परताव्यात. वाफ काढावी.
बटाटा चांगला शिजला गेला की त्यात तयार करून ठेवलेले साबुदाणा दाण्याचे कुट हे मिश्रण घालावे व चांगलें परतून घ्यावे
झाकण घेवून चांगलीं वाफ काढावी
कोथिंबीर आणि ओले खोबरे घालावे
सोबत लिंबाची फोड द्यावी