Live water escaped - 3 in Marathi Moral Stories by Prof Shriram V Kale books and stories PDF | जितवण पळाले- भाग 3

Featured Books
Categories
Share

जितवण पळाले- भाग 3

                                      

 

पोटं तटम्म फुगल्यावर तिथेच कडेलाचिखलटीत लोळत पडली. त्याच दरम्याने सुकती  लागली नी   सुस्त झालेली डुकरं  रुपणीत अडकून पडली.  गावातली ढोरं सुद्धा असंख्य वेळा  अंदाजचुकला की  रुपणीत अडकत असत. रुपणी कमरभरखोल होत्या. ढोरांचे पाय  चिखलात फसत पण  पोटवळाचा भाग पृष्ठभागावर उपेवत राही.  आपण फसलो हे लक्षात आल्यावर  मग़ ढोरं पाय फाकवून  तशीच निपचित पडूनरहात.  अगदी लहान वासरं सुद्धा  रुपली तरी  पोटवळाचा भाग वरच उपेवत राही.घाबरलेली वासरं हंबरून हंबरून हैराण व्हायची. पण त्या चिखलडीत पुढे जावून त्यानाबाहेर काढणं महाकर्म कठिण होतं. दीड दोन तासानी भरती लागली  नी  चिखलवटीच्या भागात पाणी वाढलं की चिखलात फसलेलीढोरं आपसूक पाण्यात तरंगायला लागत नी  मगपोहून काठावर येत.  तशीच डुकरं सुद्धा भरती  आल्यावर उपेवून काठाला आली असती. पण  मोठ्या नशिबाने  आयती शिकार चालून आलेली होती  म्हणून ज्या कोणाला डुकरं  रुपलेली  उमगली त्यानी गावकऱ्याना सांकेतिक कुकारे मारून पाचारण केले  होते.

                कमरभर खोल चिखलात  जावून रुपलेली डुकरं   कबजात घेणं सोपं नव्हतं. पण  गावकऱ्यानी  युक्तीने त्यावर तोडगा शोधलेला  होता.  दहा- पंधरा हाती  तीन वेळू वीत भर अंतराने  मांडून  त्यांच्यावर दोन हाती  कांबटं   ठोकून लांब लचक  साटी (तराफे) बनवीत. काहीसाट्या आखूड  दीड दोन  वाव लांबीच्या असत. या साट्या  किनाऱ्यावर मोकळ्याला ठेवलेल्या असत.  ही साटी  चिखलात ढकलली  तरी ती रुपत नसे. मगत्याच्यावर पाचसहा रुखाडी  बापये  हातात दोरी कोयते, कुऱ्हाडी  घेवून बसतबसत  पुढे जात.  लांबडी साटी शिकारीपर्यंत पोचली  नाहीच तर गरजे प्रमाणे आखूड साट्या  टाकून पल्ला गाठीत. चिखलात रुपलेल्या  डुकराजळ माणसं जायला  लागली की चवताळेला डुकर  फों ऽ फों  असे आवाज काढीत  पण माणसं जवळ  गेली तरी  त्याना काहीच प्रतिकार करता येत नसे.  शिकार टप्प्यात आल्यावर  साटीवरून  गेलेले  बापये  कुऱ्हाडी - कोयत्याने  त्यांचा नाकोट्यावरवर्मी फटके मारून त्याना ठार मारीत. मग त्यांच्या गळ्यात  रशीचा पक्का फासटाकला  की काठावरचे लोक त्याना ओढून बाहेर काढीत असत. काही वेळा भेकरी सुद्धा  गावत. त्यादिवशी  चार ओझ्याचे दोनडुकर  आणि चार बारकी   पिली  गावली होती. शिकारीचा हा अदभुत प्रकार बघूनसर्व्हे करायला आलेली माणसं  चाट  झाली. आज सर्व्हेयर टीम सह अख्ख्या गावाला पुरेशी सागोती  मिळालेली होती.  

                         जितवण्याच्यापरिसरात   दरडीमध्ये  काळवत्री शीळा होत्या. रस्ता बांधायला लागणारी काळवत्री   खडी  त्या भागात पुरेशा प्रमाणात  मिळते का  हे पहाण्यासाठी  मुख्य साहेब सरपंचाना घेवून  जितवण्याकडेनिघाले.  पाळेकर वाडीच्या मध्यातूनजितवण्याच्या पायथ्या पर्यंतची पाखाडी घडीव जांभ्या छिनेलानी  बांधलेली हिती. पायथ्याशी  कातळात ढोपरभर खोल आणि  वावभर औरस चौरस अशा दोन टाक्या  गुराढोरांसाठी खोदलेल्या होत्या. जितवण्या कडूनयेणारी वीतभर  रुंद   आणि चार आंगळ खोल पन्हळीतून बारमास  पाणी वहात असे. टाक्यापासून पंचवीस तीस पावलांच्या अंतरावर गळाभर उंच मरड होते. त्या ठिकाणी चढण्या साठीबेतवार उंचीच्या पायऱ्या कातळ तासून बनवलेल्या होत्या. मरडावर चढून गेले की सवथळकातळावर मळलेल्या पायवाटेच्या दुतर्फा  अध्ये मध्ये दोन हात  औरस चौरस कातळ  शिस्तीत तासून  त्यावर कसल्या कसल्या आकृत्या नी  चिन्हे कोरलेली होती. दरड संपून उभाकडा  सुरू   व्हायचा त्या ठिकाणी   डाव्या बाजुला  तीनेक वाव लांब आणि  पुरुषभर उंच काळवत्री  शीळा  चहू अंगानी तासून  तिला डमरुचा आकार दिलेलाहोता. 

                       डमरुच्या  दर्शनी भागावर मध्यभागी  पद्मासन घालून ध्यानमुद्रेत बसलेल्या नग्न  साधूची   ओबड धोबड उठावाची  मानवाकृती  कोरलेली होती.  त्याने डोक्यावर जटांचाबुचडा बांधलेला  बांधलेला होता . दोन्हीनेत्र मिटलेल्या स्थितीन असणारी ती पुरुषाकृती नग्नावस्थेत होती. त्याच्या बाजूलाउंच वाढलेली मुंग्यांची वारुळे, वटवाघळासारखे  उडते आकार  कोरलेले होते. ध्यानस्थ  मानवाच्या  बाजुला  फणा  फुलवलेल्या  नागाकृती आणि    तीन पात्याच्या   रानाच्या आकृती  दिसायच्या.  डमरुच्या विरुद्ध  पुडावर त्रिशूळ , बर्ची, धनुष्य  ,बाण  ही आयुधे आणि  दोन वराहाकृती कोरलेल्या होत्या. डमरुच्या शीळे पासून  दोन वाव अंतरावर  गद्धेगळ-  (गर्दभाशी समागम करणारी  स्त्री आकृती)कोरलेली होती. डमरुच्या मागच्या बाजुला असंख्य खबदाडी  होत्या. त्यातल्याच  तळापासून ढोपरभरउंच  असलेल्या  एका खबदाडीतून पायाच्या आंगठ्या एवढी पाण्याची  धार पडत होती ते  म्हणजे जितवणी .  धारेचे पाणी साठवण्या साठी  दरडी पासून दोन तीनहात अंतरावर  दोन हात रुंद आणि हातभर खोलअसा  खड्डा   खोदलेला होता.  खड्डा  भरूनवहाणारे पाणी  कातळात खोदलेल्या चरातून पुढेवहात गेल्यावर  कातळात नैसर्गिक  असलेल्या कोंडीत (ढोपरभर खोलगट डबऱ्यात) पाणीसाठून पुढे  पन्हळीतून  वहात पायथ्याशी असलेल्या पहिल्या टाक्यात  जायचे. पाणी भरायला जाणारी  माणसे  या कोंडीत आपल्या कळशा हांडे बुडवून पाणी भरूनघेत असत.   (क्रमश: )