23
.. 
.. 
.. 
.. 
.. 
.. 
.. 
..... 
... 
सानू केबिन मधेच विचार करत बसली होती 
तिनी जरी अवी आणि अनु ला सांगितलं होतं तरी तिला आता टेन्शन आलं होतं कि अभि खरंच कसं रिऍक्ट करेल 
ती त्याला मनवू शकेल का..?? 
तिला काय करावं काहीच सुचत नव्हतं 
तिनी टेबल वर डोकं ठेवलं 
विचार करून करून डोकं बधिर झालं होतं 
रोज नवीन काहीतरी असतंच 
आयुष्य हे असंच असतं एक युद्ध संपलं कि दुसरं सुरु 
आणि असं म्हणतात ना देव त्याला जास्त खेळवतो जो उत्तम खेळाडू असतो 
सानू ला आता अस्वस्थ वाटत होत शेवटी तिनी सुमेध ला कॉल केला 
पण नेमकी त्याची मिटिंग चालू होती त्यानी नंतर कॉल करतो म्हणून मेसेज केला 
सानू ला आज जास्तच अस्वस्थ वाटत होतं 
खरं तर ती बिचारी थकली होती 
प्रत्येक वेळेस काही झालं तर सगळे पहिली सानू कडे येतात 
पण तिला कोणी समजून घेत का 
तिला खूप काही बोलायचं असतं पण कोणाला सांगणार 
सुमेध दिवसभर दमून जातो 
आणि आपल्या मुळे कोणाला त्रास द्यायचा हे सानुला जमत नाही 
ती जे काही ए सगळं मनात साठवत राहते 
टेबल वर डोकं टेकवून नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते 
ती खरंच दमली होती.... 
सगळ्यांना समजून घेणं 
आणि.... 
सगळ्यांना समजून सांगणं 
नकोस झालं होतं तिला सगळं 
फोन च्या आवाजाने ती विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली 
सुमेध चा फोन होत... 
तिनी कॉल रिसिव्ह केला... 
हा सानू यार सॉरी मिटिंग होती ग म्हणून कॉल नाही रिसिव्ह केला सो सॉरी बच्चा........  सुमेध 
इट्स ओके मी काही बोलले का.....  सान्वी 
सानू तू रडतेस काय झालंय पिल्लू कोणी काही बोललं का ऑफिस मधे काही झालंय का 
मी  येऊ का तिकडे.....  सुमेध 
नाही मी नाही रडत ए रे काहीही काय 
इकडे येऊ का म्हणे येडू काहीच नाही झालंय....  सान्वी 
बच्चा खोटं बोलू नकोस मला तर सांग ना काय झालं ए 
सानू विचार करत होती आवाजावरून पण याला समजल का...??  🙄🙄
सानू ऐकतेस का तू बोल ना पिल्लू काय झालं...  सुमेध 
सुमेध च्या आवाजानी ती भानावर आली... 
अ हा अरे ते अवी आणि अनु.... सान्वी 
हा त्यांचं काय येडू ते काही बोलले का 
बच्चा पटकन बोल ना ग मला टेन्शन येतंय.....  सुमेध 
ती अविनाश आणि अनुश्री बद्दल सगळं सांगते 
आणि अभि ला समजवायचं टेन्शन आलं ए असं सांगते 
बच्चा ऐक अभि नक्की ऐकेल तो इतका सेल्फिश नाही ए 
मी पण सांगेल अभि ला  बट तू या मुळे नाही रडत ए ना 
तू खूप स्ट्रॉंग ए आय नो 
तू या साठी नाही रडणार 
मला माहिती ए तुझी खूप ओढाताण होते ए ना 
काहीही झालं कि तुला च ते सॉर्ट करावं लागतं 
आय नो तू थकली अशील ना सगळयांना समजावून सांगून आणि समजून घेऊन...  सुमेध 
सुमेध तर मन वाचावं तसं बोलत होत 
सॅमी तुला कसं कळलं म्हणजे 🙄🙄🙄😲😲😲
अरे बाबा एवढं तर ओळखतो मी तुला 
तू कधीच काही सांगत नाहीस 
सगळं मनात ठेवते आणि मग असं रडू येत तुला आज नाही ओळखत मी तुला 
समजलं...?? ......  सुमेध 
अं...  हो....  सान्वी 
सानू बच्चा मला तर सांगत जा ना ग तुला उगाच त्रास होतो ना 
प्रॉमिस कर सगळं सांगणार ए तू मला... सुमेध 
हो मी ट्राय करेल....  सान्वी 
ओके गुड....  आणि बाय द वे आज किती दिवसांनी सॅमी म्हंटली ए तू मला माय गॉड.....  सुमेध 
हा अरे ते बोलता बोलता....  जस्ट....  सान्वी 
ओ अच्छा यार पण मस्त वाटलं  ऐकून बच्चा असे किती नाव ए माझे जे फक्त तूच बोलते आणि तूच दिलेले ए ते 
🤗🤗🤗🤗🤗🤗
त्यानी बरोबर विषय बदलला होत...  😇😇😇
हा मग काय झालं बेस्ट फ्रेंड् ला नवीन नाव नाही दिल तर काय कामाची फ्रेंड्शिप.... 😜😜😜😜....  सान्वी 
हो का डंबो.... आणि विसरू नकोस आत्ता नुसता बेस्ट फ्रेंड् नाही ए मी 🤭🤭🤭😅😅😅.... सुमेध 
ओ अच्छा आता डंबो... 🤨
संध्याकाळी बाबांना सांगते थांब काय काय नावाने बोलतोस तू मला ते ....  सान्वी 
वा ग शहाणे तू काय काय बोलतेस ते चालतं मी एकदा बोललो तर लगेच बाबा ला सांगणार
ए जा बाबा असं कोण करतं 
मी किती प्रेमाने बोलतो तुला बच्चा पिल्लू आणि तू ....... सुमेध 
😒😒😒😏😏😏😏😏
अरे बाबा सॉरी गंमत केली ना रे... प्लीज सॉरी ना येडू......   सान्वी 
हा ठीके चल माफ किया बच्ची को....  😜😜😜....  सुमेध 
आता बस सॅमी किती नौटंकी करतो रे चल कामं कर आता बस झालं संध्याकाळी मोठी मोहीम पार करायची ए 
गुड गर्ल....  अशीच स्ट्रॉंग रहा बाकी मी तुझ्या सोबत आहेच 
आणि आयम डॅम शुअर अभि नक्की ऐकेल डोन्ट वरी...  सुमेध 
होप सो...  सान्वी 
येस चल बाय टेक केअर ओके.. सुमेध 
येस यु टू... ☺️.... सान्वी 
सान्वी नि  फोन ठेवला आणि चेअर वर मागे टेकून बसली 
बऱ्यापैकी रिलॅक्स वाटत होतं तिला 
पुन्हा उत्साहाने ती कामाला लागली 
..
..
.
..
थोड्या वेळाने अभि ला कॉल केला.. 
हाय अभि कसा आहेस.....  सान्वी 
मी मस्त ए सना बोल तू काय म्हणते....  अभिजित 
अरे तुझ्या शी एका इम्पॉर्टन्ट विषयावर बोलायचं होतं तर आज संध्याकाळी घरी येशील का प्लीज....  सान्वी 
सगळं ठीके ना काही सिरीयस....  अभिजित 
अरे नाही सगळं ठीके तू येना संध्याकाळी प्लीज....  सान्वी 
ओके ओके येईल मी डोन्ट वरी....  अभिजित 
अनु ला पण घेऊन ये...  सान्वी 
ओके बाबा तिला पण आणतो खुश....  अभिजित 
ओके देन सी यु सून....  सान्वी 
या ओके बाय देन.... अभिजित 
बाय टेक केअर...  सान्वी 
एवढं बोलून ती फोन ठेवते... 
कितीही नाही म्हंटलं तरी आज पहिल्यांदा तिला अभि ची भीती वाटत होती 
😥😥😥😥😥😥😥😥😥
..
..
..
..
..
..
..
..
.
.
( खूप सॉरी आजचा भाग खूप छोटासा आहे पण हात सुजला असल्याने जास्त टायपिंग करता नाही येत ए 
प्लीज समजून घ्या खरंच सॉरी ...  😔😔😔😔)
..
.
.
.
(लवकरच पुढील भाग पोस्ट करायचा प्रयत्न करेल.... 
तो पर्यंत तुम्ही नक्की सांगा कथा कशी वाटली... 
काही चुका असतील तर समजून घ्या... 
सान्वी आणि सुमेध अभिजित ला मनवू शकतील... 
बघूया पुढच्या भागात..........  )

.
.
☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️
.
सगळ्यांनी खुश राहा आणि घरीच राहा...  🤗
.
.
.
.
.
.
.
.
.
आत्ता साठी बाय बाय.........  🙂☺️
..
..
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
                   - सुकन्या जगताप....... 😘