वायंगीभूत

(2)
  • 81
  • 0
  • 1.3k

पहिला कोंबडा झाला नी घरण उठली. काल रात्रीच्या रांधपाला नाचण्याचं पीठ संपलं होतं. आज काहीही करून दोन पायलीचं दळण करणंच भाग होतं. जावाना हाकारून तिने चुलीतला शेणगोळा बाहेर ओढला. अर्धी थापटी(गोलाकार शेणी) मोडून घेवून त्यावर चुलीतला शेणगोळा ठेवून तो फुंकणीने फोडून त्यावर रान शेणीचा कुस्कर टाकून फुंकर घालू लागली. थोड्याच वेळात चांगला जाळ धरल्यावर कोपऱ्यातल्या पिचुर्ड्या अलगद ठेवून त्या पेटायला लागल्यावर साण्यातल्या चिमूटभर तंबाखु घेवून तो भाजून त्याची मशेरी लावीत बायजा मागिलदारी गेली. दोणीजवळची पितळी दीडशेरी घेवून ती खोरणात (बहिर्दिशेला) निघाली. ती परत येवून हातपाय धुवून घरात येईपर्यंत जावा उठून दळणाच्या तयारीला लागलेल्या होत्या.

1

वायंगीभूत - भाग 1

पहिला कोंबडा झाला नी घरण उठली. काल रात्रीच्या रांधपाला नाचण्याचं पीठ संपलं होतं. आज काहीही करून दोन पायलीचं दळण भाग होतं. जावाना हाकारून तिने चुलीतला शेणगोळा बाहेर ओढला. अर्धी थापटी(गोलाकार शेणी) मोडून घेवून त्यावर चुलीतला शेणगोळा ठेवून तो फुंकणीने फोडून त्यावर रान शेणीचा कुस्कर टाकून फुंकर घालू लागली. थोड्याच वेळात चांगला जाळ धरल्यावर कोपऱ्यातल्या पिचुर्ड्या अलगद ठेवून त्या पेटायला लागल्यावर साण्यातल्या चिमूटभर तंबाखु घेवून तो भाजून त्याची मशेरी लावीत बायजा मागिलदारी गेली. दोणीजवळची पितळी दीडशेरी घेवून ती खोरणात (बहिर्दिशेला) निघाली. ती परत येवून हातपाय धुवून घरात येईपर्यंत जावा उठून दळणाच्या तयारीला लागलेल्या होत्या. ...Read More

2

वायंगीभूत - भाग 2

" आता तू आमका वळाकतस..... आमचा खानदानी घराणा. आमी गावचे मानकरी म्हाजन. दोनशे माड नी अडिजशे पोफ़ळ हा आमची. खंडी खंडाचा भात येता...... दुपिकी मळो...... हाल्लीच शंभर कलमांची बाग उटवली. पण चार बाजून येवडा उत्पान असोन आज मितीक पन्नास रुपाये म्हणशा तर गाटीक नाय आमच्या. येरे दिवसा नी भर रे पोटा अशी कुडवाळ तऱ्हा ..... आमच्या काय उतवाक् धूर लागना नाय. लय थळा सोदून झाली. पण एकाचो म्हणशा तर गुन नाय......" आलेली किरकोळ गिऱ्हायकं मार्गी लागल्यावर जिक्रियाने बाबुला आत न्हेला. भिंतीवर हाजी मलंगाचा फोटो लावून त्यासमोर चटई टाकून डोक्याला गलप बांधून म्हमद पालथा पडला ...Read More