डेथ स्क्रिप्ट

(1)
  • 183
  • 0
  • 341

स्टॉकहोमच्या ग्रँड कॉन्सर्ट हॉलमधील भव्य व्यासपीठावर एक व्यक्ती उभे होते. सभोवतालचे वातावरण विजेच्या प्रवाहाप्रमाणे सळसळत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कौतुक, आदर आणि कुतूहल स्पष्ट दिसत होते. हजारो डोळे एकाच माणसाकडे लागले होते, ज्यांनी मानवतेला भविष्याचा आरसा दिला होता. ते होते "डॉ. फिनिक्स" (Dr. Phynicks) ज्यांचे वय ३० या आसपास होते. साडेपाच- सहा फूट उंच. चांगली व्यायामाने कसलेली शरीर यष्टी. त्यांचे केस आधीच काही प्रमाणात चांदीचे झाले होते, ते आज मंचावरील दिव्यांच्या प्रकाशात आणखीनच चमकत होते. त्यांच्या चेहऱ्यावर तेज होते आणि डोळे असे की जे कित्येक निद्राहीन रात्री आणि अथक परिश्रमाची साक्ष देत होते, ते डोळे आज अभिमानाने उजळले होते. त्यांनी काळ्या रंगाचा सूट घातला होता, जो त्यांच्या गंभीर व्यक्तिमत्वाला एक अनोखी शान देत होता. त्यांच्या हातातील नोबेल पुरस्काराचे पदक त्यांच्या संघर्षाचा अंतिम विजय दर्शवत होते.

1

डेथ स्क्रिप्ट - 1

अध्याय १---------------स्वप्न आणि सिद्धी-----------------------स्टॉकहोमच्या ग्रँड कॉन्सर्ट हॉलमधील भव्य व्यासपीठावर एक व्यक्ती उभे होते. सभोवतालचे वातावरण विजेच्या प्रवाहाप्रमाणे सळसळत होते. चेहऱ्यावर कौतुक, आदर आणि कुतूहल स्पष्ट दिसत होते. हजारो डोळे एकाच माणसाकडे लागले होते, ज्यांनी मानवतेला भविष्याचा आरसा दिला होता.ते होते "डॉ. फिनिक्स" (Dr. Phynicks)ज्यांचे वय ३० या आसपास होते. साडेपाच- सहा फूट उंच. चांगली व्यायामाने कसलेली शरीर यष्टी. त्यांचे केस आधीच काही प्रमाणात चांदीचे झा ...Read More

2

डेथ स्क्रिप्ट - 2

अध्याय २---------------पापाचा पहिला डाग----------------------------स्टॉकहोमच्या कॉन्सर्ट हॉलमधील टाळ्यांचा आवाज आता प्रयोगशाळेतील भिंतींमधून पूर्णपणे नाहीसा झाला होता. डॉ. फिनिक्स नोबेल पुरस्कार परदेशात गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत, प्रयोगशाळा एका विचित्र, भयाण शांततेने भरली होती. या शांततेत फक्त वातानुकूलित यंत्राचा मंद आवाज आणि 'क्रोनोस' यंत्राच्या आतून येणारी सूक्ष्म गुंजारव ऐकू येत होती. यंत्राचा निळा प्रकाश मंद झाला होता, जणू काही तेही आपल्या निर्मात्याच्या अनुपस्थितीने उदास झाले होते.पण या शांततेत, निशा मेहताच्या मनात विचारांचे वादळ सुरू होते. एका क्षणात, तिचे आयुष्य, तिची स्वप्ने आणि तिचे उद्देश बदलले होते. तिच्या डेस्कवर एक लॅपटॉपची स्क्रीन चमकत होती, ज्यावर एका ऑनलाइन लॉटरीच्या वेबसाइटचे पृष्ठ उघडले होते. तिच्या ...Read More