मागचा पूर्ण आठवडा मी अत्यंत कंटाळलेल्या अवस्थेत आणि छताकडे बघत घालवला होता.खिशात पैसे नाहीत, नोकरी नाही,काम नाही अशा स्थितीत. माझ्या जवळचा फोन हा एकमेव सोबती आणि आधार होता. एवढ्यात फोन वाजला. “ मी प्रीतम कपूर ची सेक्रेटरी रुधिरा बोलत्ये.” रुधिरा माझी मैत्रीण. आत्ताची की भूत काळातली? मी मनाला विचारलं. “ कशी आहेस रुधिरा?” “ प्रीतम कपूर ना तुम्हाला तातडीने भेटायचंय. येताय असं गृहीत धरू ना मी?” कोणतीही वैयाक्तीक ओळख असल्याचं न दाखवत तिने विचारलं.

1

तोतया - प्रकरण 1

प्रकरण १मागचा पूर्ण आठवडा मी अत्यंत कंटाळलेल्या अवस्थेत आणि छताकडे बघत घालवला होता.खिशात पैसे नाहीत, नोकरी नाही,काम नाही अशा माझ्या जवळचा फोन हा एकमेव सोबती आणि आधार होता. एवढ्यात फोन वाजला.“ मी प्रीतम कपूर ची सेक्रेटरी रुधिरा बोलत्ये.”रुधिरा माझी मैत्रीण. आत्ताची की भूत काळातली? मी मनाला विचारलं.“ कशी आहेस रुधिरा?”“ प्रीतम कपूर ना तुम्हाला तातडीने भेटायचंय. येताय असं गृहीत धरू ना मी?” कोणतीही वैयाक्तीक ओळख असल्याचं न दाखवत तिने विचारलं.“ तातडीने म्हणजे नक्की कधी? ”“ जेवण झाल्यावर.साधारण ३ वाजता दुपारी.”“ मी प्रीतम कपूर यांना काही रक्कम देणे लागतो.त्याच्या वसुलीसाठी नाही ना बोलावलंय?” मी विचारलं“ जॉब बद्दल आहे.” रुधिरा म्हणाली.मला ...Read More

2

तोतया - प्रकरण 3

तोतयाप्रकरण ३आज तिसरा दिवस..दुपारी मजहरने जेवण आणलं तेव्हा मी सह्या करत बसलो होतो. माझी सहीवर आता हुकुमत आली होती. त्याने माझा तिसरा हप्ता आणला होता.पाच हजाराचा ड्राफ्ट ! मला आता बाहेर नेण्यात येणार होतं.माझी तोतयेगिरी आता सुरु होणार होती. भालेकर आत आला त्याच्या हातात ब्रीफ केस होती.त्यातून एक लीगल पेपर बाहेर काढला. हिरवट रंगाचा. त्यावर काहीतरी मजकूर छापला होता.“ यावर पेन्सिल ने सही कर.”मी हातात पेन्सिल घेऊन अस्खलित पणे प्रखर प्रजापती ची सही ठोकली.भालेकर माझ्याकडे बघत होता.माझा आत्मविश्वास पाहून तो खुष झाला.“ आता पेनाने कर.” तो म्हणाला. मी केली. ती नीट निरखून पहात तो म्हणाला,“ पास झालास तू चक्रपाणी, ...Read More

3

तोतया - प्रकरण 4

तोतयाप्रकरण 4मी भालेकरवर कडाडल्यावर त्याचा चेहेरा बघण्यासारखा झाला होता.रागाने लालेलाल झाला. मजहर माझ्या मागे होता त्यामुळे त्याचा चेहेरा दिसला पण त्याला ही आश्चर्य वाटलं असावं, पण भालेकरला मी ओरडल्यामुळेत्याला मनातून आनंद झाला असावा. भालेकर माझ्यावर काहीतरी ओरडणार होता पण मालविकाने त्याला हाताने खूण करून गप्प राहायला सांगितलं. ते दोघं निघून गेले आणि खोलीत आम्ही दोघंच होतो.तिने माझ्याकडे निरखून पाहिलं जणूकाही माझा अभ्यास केला आणि म्हणाली,“ तुझा मास्क काढून टाक.तू कसा आहेस मला बघायचंय.” मी बाथरूम मधे जाऊन मास्क काढला.बाहेर आलो.मी टेबलाजवळ उभा होतो आणि ती माझ्याकडे बघत होती.खाटिक जसा त्याच्या समोरच्या प्राण्याकडे बघेल तशी नजर वाटली मला.“ बस खाली.” ...Read More

4

तोतया - प्रकरण 2

तोतयाप्रकरण २मला तिथेच थांबायला सांगून तो गोरिलाला घेऊन बाहेर गेला. थोड्या वेळात मला गाडीत नेऊन बेशुद्ध करणारी म्हातारी बाई आली.तिच्या हातात तो छोटा कुत्रा होता.माझ्याशी असं वागल्या बद्दल ती माफी मागायला आली होती.“ तुझी आई हयात आहे?” अचानक तिने मला प्रश्न विचारला आणि मी हादरलोच.“ का? असं काय विचारताय?” मी विचारलं.“ सांग तर ”“ नाही ती पाच वर्षांपूर्वीच गेली.”“ ती जिवंत असती तर मी आज तुझ्या बाबत जे केलं तेच केलं असतं. आम्ही तुला ज्या माणसाचा तोतया व्हायला सांगतोय तो माझा मुलगा आहे.”“ माझ्या आईने असं कुणालाच बेशुद्ध करून पळवलं नसत.उगाच तिच्याबाबत वाईट बोलू नका.” मी भडकून म्हंटलं.“ संकटं ...Read More

5

तोतया - प्रकरण 5

तोतया प्रकरण 5प्रकरण ५रात्री माझ्या बेडवर मालविका आल्याचं स्वप्न मला पडलं मी चमकून जागा झालो रात्रीचे सव्वातीन वाजले होते अंमला मधून मी जागा झालो तेव्हा मला लक्षात आलं की ते स्वप्न नव्हतं.“तू खूप छान आहेस. ‘सर्वच’ बाबतीत” ती म्हणाली.“तू सुद्धा तशीच आहेस” मी म्हणालो“भालेकर तुझ्यावर खूप खुश आहे. तो म्हणत होता की तुला फोनवरील संभाषण खूप छान प्रकारे करता आलं.” मालविका म्हणाली.“मी मुळात अभिनेता आहे मालविका आणि हा अभिनय करण्यासाठीच मला इथे आणलं गेलंय. चक्क भाड्याने घेतलं गेलंय.” माझ्या बोलण्यात नकळत कटूता आली.“प्रखर ची परिस्थिती आणखीनच खराब झाल्ये, आज त्यानं मला ओळखलं पण नाही”मी किंचित सावध झालो. ही माझ्यावर ...Read More

6

तोतया - प्रकरण 6

तोतया प्रकरण 6मी पुन्हा सावध झालो माझ्या सह्या त्या खोट्या मृत्युपत्रावर केल्यानंतर मला दोन कोटी मिळतीलच याची काय खात्री शिवाय मी प्रखर प्रजापतीचा तोतया म्हणून होतो. प्रखरच्या मृत्युपत्रानंतर माझं अस्तित्वच संपणार होतं.मी तिच्याकडून आणखीन काही माहिती काढायचं ठरवलं कारण मला माझा निर्णय लगेच द्यायचा नव्हता मी तिला विचारलं,“ तू म्हणतेस त्याला पुरावा काय?”“ कशाचा?” तिने विचारलं.“ म्हणजे प्रखर प्रजापती तू म्हणतेस तसा दोन वर्षापासून आजारी आहे. बिछान्यातून उठू शकत नाही याला काय आधार आहे तुझ्याकडे?”“तसा पुरावा आहे, प्रखर चे स्टेट बँकेत फोर्ट मुंबई आणि दुबई बँकेत जे वैयक्तिक खाते आहे त्यावर व्यवहार करणे प्रखर ला शक्य नव्हते, तेव्हा त्याने ...Read More