जितवण पळाले

(4)
  • 16
  • 0
  • 1.2k

दांडे निवती वरून दर्याचा एक फ़ाटा पठार, तरवड आणि कोंड सखला पर्यन्त गेलेला आहे. निवतीवरून तरवडातल्या जुगाईच्या देवळापर्यंतगाडी रस्ता होता. दिवसातून तीन चारएस्ट्या असायच्या. पण पुढे कोंड सखलात जायचं तर चालसूर माणसालाही दीड घंटा वेळ लागायच्या. तरवडच्यावेशीकडे गेलं की समोर माडभरापेक्षा खोल उतरती घसारीची वाट होती. दरडीच्या कडेने जेमतेम बैल गाडी घालता येईल इतपत चाकोरी होती. पायथ्याला सवथळ भाग गाठी पर्यंत मोडणा मोडणानी बैल गाडी नेता येत असे. अर्थात भरवण बेतानी घालावे लागे , आणि घसारी चढता उतरताना दोन ठिकाणी तरी थांबून इस्वाटा घ्यावा लागे. गाडीरस्त्याने जाण्यापेक्षा भरती सुकतीचे ताणबघून पडावाने सामानाची ने आण करणे अधिकसोईचे आणि कमी वेळात फावणारे होते. तरवडतल्या सड्यावरून नजर टाकली की पायथ्याशी सुपाच्याआकारासारखा सवथळ भाग दिसे तेच कोंड सखल.

1

जितवण पळाले- भाग 1

दांडे निवती वरूनदर्याचा एक फ़ाटा पठार, तरवड आणिकोंड सखला पर्यन्त गेलेला आहे. निवतीवरून तरवडातल्या जुगाईच्या देवळापर्यंतगाडी रस्ता होता. दिवसातून चारएस्ट्या असायच्या. पण पुढेकोंड सखलात जायचं तर चालसूर माणसालाही दीड घंटा वेळ लागायच्या. तरवडच्यावेशीकडे गेलं की समोर माडभरापेक्षा खोलउतरती घसारीची वाट होती. दरडीच्या कडेने जेमतेमबैल गाडी घालता येईल इतपत चाकोरी होती. पायथ्याला सवथळ भाग गाठी पर्यंत मोडणा मोडणानी बैल गाडी नेता ...Read More

2

जितवण पळाले- भाग 2

गोड्या पाण्याचीटंचाई असली तरी गाव सधन होता.मळ्याच्या कडेने आंग ओलीवर बिनशिपण्याचे माड नारळानी ओथंबलेले असायचे.एकेका माडापर दीड दोनशे नारळलागलेले . खाऱ्या पाण्याचा उग्रम असल्यामुळे कोंड सखलातल्या नारळाचं खोबरं गोडूस लागायचं.मंगळवारी दांड्यातला बाजार नी शुक्रवारीपठारातल्या बाजाराला कोंड सखलातले लोक नारळ विकायला जात. त्यांच्या नारळावर गिऱहाईकं नुसती तुटून पडायची. नारळाचं बेफाट उत्पना असल्यामुळेकोंड खोलात प्रत्येक वाडीत तीन चार तरी तेलाचे घाणे असायचे. खाडीच्या कडेला उंडिली नी करंजाची झाडं माजलेली होती.मळ्यात उन्हाळी भुईमूग व्हायचा. ढोरं कायम मोकाट सोडलेलीअसल्यामुळे पिकदाऊ मळ्यातजायला एक वाट ठेवून भोवतीवावभर रुंद चर खणलेले असत. माऱ्याच्या ...Read More

3

जितवण पळाले- भाग 3

पोटं तटम्म फुगल्यावर तिथेच कडेलाचिखलटीत लोळत पडली. त्याच दरम्यानेसुकती लागली नी सुस्त झालेलीडुकरं रुपणीत अडकून पडली. गावातलीढोरं सुद्धा असंख्य अंदाजचुकला की रुपणीत अडकत असत. रुपणी कमरभरखोल होत्या. ढोरांचे पाय चिखलात फसत पण पोटवळाचा भाग पृष्ठभागावर उपेवत राही. आपण फसलो हे लक्षात आल्यावर मग़ ढोरंपाय फाकवून तशीच निपचित पडूनरहात. अगदी लहान वासरं सुद्धा रुपलीतरी पोटवळाचा भाग वरच उपेवत राही.घाबरलेली वासरं हंबरून हंबरून हैराण व्हायची. पण त्या चिखलडीत पुढे जावून त्यानाबाहेर काढणं महाकर्म कठिण होतं. दीड दोन तासानीभरती लागली नी चिखलवटीच्या भागात पाणी ...Read More