absence in Marathi Short Stories by Hiramani Kirloskar books and stories PDF | विरह

Featured Books
  • The Devil (2025) - Comprehensive Explanation Analysis

     The Devil 11 दिसंबर 2025 को रिलीज़ हुई एक कन्नड़-भाषा की पॉ...

  • बेमिसाल यारी

    बेमिसाल यारी लेखक: विजय शर्मा एरीशब्द संख्या: लगभग १५००१गाँव...

  • दिल का रिश्ता - 2

    (Raj & Anushka)बारिश थम चुकी थी,लेकिन उनके दिलों की कशिश अभी...

  • Shadows Of Love - 15

    माँ ने दोनों को देखा और मुस्कुरा कर कहा—“करन बेटा, सच्ची मोह...

  • उड़ान (1)

    तीस साल की दिव्या, श्वेत साड़ी में लिपटी एक ऐसी लड़की, जिसके क...

Categories
Share

विरह

केदार हॉटेल ओरियंटल प्लाझाच्या रुम नंबर 307 मधून बाहेर पडला तेव्हा रात्रीचे 9:30 वाजले होते. गेल्या काही दिवसात कामाच ओझ वाढल्यामुळे तो थकला होता. त्यात आज ठरलेल्या वेळेत समोरचा क्लाईन्ट नाही आला याचा त्याला राग होता. वैयतागत त्याने आपला कोट उतरला. टाय ढिली करत गळ्यावरच शर्टाच बटन काढल आणि तो स्वतःशीच पुटपुटत होता. असल्या लोकांना दुसऱ्याच्या वेळेची किंमतच नसते. साला यांच्यासाठी थांबा. काय हव नको ते बघा. ऐ वन प्रेझेन्टेशन करा. डील करा. नाहीच झाल तर बाॅस आहेच आपली मारायला तयार. गेल्या तीन वर्षात असे खुप सारे प्रसंग आले, खूप सार्‍या लोकांशी संपर्क झाला. पण समोरच्या कंपनीचा येवढा दिरंगाई आणि निष्काळजीपणा त्याने पाहिला नव्हता. साधा फोन करून बोलता येत नाही या लोकांना आज उशिर होईल मिटिंग उद्या करु. खूप झाली यांची नाटक, आता डील करायला यायच्या आधी यांना थोड नाचवायला हव. त्याच पुटपुटनं बघुन लॉबी मधून चालत असताना बाजूने जाणारा रुमबाॅय त्याच्या जवळ विचित्र नजरेने बघत पुढे निघून जात होता. एकतर आजच्या प्रकारामुळे त्याच्या डोक्यात आधीच राग होता वर या रुमबाॅयच बघत जाण अजून राग आणत होत. तिथेच थांबून तो रुमबाॅयवर चिडला, "नवीन आहेस का इथे.?.. काय डोळे मोठे करुन बघतोस.? काम करा आपली. त्याच्या बोलण्याने रुमबाॅय गांगरून गेला... हातातली ट्रॉली जोरात ढकलत मागे-पुढे बघत गोंधळत निघाला. " काय एक एक नमुने आहेत इथे?" स्वतःशीच बोलत तो लिफ्ट मध्ये आला. तस हाॅटेल ओरियंटल मध्ये त्याच आठवड्यातून एक-दोन वेळा येण-जाण होत असायच. कंपनीच्या गेस्ट क्लाईन्ट साठी हा रुम कंपनी कडुन बूक असायचा. त्यामुळे इथले मॅनेजर, वेटर, रुमबाॅय तसे ओळखीचे होते. तीन वर्ष या मार्केटिंग कंपनीत त्याला होत आली होती. त्यामुळे अशा क्लाईन्टस ला भेटण्यासाठी आता तो पुर्णपणे तयार झाला होता. स्वतःच्या मेहनतीने त्याने या पोस्टवर आपल स्थान बनवल होत. आजचा प्रकार मात्र त्याला खटकला होता.
डोक्यात राग घेऊन तो तसाच लिफ्ट मधून हाॅटेलच्या खाली रेस्टॉरंट मध्ये आला. हाॅटेल मधल्या लोकांच्या गजबजी पासून थोड दूर असलेल्या एका टेबलावर येऊन बसला. तेवढ्यात त्याला तिथे एक ओळखीचा चेहरा दिसला. हात दाखवत केदार बसलेल्या टेबला जवळ येत त्याच्या समोर उभा राहिला. केदार खुर्चीतून उठला पण त्याला काय बोलव तेच सुचेना. " दादा अरे तू इथे काय करतोस?" हे विचारताना त्याच्या चेहर्‍यावर आश्चर्य आणि डोक्यावर थोड्याशा आठ्या पडल्या होत्या. आजुबाजुला कोणी अजून ओळखीच दिसतय का? केदार बघत होता. "खूप दिवसांनी भेटतोस रे. कसा आहेस? वहिनी? अमेय?" त्याच्या बोलण्यात आलेला गोंधळ दादाला दिसत होता. " मी बसू का इथे?" दादाने खुर्ची जवळ हात करत विचारल. काही न बोलता त्याने हातानेच बस म्हणून सांगितल. त्याची नजर मात्र आजुबाजुला कोणी ओळखीच दिसत का शोधत होती. कोणीच काही बोलत नव्हत. ती शांतता तोडत दादाने बोलन सुरु केल. " अरे जेवायला आलेलो इथे. तुला बघितल म्हटल भेटूया. थकलेला दिसतोस. काम जास्त आहे का हल्ली?" पुढे मग सहज बोलण चालू झाल दोघांच. " हो म्हणजे जास्त नाही पण आहे थोड फार काम" " एकटाच आलास जेवायला? " उत्तरा दाखल केदारने प्रश्न केला. " हो रे वहिनी आणि अमेय होता सोबत पण ते पुढे निघाले. एक मित्र भेटला इथे बोलत थांबलेलो तेवढ्यात तू दिसलास. तेवढ्यात वेटर मेनू विचारायला आला. "तू काही घेतोस का? " केदार दादाला विचारल. "नको आताच झालय माझ तू घे तुला हव ते. "आॅर्डर घेऊन वेटर निघाला. पुन्हा दोघे दुर कुठे तरी बघत होते. दोघांनाही चार वर्षा पूर्वीचा प्रकार आठवत होता. मध्येच चुपी तोडत दादा म्हणाला, " आई-बाबा आले आहेत इथे." त्याने फक्त माने होकार भरला. कसला तरी विचार करत दादा म्हणाला " मी काय म्हणतो एकदा भेटना त्यांना" दादाच्या या वाक्यावर त्याच्या चेहर्‍यावरचे भावच बदलून गेले. आवाजात थोडा त्रागा दिसून येत होता." दादा प्लीज नको ना पुन्हा तेच तेच उकरुन काढुस... तुला माहितीय माझ उत्तर तेच असेल. तुला भेटल्यावर हा विषय आणायलाच हवा का मध्ये.
तेवढ्यात वेटर आॅर्डर घेऊन आला. तो निघुन गेल्यावर पुन्हा तो म्हणाला," घरातून निघताना मी बोलो होतो की आलो तर प्लाविया सोबतच त्या घरात येईन आणि ते हि बाबांनी बोलवल तरच..!!" आणि आज ही माझ उत्तर तेच आहे. दादा प्लीज या सगळ्यातून तू आणि आई भरडले जाताय माहितीय मला पण बाबांसमोर मला अजून काही बोलायच नाही." थोडावेळ शांत होत त्याचा हात घट्ट पकडत दादा म्हणाला, " ऐक मी तुला फोन करणारच होतो. पण म्हटलं भेटुनच बोलू... बाबांनीच तुला उद्या घरी बोलवलय.. मी निघतो आता म्हणत दादा खुर्चीतून उठला. " मी येईन की नाही हे नाही सांगू शकत तुला दादा प्लीज मला नाही भेटायच कुणाला" तो बोलत होता पण तोपर्यंत दादा बाहेर निघून गेला होता.

आजच्या दिवसात त्याला दादा भेटेल याची जरा ही कल्पना नव्हती. एक तर या मिटिंगस आणि त्यात हे दादाच भेटून बोलण. जेवण समोर असून त्याच जेवणारच मन उडाल. त्याने वेटरला सांगून बिल मागवल. बिल देऊन झाल तस तो आपल्या कार मध्ये येऊन बसला. चार वर्षा पूर्वीचा प्रकार त्याला आठवला. घरात प्लावियाशी लग्न करायचा निर्णय बाबांसमोर बोलल्या नंतर बाबा आणि वहिनीचे बोलण तो विसरला नव्हता. "दुसर्‍या जातीची मुलगीच भेटली चिरंजीवांना तुमच्या... आता म्हातारपणात बोलणी ऐका समाजाची... गावात तोंड दाखवायला जागा तरी राहिल का? समजावा त्याला नसती थेर डोक्यात भरलीत यांच्या..." बाबांचा सगळा राग आईवर निघत होता" तुमची काय चुक आहे म्हणा यांना नको तेवढ सुसाट सोडल तेच चुकल आमच" " अहो पण ऐका तरी तो काय म्हणतोय" आई विनवणी करत म्हणाली. " काही ऐकायची गरज नाहीये आई, आहे ते सगळं समोर आहे आपल्या" वहिनीने आगीत तेल ओतायच काम केल. तुमच्या नाही पण आमच्या घरातले हे मान्य करणार नाहीत. दुसर्‍या जातीला घरात आणाच तर आम्ही वेगळे राहू. कसलाच संबंध नको कुणाशी." अग वहिनी काय बोलतेस हे" तो आश्चर्याने तिच्याजवळ बघत म्हणाला. " काय चुकीच बोलली सुनबाई. बरोबर बोलतेय ती. अशाने लोक तोंडात शेण घालतील आमच्या. तुम्हा नाही आपल्या आई-बापाची पडलेली. पण यांनी हे तेच कराव का? " घरात फेर्‍या मारत बाबा ओरडले" बाबा शांत पणे बोलू आपण यावर" दादा सांभाळून घेत होता पण बाबांसमोर त्याच ही काही चालणार नव्हत. ताई समजूत काढू शकत होती पण तिला ही हे लग्न मान्य नव्हत. तिचा नकार आधीच स्पष्ट होता. वर तिला तिच्या घरच्यांना उत्तर द्यावी लागणार होती. " दादा, सांग त्याला स्वतःचे निर्णय घ्यायचे असतील तर ही दार कायमची बंद होतील याच्यासाठी" बोलुन बाबा आतल्या खोलीत गेले. त्याच्या मागे वहिनी अमेयला घेऊन आत गेली. ते त्या घरातल शेवटच बोलण होत त्याच बाबांशी...

विचार करता करता गाडी बिल्डिंच्या गेट जवळ आली. वॉचमन टिव्हीवर भारत विरुद्ध इंग्लंड मॅच बघत होता. त्याने हॉर्न वाजवला. तसा पळत तो गेट उघडायला आला. कारची खिडकी खाली करत त्याने वॉचमनला विचारल" मॅडम ची गाडी आली का? तो संभ्रमात पडला. त्याला काय उत्तर द्याव तेच समजेना. त्याचा वेंधळेपणा बघुन तो म्हणाला, " जाऊ दे स्कोर काय झाला सांग ?" 156 वर 2 आउट झाले. भारत बॅटिंग करत. " अरे यार हायलाईट बघतोस." डोक्यावर हात मारत त्याने कार चालू केली. कार थोडी पुढे गेली तस वाँचमन मागुन ओरडला नाही साहेब आजचीच मॅच आहे. " त्याच्या मुर्खपणावर हसत तो पार्किंग लॉट मध्ये आला. प्लावियाची कार बाजुला बघुन हसत त्याने कार बंद केली.

रुमचा दरवाजा उघडताना त्याचा आवाज होऊ नये याची काळजी घेत त्याने दरवाजा उघडला. हाॅल मधली लाइट लावली आहे तो बेड रुम मध्ये आला. प्लावीया झोपलेली होती. तिची झोप मोड होऊ नये म्हणून त्याने सावधपणे आपल्या हालचाली सुरु केल्या होत्या. बाथरुम मधुन फ्रेश होऊन तो बेडवर येवून झोपला. आजच्या दादाच्या भेटीमुळे त्याला ते सगळं पुन्हा आठवत होत. आपल्या घरातून विरोध झालाच पण प्लावियाच्या घरातून ही काही वेगळी प्रतिक्रिया नव्हती. तिला ही घर आणि नातेवाईकांना सोडाव लागल. त्यांना प्लावीयाची निवड चुकीची वाटली. दोघांना ऐकामेका शिवाय दुसरा कुठलाच आधार नव्हता. प्लाविया आधीच स्कूल टिचर होती म्हणून सुरुवातीला सगळं निभावून गेले. त्याची नोकरी लागल्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून कधी पाहिल नाही तरी ही दोघांनाही आपल्या माणसांची कमी जाणवत होती. एकमेकांना ते बोलण जमत नव्हतं पण जाणवत होत. दोघांच्या मेहनतीने साथेने त्यांनी आपली छोटीशी दुनिया बनवली होती. पण दोघांच्याही मनात मात्र एकटेपणाची पोकळी मात्र तशीच होती. मित्र मैत्रिणी होत्या पण त्या तेवढ्या पुरत्या सोबतीला असायच्या. जुन सगळ आठवत त्याला कधी झोप लागली समजलच नाही.

सकाळी 6:30 ची बेल वाजवली तशी त्याला जाग आली. बेल बंद करत तो कुशीवर परतला. बाजुला प्लाविया अजुन झोपेतच होती. चे र्यावर आलेले केस अलगद हाताने बाजुला करत तो तिच्या जवळ बघत होतो. लग्नाची चार वर्ष कधी निघून गेली त्याला समजत नव्हत पण रोज सकाळी तो चेहरा मात्र तेवढाच सुंदर दिसत होता. निरागस आणि बालिश... स्वतःशीच हसत त्याने डोक्यावर हळुवार ओठ ठेकवले आणि तो बेडवरुन उठला. फ्रेश झाला आणिदरवाजा खालून सकाळी पेपर आला तो उचलत त्याने समोरच्या टेबलावर ठेवला. मग किचनमध्ये जाऊन दोन कप गरम गरम काॅफी बनवली. दोन्ही कप हात घेऊन तो बेडरुमच्या दरवाज्यावरच थांबला. ती अजून बेडवरच होती. चेहऱ्यावर येणारे केस झोपेतच बाजुला करताना तिच त्या निरागस लहान मुला सारख्या हालचाली बघताना त्याला काॅफी कपचा गरम चटका जाणवला तसा तो पुढे येत बेडच्या बाजुच्या टेबलावर कप ठेवत. स्वतःवरच हसला. बाजुच्या खिडकीचा पडदा बाजूला करताच सकाळच कोवळ उन सरळ तिच्या चेहर्‍यावर पडल तशी ती जागी झाली. डोळ्यावर हात घेत. त्याच्या जवळ बघत हसत म्हणाली "गुड मॉर्निंग" आणि बेडवर उठून बसली. तसा तो ही मग खिडकी कडून तिच्या बाजुला येत गालवर हलकेच ओठ टेकवत म्हणाला," गुड मॉर्निंग" मागे वळून त्याने तिच लक्ष टेबला जवळ फिरवल. गरम काॅफीचे दोन कप त्याने आधीच तयार केलेले बघुन तिने ही केदारच्या गालावर किस्स केली. एक कप तिच्या हात देत तो उठला आणि तिच्या समोर येऊन बेडवर बसला. " असा काय बघतोस" काॅफिचा कप ओठाला लावत हसत ती म्हणाली. " बस दिवसभरातून हाच वेळ मिळतो मला रोज पण काय करु तुला बघून मन भरतच नाही." अच्छा सकाळी येवढ प्रेम... राँमान्टिक मुड... काय इरादा काय आहे?" कप टेबलावर ठेवत ती त्याच्या समोर येऊन बसली. तिचा हात हातात घेत," इरादा स्पष्ट आहे. म्हणत ओठ पुढे करत ओठावर टेकवणारच होता की प्लावियाने हलकेच त्याच्या थोबाडीत मारली. आणि हसायला लागली. दोघेही मस्तीच्या मुड मध्ये होते. ती बेडवरुन उठुन पळतच होती की त्याने मागुन मिठी मारून तिला अंगावर घेतल आणि दोघेपण बेडवर पडले. त्याच्या मिठीतुन सोडवून घेत," खूप झाला चावटपणा आता बस... म्हणत ती मिठितून सुटत ती हाॅल मध्ये पळाली. मागुन तो ही गेला. तेवढ्यात फोन रिंग वाजायला लागली. " अरे यार कोण सकाळीच मुड खराब करतय" म्हणून त्याने फोन उचला. " हॅलो"... डॉक्टर...कोणता... नाही हा राँग नंबर आहे म्हणत त्याने फोन ठेवला. तसाच तो बाजुच्या सोप्यावर शांत बसला मग प्लाविया त्याच्या मांडीवर येऊन बसली. डोक त्याच्या खांद्यावर ठेवत म्हणाली, " कोण होत रे?" " काही नाही ग कोण तरी डॉक्टर शोधत होता. राँग नंबर लागला." शांत का आहेस बोल ना? " प्लाविया त्याच्याजवळ बघत म्हणाली "हातात हात घेत तो म्हणाला," काल रात्री दादा भेटलेला." हम्म... काय म्हणाला? त्याला उत्तर देत ती म्हणाली. "काही नाही म्हणत होता बाबांनी घरी बोलवलय." त्याचा चेहरा हातात घेत प्लाविया म्हणाली," अजून असे किती वर्ष एकटा राहणार आहेस. शेवटी कुठुंब आहे ते तुझ. अजून किती वेळ राग धरुन राहणार आहेस? तिला बाजुला करत तो उठला. ती सोप्यावरच होती" बघ प्लाविया, गेलो तर दोघेही जाऊ नाही तर कुणीच नाही. तस ही पुन्हा तेच ऐकायला मिळणार आहे. निर्णय चुकीचा केलास. घराच नाव खाली पाडलस. ते त्यांचा मुद्दा सोडणार नाहीत आणि एक गोष्ट आहे जी मी सोडु शकत नाही... ती तू.... तु ही माझ्यासाठी घर सोडून आलीस ना!! " मागुन त्याला मिठी मारत प्लाविया म्हणाली. " समजतय रे मला पण कधी कधी वाटत मीच जबाबदार आहे या सगळ्याची..." मागेवळून तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. " वेडी आहेस का? स्वतःला का दोष देतेस तू.? आपण कुठला गुन्हा तर केला नाही ना? बदलायच असेल तर ते त्यांना बदलायच आहे. दोष बाबांच्या आणि वहिनीच्या विचारांचा आहे. त्यात तूझी काहीच चुक नाहीय. " तरी ही तू आज जाऊन भेट त्यांना.." त्याला घट्ट मिठी मारत प्लाविया म्हणाली. " नाही... तु चल बरोबर मग... जे होईल ते होईल... " तेवढ्यात प्लावियाला आठवल्या सारख झाल. " मिठीतून सोडवून घेत म्हणाली, " अरे वाजले किती," आणि ती घड्याळ शोधायला लागली. " अग काय चाललंय तुझ.... सात वाजलेत प्लाविया...." " अरे तुला सांगायला विसरले रात्री लवकर झोपले तरी उठायला झाल नाही सकाळी.... आज स्कुलची पिकनिक आहे.... तुला सांगायला विसरले. मला लवकर तयारी करावी लागणार आहे... तशीच ती घाईत बाथरुम मध्ये पळाली..." किती दिवस जाणार आहेस..?." बाथरुमच्या बाहेर उभा राहत त्याने विचारल. " नंतर सांगते" आतून आवाज आला. तसा हा बेडवर येऊन पडला. बाथरुम मधुन बाहेर येऊन ती चेन्ज करतेय म्हणून हा बाहेर थांबला. तिची सकाळी घाई गडबड बघुन तो म्हणाला," किती वेळा बोलो तुला तरी अईन वेळेला तुझ सगळ मसांगन असत. " बेडरुम मधून बाहेर आली तशी ती म्हणाली," साँरी ना बाबा....तुला माहितीय ना सगळ." " हा म्हणून तर टिकलोय येवढे दिवस." तो हसत म्हणाला. "अच्छा अस आहे का? मग तर उपकारच केलेस माझ्यावर..." दोन दिवसांत परत येतेय घराचा कचरा करु नका म्हणजे झालं.... आणि हो आज बाबांना भेटुन ये. " "बर... दोन दिवस काय? मग तर आता सुट्टीच घेतो." तिने आश्चर्याने विचारल " का? " तो मग हसत म्हणाला," बायको घराच्या बाहेर आहे म्हणजे...." " दुसरीला आणायचा विचार ही करु नकोस महागात पडेल... रान मोकळ वाटल का तुला? तिच रागवण बघून त्याला अजून हसू आलं. "हसण बंद कर नाही तर" हाताला हेअर ब्रश तिने त्याच्यावर फेकुन मारला. " अग हळु लागेल तो मला." तयार करुन ती दरवाजावर आली. हातात बँग घेऊन तशीच उभी राहत म्हणाली... जाताना कशाला तोंड कडु करुन घेतोस रे.... अरे मस्करी करतोय गं.... अच्छा तोंड गोड करु ठिक आहे. म्हणत तो तिच्या जवळ आला आणि ओठावर किस केली. घट्ट मिठी मारत डोक्यावर किस करुन म्हणाला.... लवकर ये....आणि निट जा पोचलीस की फोन कर आठवणीने...." दरवाजा उघत ती बाहेर जात म्हणाली....दोन दिवसाचा प्रश्न आहे फक्त.....बाहेर जेवू नकोस बाईला बोलवलय. आणि साॅरी तुला सांगायला विसरली..." हम्म.... आता बस झाल मॅडम उशीर होतोय तुम्हाला..... जास्त घाई गडबड करत नको जाउस आणि कार घेऊन जा...." बघते....टॅक्सीने जाईन मी ओके.... बाय म्हणत तिने दरवाजा बंद केला. न राहून तो पुन्हा बाहेर आला ऐक कार घेऊन जा आणि फोन करायला विसरू नकोस.... तोपर्यंत ती लिफ्ट मध्ये गेली होती. दरवाजा बंद करुन तो आत आला. टेबलावरचा पेपर उचलून तो काॅफीचा कप घ्यायला बेडरुम मध्ये गेला... तेवढ्यात पुन्हा फोन वाजला.... हाॅल मध्ये येऊन फोन उचले पर्यंत तो कट झाला.... कोणाला सकाळी धाड भरली कोणास ठाऊक? म्हणत त्याने आॅफिसला जायची तयारी चालू केली.... बाथरुम मधुन आंघोळ करून बाहेर आला तेव्हा स्वयंपाक घरात बाई नाश्ता बनवत होती... आश्चर्याने तिला बघत त्याने विचारल," तुम्ही कधी आलात... अचानक आलेल्या आवाजाने ती चमकली... शब्द जोड त्याच्या जवळ आश्चर्याने बघत ती म्हणाली, आताच आली साहेब, म्हणजे मॅडमांनी जाताना चावी दिलती माझ्या जवळ...." येवढ बोलून ती आपल्या कामात गुंतली... नाश्ता झाल्यावर तयारी करुन तो आॅफिसला निघाला...

आॅफिस मध्ये जाते वेळी प्रत्येक जण त्यालाच बघतोय अस त्याला वाटायला लागल.... आॅफिस मध्ये आल्या नंतर ही स्टाफच बोलण बंद झाल होत.... प्रत्येक जण पहिल्यांदा बघतात तसेच बघत होते त्याला अस वाटल.... बाजुने जाणार्या आॅफिस बाॅय ला पकडुन विचारल.... " काय रे काय झाल आॅफिस मध्ये... बाॅस सकाळीच भांडून आला का बायकोशी?" आॅफिस बाॅयला काय बोलाव सुचत नव्हत... नाही सर... म्हणत तो गडबडीत तिथून निघून गेला... कमाल आहे आज सगळे असे आडमुठेपणा का करतात... स्वतःशीच बोलत तो आपल्या टेस्कवर येऊन बसला... कालच्या मिटिंगचा गोंधळ अजून त्याच्या डोक्यात चालत होता. शिपायला बोलवून त्याने त्या कंपनीची फाईल मागवली...तेवढ्यात शुक्लाने बाॅस आत बोलवतोय म्हणून निरोप पोचवला.... झाल..!!! सकाळी बिना पाण्याची सुरुवात करतोय म्हणत तो बाॅसच्या केबिन जवळ उभा राहिला...दरवाजा उघडताच बाॅसने आत बोलवल.... त्याला बसायला सांगत त्याने फोन करुन शुक्लाला आत बोलवल.... " सर कालच्या मिटिंगमध्ये ते आले नाहीत..." बाॅसने हातानेच थांब म्हणत दरवाज्यावर उभा असलेल्या शुक्लाला आत बोलावल... मग त्याच्या जवळ बघत म्हणाला," तु जुन्या फाईल्स का मागवतोस पून्हा पुन्हा..." बाॅस काय बोलतोय तेच त्याला समजत नव्हतं... दोन सेकंद थांबत "माहितीय तूझ्यावर सध्या किती प्रेशर आहे... आम्ही समजू शकतो... पण याचा परिणाम कामावर होतोय..." " नाही सर मी माझे प्रयत्न करतोय.... फक्त मागील वर्षात कंपनीचा रेकॉर्ड बघण्यासाठी मी फाईल्स मागवल्या...." पुन्हा मध्येच त्याला थांबवत बाॅस म्हणाला, "हे बघ तू दोन दिवसांची सुट्टी का घेत नाहीस? थोडावेळाने होईल सर्व ठीक... मित्रांना भेट.... घराच्यांसोबत वेळ घालव.... तुझ काम शुक्ला सांभाळेल तु येई पर्यंत...." " पण सर खरच गरज नाहीये त्याची" तो समजत नव्हता की दोन-तीन मिटिंगस मध्ये समोरच्या कंपनीच्या निष्काळजीपणाचा मला का दोष मिळतोय. " कस आहे की अशावेळी कामच ओझ जास्त कसल की चुका होतात.... तू चांगला अॅम्पलाॅई आहेस.... पण थोड स्वतः जवळ लक्ष देण गरजेच आहे... पुढे तो काहीच बोलला नाही... केबिन मधुन बाहेर जाताना कुणाच्या डोळ्यात खुपल असेल माझ वागण आॅफिस मधून बाहेर पडताना तो प्रत्येका जवळ संशयाने बघत जात होता. तशाच संशयाने बाकीचे त्याच्याजवळ बघत होते. यार बाॅसला हि आजच वेळ भेटला बोलायला... सगळी शुक्लाची करतुत असेल... आता जायच कुठे? हा प्रश्न त्याला तसावत होता.... सुट्टी तर मिळाली पण प्लाविया बाहेर आहे.... मित्रांना काँल केला तर ते ही कामावर असतील... विचार करता करता त्याने गाडी चालु केली....

एका बिल्डिंगच्या गेटवर गाडी त्याने थांबवली....आत जाऊ की नको विचार करत असताना.... गेटवरच्या गार्ड ने पुढे जाण्याचा इशारा केला.... नाईलाजाने त्याने गाडी गेटच्या पार्किंग लॉट मध्ये लावली. लिफ्ट आठव्या माळ्यावर येऊन थांबली... समोरचा बंद दरवाजा बघत तो मागे फिरणार होता... पण आता आलोच आहे तर म्हणत त्याने बेल वाजवली.... दरवाजा दादानेच उघडला.... हसत त्याला आत बोलवत म्हणाला, " अरे ये आम्ही तुझीच वाट बघत होतो... " " तू आॅफिसला गेला नाहीस? " त्याने आश्चर्याने दादाला विचारल... नाही आज सुट्टी घेतली बस ना... म्हणत तो आत गेला... तशी आई बाहेर आली... डोळे पदराने पुसत दादा तिला आधार देत कानात काही पुटपुटत होता.... वहिनी सोबत अमेय होता पण नेहमी सारखा काका म्हणत मांडीवर येऊन बसला नाही. वहिनीच्या मागे लपत चोरुन बघत होता... त्याच्या अशा चाळ्यानां बघुन त्याला हसू आलं. वहिनीने खोट हसुन मानेनेच कसा आहेस विचारल. त्याने ही खोट हसत ठिक आहे होकार दिला. बाबा मात्र दिसत नव्हते.... आई येऊन बाजुच्या सोप्यावर बसली.... वहिनीने पाणी आणत समोरच्या टेबलावर ठेवल....आणि किचनच्या दरवाज्या जवळ अमेयला घेउन उभी होती... दादा आईच्या बाजुला बसला.... सगळे एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत होते...कुणीच काही बोलत नव्हत...पाण्याचा ग्लास उचलला आणि ." त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली... बाबांना काही झाल नसेल.ना.? पाण्याचा ग्लास तसाच खाली ठेवत त्याने दादाला विचारल..." दादा काय झालय? ठिक आहे ना सगळ..? " हो रे" त्याच्या पाठीवर हात ठेवत दादा म्हणाला. " बाबांना काही... कुठे दिसत नाहीत?" त्याने पुन्हा प्रश्न केला. अरे नाही...प्रवासात थोडे थकलेत ते आत आहेत... येतील ते." तु जेवलास का? म्हणजे आपण आधी जेवू मग आरामत बोलू..काय?" दादा उठून वहिनी जवळ जात होता तेवढ्यात तो म्हणाला, " दादा नको जेवण मी जेवूनच आलोय... " खर तर त्याला तिथे जास्तवेळ थांबायच नव्हत. पण दादा उगाचच उशीर करतोय म्हणून तो खोटच बोलला... "अरे जेवून बोलू की खूप दिवसांनी आलास...बोलताना आईचा आवाज रडवेला होता... आई जवळ बघत तो म्हणाला, " अग रडतेस कशाला? बाबांनी बघितल तर अजून तांडव होईल." त्याच्या बाजुला येत तिला मिठी मारत म्हणाला," शु... एकदम गप्प... रडतेस काय अशी?... " आई काही बोलणारच होती पण दादाने मध्येच तिला थांबवत. खूप दिवसांनी भेटतोस ना म्हणून हे अस आहे हीच... " चेहऱ्यावरून हात फिरत तिने त्याच्या डोक्याचा मुका घेतला.. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजवली, तसा तो उठला, दादाने हाताने त्याला थांबवल, मी बघतो कोण आहे तू बस इथे" पुन्हा तो बाजुच्या सोप्यावर बसला.... "तु आजोबांच्या खोलीत जा" म्हणत वहिनेने अमेयला आत पाठवल... दरवाजा बंद करुन दादा सोबत दोन अनोळखी व्यक्ती आत आले. हाॅल मध्ये येत दादाने सगळ्यांची ओळख करुन दिली.... त्यातला एक चेहरा त्याला कुठे तरी ओळखीचा वाटला... हात मिळवत हॅलो बोलत ते दोघे समोर सोप्यावर बसले... "हे माझे मित्र आहेत..." हा माझा भाऊ म्हणत त्याने एक कटाक्ष मित्रांजवळ टाकला. तेवढ्यात पाण्याचे ग्लास घेऊन वहिनी आली. पाणी पित ते त्याच्याजवळ बघत होते. आज काही बोलण जमणार नाही म्हणून तो उठतच होता की बाबा आतुन हाॅल मध्ये आले. तशी दादाने त्या दोघांची ओळख करून दिली... त्याच्या जवळ बघत बाबा जवळ येत होते पण पुन्हा दादाने त्याला थांबवल.... सगळी फोर्मयालिटी चालली बघून तो वैतागला.... "दादा मी निघतो. आता मला नाही वाटत आज बोलण होईल. तसा ही उशीर होतोय मला.... " अरे थांब हे तुलाच भेटायला आले आहेत... बस जरा प्लिज..." त्याला आश्चर्य वाटल.... तो काही विचारणार होता तेवढ्यात दादाने पुन्हा त्यांची ओळख करुन दिली, हे माझे मित्र केशव बर्वे आणि हे डॉ. जहांगीर...." तुझ्याशी बोलायच यांना...." म्हणत दादा सोप्यावर येऊन बसला.... सगळ्याच्या नजरा आता केदारवर होत्या.... " हॅलो मी जहांगीर.... तस तुम्ही मला ओळखत असाल.... तुम्ही तुच्या भावा सोबत माझ्या क्लिनीक मध्ये आलेलात.... त्याला तेवढ काही आठवत नव्हत पण पाहिल्या सारख वाटत होत.... पुढे जहांगीर बोलु लागले " तर आपण सरळ मुद्यावर बोलू..." बर"त्याने मानेने होकर दिला. जहांगीरदांनी वही आणि पेन काढत विचारल..." प्लिज जरा आज तारीख काय आहे सांगता का? "22 ऑक्टोबर..." त्याने सहज उत्तर दिल... दोन सेकंदसाठी घरात शांतता पसरली... जहांगीर दादा एकमेकांजवळ बघत होते. एक दिर्घ श्वास घेत जहांगीर म्हणाले," मी आता तुम्हाला काही सांगणार आहे ते नीट ऐकून घ्या... तुमचा थोडा गोंधळ होतोय.... आज 30 ऑक्टोबर आहे. तो हसत म्हणाला," कॅलिन्टर नाही वाटत तुमच्या घरात...पेपर तरी येतो ना सकाळचा...आणि दादा हा काय प्रकार आहे.... कोण आहेत हे...?" मी निघतो जे विचारायच ते बाकीच्यांना विचारा....म्हणत तो बॅग घेऊन उठत होता...तेवढ्यात बाबांनी थांबवल...."पोरा...." म्हणत पुढे येत होते. दादाने पुन्हा त्यांना सांभाळ. "बाबा जरा थांबा " म्हणत दादा त्याला म्हणाला, प्लिज दोन मिनिट थांब" जहांगीर तुम्ही बोला..." तुम्हाला मागच काय आठवत ते सांगाल का? " जहांगीर म्हणाले. " दादा काय चाललंय हे...." त्याला अशा फालतू प्रश्नांची उत्तरं द्यावीशी वाटत नव्हती.... दादा म्हणाला... फक्त दोन मिनिट... ते विचारतायत त्याची उत्तर दे...." " मला सगळ आठवतय सकाळी उठलो नाश्ता केला आॅफिसला आलो आता तुमच्या समोर बसलोय.... अजून काही... काय मुर्खपणा चालवलाय तुम्ही..? " वैयतागत तो जहांगीरांना उद्देशून म्हणाला... " आणि प्लाविया?" जहांगीरांनी प्रश्न केला. थोडा संशयाने बघत तो म्हणाला, " काय? प्लावियाच काय? तुम्ही ओळखता तिला... " दादा मला वाटल हे घरगुती मुद्दे होते.... मला वाटल की यावेळी तरी काही वेगळ बोलाल तुम्ही पण येऊन मुद्दा प्लावियावरच आला...." " शांत हो दादा त्याला शांत करत म्हणाला.... मला नाही वाटत बाहेरच्या लोकांसमोर पुन्हा तेच बोलण व्हाव...यासाठी बोलवल का मला तू" " माझ्याजवळ पर्याय नाही" जहांगीर म्हणाले, दादाने त्यांना मानेने होकार दिला... आणि तो त्याच्या बाजूला येऊन बसला.... " आज 30 तारीख आहे मिस्टर केदार.. आणि 22 तारीखला प्लावियाच्या स्कुल बसचा अपघात झाला...." जहांगीर काय बोलतायत तेच त्याला समजेना.... तुम्ही स्वतः तिच्या बाॅडीला घ्यायला गेलेलात.... तुम्ही स्वतः त्या दिवशी सकाळी आॅफिस मधून घाईत निघालात होता. हा पेपर आहे 23 तारिखचा हि बातमी बघा... पेपर हातात घेत तो वाचत होता पण त्याच्या डोळ्यापुढे अक्षर नाचत होती... डोक वर करुन तो प्रत्येकाचा चेहरा बघत होता पण त्या स्पष्ट काही दिसत नव्हत... दादाच्या खांद्यावर हात ठेवत तो उठला... पण त्याला निट उभ राहता येत न व्हत. दादाच्या हाताचा आधार घेत तो पुन्हा बसला..." हे खोट आहे... सगळ....दादा अरे सकाळी ती पिकनिकला निघाली...मी तिला दरवाज्यापर्यंत सोडल.... तो शब्द जोडण्याचा प्रयत्न करत होता पण घश्याला कोरड पडली होती.... नाही नाही म्हणत तो उठला आणि बाहेरच्या दरवाजा जवळ वळला.... त्याला आता हळु हळु थोड थोड आठवत होत..... सकाळीच आॅफिस मध्ये आलेला फोन त्यानंतर हॉस्पिटल मध्ये तिच निर्जीव शरिर बघुन तो तिथेच कोसळला होता.... तो दरवाज्यावर आला आणि तिथेच कोसळला.....मागुन सगळे धावत त्याच्या पर्यंत येत होते आणि त्याच्या डोळ्यासमोर अंधार पडत होता..... तसच त्याल जहांगीरांच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले.

डॉ. जहांगीर" आतच काही सांगु शकत नाही पण त्याला मानसिक धक्का बसला आहे. तो मान्य करायला तयार नाहीय की प्लाविया आता या जगात नाहीय.... गेल्या आठवडाभर मी याचा अभ्यास केला... तो आपली रोजची काम तशीच करतोय जस की प्लाविया त्याच्या सोबत आहे. तो शेवटचा दिवस विसरु शकत नाहीय.... तो त्याच एका दिवसात अडकला आहे जिथे प्लाविया शेवटची दिसली त्याला.... तो दिवसभरातल सगळ काम करतो पण प्लाविया सोबत ही तो रोज बोलतो... त्याच मन मान्य करत नाहीय.... कदाचित त्याच्या एकटेपणात तिची सोबत होती तिला..... आता त्याला पुन्हा रिकव्हर व्हायला वेळ लागेल पण किती ते सांगता येणार नाही.... त्याला कुणाशीच बोलायच नाहीय सध्या पण तो हळुहळू बरा होईल अशी आशा करुया.... म्हणत डॉक्टर निघुन गेले.... आणि दरवाजाच्या काचेतून दादा ने आत बघितल तर तो बेडच्या बाजुच्या रिकाम्या खुर्चीशी बोलत होता......