When a boy loves truly.. in Marathi Letter by aadarshaa rai books and stories PDF | When a boy loves truly..

Featured Books
  • 99 का धर्म — 1 का भ्रम

    ९९ का धर्म — १ का भ्रमविज्ञान और वेदांत का संगम — 𝓐𝓰𝓎𝓪𝓣 𝓐𝓰𝓎...

  • Whispers In The Dark - 2

    शहर में दिन का उजाला था, लेकिन अजीब-सी खामोशी फैली हुई थी। अ...

  • Last Benchers - 3

    कुछ साल बीत चुके थे। राहुल अब अपने ऑफिस के काम में व्यस्त था...

  • सपनों का सौदा

    --- सपनों का सौदा (लेखक – विजय शर्मा एरी)रात का सन्नाटा पूरे...

  • The Risky Love - 25

    ... विवेक , मुझे बचाओ...."आखिर में इतना कहकर अदिति की आंखें...

Categories
Share

When a boy loves truly..

मनातल आभाळ, भरून गेलेल,
संध्याकाळ,...अंधारून आलेल अंगण,
आणि मग पाऊस ... मुसळधार...
लॅपटॉप वर विसावलेली नजर आणि सोबत वाढत चाललेला पाऊस ..खूप दिवसांनी काहीतरी लिहावस वाटलं..तूला मी आठवत असेन ..कदाचित नाही सुद्धा..

प्रिय ..

हा एकच शब्द लिहून मनाच्या तळावर अनेक उसासे उतू गेले..

प्रिय .. खरतर प्रिय लिहावे कि नाही यात दोन रात्री गेल्या
...तरी रखरखत्या उन्हात,
पावसाची सर बनून राहिलेल्या क्षणांच कर्ज असल्याने, लिहतो आहे. खूप दिवसांनी लिहतो आहे.तुझ्या नंतर हा पाऊसही दरवेळच्या जुन्या होत चाललेल्या जखमांचा पसारा मनावर कोरून जातो
हल्ली तुझ्यासारखा रिमझिम बरसत नाही
मुसळधार होत जातो क्षणाक्षणाला
आणि अचानक मग रागावून निघून जातो पाऊस
हा ही गुन्हा माफ कर...
आणि उत्तरांना नख लावून पाठवू नकोस ग. आजकल मन हळवे आणि तळवे ओले ओले असतात... तसही लिहून लिहून काय लिहणार आहे मी.
तू... कशी आहेस तू..तुझ्या पेंटिंग्ज पाहतो मी..... अस काही नियमित नाही. तू गेल्यापासून थोडा जास्तच आळशी झालो आहे. नाही.. तक्रार नाही मी करत..तूझ्या काही तुकडयांमधे मी असेन अजूनही..... अशी मी अपेक्षा ठेवली तर...
तर..
चिडशील का ग ? तू चिडशील हे आठवून आज कित्येक दिवसांनी ओठांना हास्याचा स्पर्श झाला..
...तू चिडल्यावर त्रागा त्रागा करशील...आणि चालू होतील तुझ्या अस्वस्थ फेऱ्या.. किचन पासून हाॅल च्या दारापर्यंत...मग विस्कटलेला टेबलक्लाॅथ सरळ करशील..आणि माझ्या उष्टया चहाचे कप विसळत रागाचे उसासे सोडत राहशील...
फ्लॉवरपाॅट चा तिरका झालेला कोन तरीही तुझ्या नजरेतून सुटत नाही..आणि जाता जाता सोफ्यावर पडलेले माझे साॅक्स ही उचलून ठेवशील...तूला सगळ. कस अगदी नीटनेटक लागायच नाही..

..sorry
काय काय लिहत गेलो मी.. तुला पुसताच येत नाही ग.
माझ्या आयुष्याच्या कॅनव्हासवर तू ठसठशीत रंगानी उरून गेली आहेस..तूझ्या तीव्र शिस्तीच्या स्वभावसारखीच..

तस मी काहीच मिस करत नाही ..पण ...वाटत राहत कधी कधी अपूर्ण अपूर्ण..

माझ्या आजूबाजूला कोणीच दुःखी दिसायला तयार नाही..श्वास घेतले श्वास सोडले इथे जगणे थांबत नाही..अगदीच एकटं एकटं वाटत राहत तूझ्याशिवाय..मग हा अंधार सोबती झाल्यावर कुठल्यातरी खिडकीजवळ बसून ..रेड वाईन चे पेग वर पेग रिचवून.. त्या नशेत मी तूला आठवल ..तर बिघडल कुठे..

एक ते आयुष्य होत ..जे आपण वेगवेगळ कधी जगलोच नाही..अशा नोंदी मनात केल्या तर ते तूला समजणार ही नाही.. ... नाही?

किती तास..दिवस अनेक क्षण..

नशा उतरल्यावर ही.. तू.. तुझा चेहरा..अगदी तूझ्या कानापाठीमागे असणाऱ्या तिळासहीत माझ्या मनावर रेंगाळत राहिला तरी तूला काहीच फरक पडणार नाही..

केसांची घट्ट पोनीटेल बांधून..तू ओटयाजवळ माझ्यासाठी कपकेक बनवत असलेली मला आठवत राहशील.. अगदी तूझ्या परफ्यूम सहित ...मग मला वाटेल मी जिवंत आहे

तस मी काहीच मिस करत नाही..

मी हल्ली खिडकीतूनच भेटत राहतो थंड वाऱ्यांना आणि ऊन्हाच्या कवडश्यांना..कोमेजलेली फुलंही मी जपत नाही आता डिक्शनरी मधे... उगाच दरवळ राहतो मागे जीवघेणा

तू जाळीदार पडद्यांमागे लावलेल्या कसल्या कसल्या दिव्यांचा
प्रकाश पडत राहतो..मग मला अजूनच अंधारलेल वाटत राहतं...मी बदलले नाहीत पडदे..राहून गेल ते तसच..
जशी तू राहून गेलीस माझ्याजवळ..
तूझ्या तीव्र सुगंधित स्वभावसारखीच..
मग असे गंधाळलेले गुन्हे मी केले तर बिघडल कुठे..

मी आतून तुटून गेलोय असही नाही..
पण वाटत राहत कधीकधी अपूर्ण...

आणि तू आवडीने सजवलेल्या बुकशेल्फ ला मी हातही लावत नाही.. धूळ जमलीये त्यावर..पण त्याखाली तुझा स्पर्श आहे तो जपून ठेवेन मी..

..हे लिहिणं..या जखमांना भळभळू देणं यासाठी की.. जाताना तू तुझा मोरपंखी झुमका गॅलरीतल्या रोपावर विसरून गेलीस..तो तूला परत करेन.. त्याला जपून ठेवण्याचा अट्टाहास मी करून पाहिला पण एकच जखम कितीवेळा भळभळू द्यायची.
जखम भळभळू दिली तर वेदनेची सवय होते..जखम बरी होत नाही..

तस मी काहीच मिस करत नाही..
पण वाटत रहात असच काहीबाही
कधीतरी...