Vinashkal 2080 in Marathi Moral Stories by Utkarsh Duryodhan books and stories PDF | विनाशकाल २०८०- वाचवा आपल्या ग्रहाला

Featured Books
  • The Omniverse - Part 6

    அடோனாயின் கடந்த காலம்அடோனா திரும்பி தனது தோற்றத்தின் ஒரு மறை...

  • The Omniverse - Part 5

    (Destruction Cube) அழித்த பிறகு,ஆதியன் (Aethion) பேய்கள் மற்...

  • The Omniverse - Part 4

    தீமையின் எழுச்சி – படையெடுப்பு தொடங்குகிறதுதற்போது, டீமன்களு...

  • அக்னியை ஆளும் மலரவள் - 12

     மலரியின் அக்கா, ஸ்வேதா வருவதைப் பார்த்து, “நீயே வந்துட்ட, எ...

  • அக்னியை ஆளும் மலரவள் - 11

    “நீ கோபப்படுற அளவுக்கு இந்த ஃபைலில் அப்படி என்ன இருக்கு?” என...

Categories
Share

विनाशकाल २०८०- वाचवा आपल्या ग्रहाला

दोन हजार ऐंशी - पृथ्वीवर सर्वत्र रोबोट दिसत आहेत. जगाची मानवी लोकसंख्या दहा बिलियन आणि भारताची लोकसंख्या दोन बिलियन. आता हा विचार नक्की मनात आला असेल की, एवढ्या दशकात लोकसंख्या दहा लाखच कशीकाय? दोन हजार पन्नासच्या आसपासाच्या काळी, जगाची लोकसंख्या जवळजवळ अठरा ते वीस बिलियन पर्यंत पोहोचलेली होती. पण तेवढ्या जनतेला अन्नाचा खूप तुटवता होत होता. सर्वत्र दंगली, मारपिट, गुन्हेगारी वाढतच होती. तेव्हा फक्त दोन वेळचं जेवण मिळविण्यास माराहानी होत होती. ज्याची शक्ती जास्त तोच ह्या लढाईत जिंकायचा आणि त्यालाच पोटभर जेवण मिळायचं. काही लोकांना मिळायचं तर काही लोक भुकेच झोपी जायचे. सर्वांनी आपापल्या नोकऱ्या सोडलेल्या होत्या. सारे लोक शेतीकडे वळले होते. आपल्या घराच्या छातावर शेतीचे स्वरूप दिलेलं होत. जागा जवळजवळ संपलेली होती. पण ह्या काळात चोरीही वाढलेली होती. काही लोकांचे घर छोटे होते, ते दुसऱ्यांच्या घरांच्या वरून चोरी करून खाऊ लागलेत. म्हणून ह्यामुळे झगळे, दंगे ह्यावरून खून होऊ लागलेत. सर्वत्र जगण्याचे वांदे वाढले होते. तेव्हा जनावरांत  आणि माणसांत काहीही फरक उरलेला न्हवता. प्रत्येक देशाची सरकार ह्याच्या तोडगा काढणास असफल झालेली होती आणि लोकसंख्या आणि रोजगार वाढविण्यासही. विकासाच्या नावाखाली जंगलतोड, आपली ताकद जास्त हे दाखविण्यासाठी युद्ध आणि बॉम्ब हल्ले, आपली घरे बांधायसाठी सर्व जनावरांची घरे नष्ट करण्यात आली. एवढेच काय?, समुद्रावरही मानवी बेट निर्माण करून जलचर प्राणांचेही अस्तित्व संपुष्टात जात होते. काही लोक मंगळावर राहायला गेली होती, जी पैशांनी अमीर होती. ते तिथंलेच झाले होते. त्यांना पृथ्वीची काहीही लेण-देणं न्हवत. आता सर्वांना ठाऊक झाले होते की ही पृथ्वी येणाऱ्या काही काळात नष्ट होणार ते...  
             

                           मग साऱ्या जगाचे विचारवंत एकत्र जमा झालेत. सारे आपापले मत देऊ लागले, सारी जीव श्रुस्टी वाचविण्याचे आपापले  प्रकल्प मांडू लागले. पण पृथ्वी वाचविण्याची फक्त एकच उम्मीद त्यांना दिसू लागली. ती म्हणजे मानवी लोकसंख्या कमी करून, उरलेल्या लोकसंख्येत पृथ्वीला वाचवून ठेवायचे. सरकारच्या आदेशावरून एन्काऊंटर सत्र सुरू केलेत. जे कैदी होते, त्यांना सर्वात आधी मारण्यात आले. कारण ते होते तर कैदीच ना?, नंतर प्रत्येक देशातील प्रत्येक शहरातील गुन्हेगारीतल्या लोकांना एक-एक करून पोलीस संपवू लागलेत. पूर्ण पृथ्वीभरच्या लोकांना सांगण्यात आले की, पुढे जाऊन कुणी कुठलाही गुन्हा करता कामा नये. जर कुठलाही नागरिक जर गुन्हा करताना आढळल्यास त्याचा एन्काऊंटर करण्यात येईल , मग तो कुठलाही गुन्हा असो. चोरी असो, लूटमार असो वा खून असो, सर्वांची फक्त एकच शिक्षा ती म्हणजे मौत... प्रत्येकी नागरिकांना आदेश देण्यात आले की, लग्नानंतर फक्त एकच दाम्पत्य करावे , जर एकापेक्षा जास्त दाम्पत्य आढळून आल्यास त्यांच्या  पालकांना कैद करण्यात येईल.  त्यांनाही काही दिवसात त्यानाही मारण्यात येईल. सोबतच दुसऱ्या दाम्पत्याला कुठलाही हक्क बजावता येणार नाही. मतदान नाही, कुठलीही लस देण्यात येणार  नाही, कुठल्याही दुसऱ्या देशात जाण्यासाठी पासपोर्ट नाही वा व्हिसा नाही सोबतच कुठलेही सरकारी ओळखपत्रे मिळणार नाही. एवढेच काय?, जर कुठल्याही नागरिकास आत्ममहत्या करण्याची इच्छा असल्यास ती त्याला करण्यास वाचवायचे ते सोडून त्याला प्रवृत्त करायचे, त्यामुळे तो पुन्हा दबावात आत्महत्या करावे, ही सरकारची रणनीती. त्यामुळे असे होईल की, कुणावर केसही होणार नाही सोबतच लोकसंख्या कमी होण्यास मदत होईल. प्रत्येक माणसाला फक्त ऐंशी वर्षापर्यंत जगण्याचा अधिकार देण्यात आला. आणि प्रत्येक जन्मास येणाऱ्या बाळाचे माहिती जगभरात कॉम्पुटर वर पाठविण्यात येत होती, आणि त्याच्या बदल्यात जगातून कुठूनही एकाला मरावे लागेल, हा निर्णय सर्वत्र लागू झाला होता. पूर्ण लोकसंख्या संतुलित करण्यासाठी पाच ते सहा वर्ष लागलीत. पण हा कठोर निर्णय घेण्याचा असा फायदा झाला की, जागतिक लोकसंख्या दहा बिलियन फिक्स झाली. 



                              पण आज जरा पृथ्वीवर काही वेगळच प्रकरण सुरू आहे. काही वर्षाआधी दोन अश्या शोधा लागल्यात की ज्यामुळे पृथ्वीचे आयुष्य संपण्याच्या वाटेवर आले आहे. पहिला शोध म्हणजे, त्या पिगमेंट चा शोध लागला ज्यामुळे झाडे प्रकाश संश्लेषण करून स्वतःच अन्न स्वतः निर्माण करत होते. आता माणूसही झाडांशिवाय आपले अन्न स्वतः बनवू शकत आहेत. आता लोकांना झाडांची गरज उरलेली नाही, कारण अन्नही स्वतःच बनवू शकतात, प्राणवायूही तयार करू शकतात आणि औषधी पण काही रासायनद्वारे बनवू शकत आहेत. सर्वत्र त्याचेच कारखाने बनले आहेत. याद्वारे ते पैसेही कमवू शकतात, आणि झाडांची जागा स्वतः ठेऊ शकतात. ह्यामुळे झाले असे की, सर्वत्र झाडांची कत्तल करण्यात येत आहेत. पक्षी प्राणाची काही काळजी तर राहिली नाहीच, कारण ते आज कुठेही पाहायला मिळणार नाही. त्यांना बघायचे असेल तर एखाद्या संग्रहालयात जावे लागते, किव्हा एकविसाव्या शतकातल्या सुरवातीचे टीव्ही प्रोग्राम बघून संतुस्ट व्हावे लागेल. ऐवढेच काय हो?, आज तर पाळीव कुत्रेही वाचले नाहीत. त्यांच्या ऐवजी रोबो डॉग सर्वत्र उपलब्ध आहेत. त्यांच्याविषयी मला विशेष सांगता येणार नाही, पण काही वर्षात तुम्ही वाचकास कळणार आहे, काय असते असले डॉग...
                            दुसरा शोध म्हणजे, अश्या पेशींचा शोध लागला आहे, ज्याद्वारे लोक कितीही वर्ष जगू शकतात. माझ्या मते ती जेलिफिशच्या पेशींतून प्रेरणा घेण्यात आली आहे. ह्याचा अर्थ असा आहे की, जी लोक श्रीमंत आहेत, विद्वान आहेत, जे कामाचे लोक आहे, त्यांचा मृत्यू आजसाठीतरी कधी होणार नाही. 
                            आज लोक पृथ्वीला पकडून पाच ग्रहावर राहतात. मंगळावर आज कैदी कैद आहेत. आधी तिथे जायला वर्षे लागायची, पण आज मात्र पाच मिनिटात तिथे पोहोचल्या जाऊ शकते. तो मार्ग म्हणजे, तुम्हाला मी समजविण्याचा प्रयत्न करतो,  पाच मिनिटांची जी व्हीडिओ तुम्ही पाहता, त्या व्हीडिओ जोडायला किती इमेजेस लागतात माहिती आहे काय? म्हणजे व्हीडिओच्या प्रत्येक क्षणाचे इमेज किती होतात माहिती आहे काय? कमीत कमी, पाच लाख! त्यांना पिक्सलही म्हणू शकतात. त्या सर्व इमेजला जोडल्या गेले तर एक व्हीडिओ तयार होतो, त्याप्रमाणे मंगळ आणि पृथ्वी ह्यांचे मधील पिक्सलला(photon) जोडून तिथे व्हीडिओ सारखे जाण्यास एक डिव्हाईस मदत करते. दुसरा ग्रह, पृथ्वीपासून खूप दूर आहे. तिथे फक्त अफाट श्रीमंतच राहु शकतात. तिसरा ग्रह म्हणजे ब्युताना तो पण दूर आहे. तिथे रेडिएशन जास्त असल्याने तिथे रेडीएशनला रेसिस्ट करणारेच राहू शकतात. चौथा ग्रह चिप्रा आहे, तिथे परग्रहावरील जीव आणि माणसे मिळून राहतात. तिथे फक्त vip लोकांनाच यायला परवानगी आहे. तो ग्रह स्वर्गातूनही सुंदर आहे असे म्हटल्या जाते. पाचवा ग्रह कुणाला माहीत नाही पण, शास्त्रज्ञाच्या मते जशी पृथ्वी नष्ट होईल, सर्व लोकांना सरकार तिथंही घेऊन जाणार आहे. आणि ऐकण्यात आले की तो ग्रह नरकापेक्षा भयावह आहे. पण काही लोक आहेत तिथेही. पृथ्वीतर नष्ट होण्याचा मार्गावर आहे. माझ्यामते पृथ्वी २१०० बघू शकणार की नाही, ह्याचीच मला भीती वाटत आहे. 
                            किती आश्चर्याची गोष्ट आहे ना?, माझ्या वडिलांनी उडणारा खरा पक्षी बघीतलाय म्हणे. आम्ही तर त्यांना स्क्रीनवरच बघतो. आज आम्ही चौथ्या परिमाणात प्रवेश घेतला आहे. म्हणजे 4D जिथे आम्ही भिंतीवरही चढू शकतो, उलटे चालुही शकतो, दाही दिशांवर नजर ठेऊ शकतो. पण ह्यामुळे झाले असे की, सूर्यकिरण पृथ्वीवर येत नाही. सूर्याला बघायला आम्हाला आकाशात जावे लागते. मी आखरीवेळेस सूर्य दोन महिन्यांपूर्वी बघितला होता. खंत अशी आहे की परमाणू हल्ल्यात चंद्र नष्ट झाला आहे, आज कृत्रिम चंद्र आहे, पण तो काय कामाचा?
                             पण मला असे वाटते की पृथ्वीला लोकांनी कचराघर बनविले, आपल्या स्वार्थासाठी. पण त्यानाही ठाऊक न्हवते की, ते स्वतःच्याच पायावर कुर्हाड मार्ट आहे ते. झाडाला, निसर्गाला नष्ट करून काय मिळाले?, हा आजचा दिवस?, त्यांना वाटलं झाडांशिवाय आपण जगू शकतो, आपण स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतो. पण हे ठाऊक न्हवते की, निसर्ग ही प्रजा आहे, आणि माणूस हा राजा! राजाची जबाबदारी ही असते की, प्रजेची काळजी घेणे, त्यांना सर्व सुख सुविधा आपल्या तर्हेने देने, नाही की, त्यांना लुटणे. आपल्या स्वार्थापुढे ते विसरले की, त्यांना राजा प्रजेणेच बनविले आहे. म्हणून आज तीच प्रजा ज्याच्यावर राजाने अत्याचार केले, त्याला पाठ शिकवायला प्रजेने त्याला बाद करायचे ठरविले आहे. 


                             तर मी तुम्हाला हे का सांगत आहो, कारण मी २०८० तलाच प्यादा आहो. मी आत्ता काही लिहिलेले भूतकाळात पाठविण्याची मशीन विकसित केलेली आहे. मला इथे सर्व सुविधा असूनही मी सुखाची आशा करत आहो. मला तुमच्यासारखे जगायचे आहे, लोकांसोबत, प्राणिमात्रांसोबत, झाडांसोबत आणि निसर्गसोबत. मला वाटत नाही की हे माझे स्वप्न सत्यास उतरेल म्हणून, पण तुम्हाला आग्रहाची विनंती आहे की, तुम्ही कितीही मोठे व्हा, कितीही संशोधन करा, पण निसर्गावर कधीही अन्याय करू नका. झाडांना तोडू नाका, प्राणिमात्रांच्या घरावर घात घालू नका. काय कराल एकटे जगून अश्या नरकात?

(ही फक्त एक कथा आहे, पण आपण सुधारली नाही तर ह्याला सत्यात उतरायला काही वेळ लागणार नाही)




उत्कर्ष दुर्योधन लिखीत...