Rakt Pishachchh - 22 in Marathi Horror Stories by jayesh zomate books and stories PDF | रक्त पिशाच्छ - भाग 22

Featured Books
  • The Devil (2025) - Comprehensive Explanation Analysis

     The Devil 11 दिसंबर 2025 को रिलीज़ हुई एक कन्नड़-भाषा की पॉ...

  • बेमिसाल यारी

    बेमिसाल यारी लेखक: विजय शर्मा एरीशब्द संख्या: लगभग १५००१गाँव...

  • दिल का रिश्ता - 2

    (Raj & Anushka)बारिश थम चुकी थी,लेकिन उनके दिलों की कशिश अभी...

  • Shadows Of Love - 15

    माँ ने दोनों को देखा और मुस्कुरा कर कहा—“करन बेटा, सच्ची मोह...

  • उड़ान (1)

    तीस साल की दिव्या, श्वेत साड़ी में लिपटी एक ऐसी लड़की, जिसके क...

Categories
Share

रक्त पिशाच्छ - भाग 22

॥…रक्त पिशाच्छ ॥18+ भाग 22

 

राझगड महालात युवराज सुरजसेन यांच्या विश्रामखोलीतल्या पलंगावर मेघाला बेशुध्वस्थेत झोपावल होत.खोलीत एक आरसा -

पलंगा पुढे आणि पलंगाच्या दोन्ही डाव्या उजव्या बाजुना दोन टेबल होते.त्या टेबलांवर दोन काचेचे कंदील जळत होते. मेघाजवळ पलंगापाशी युवराज सुरजसेन मेघाचा हात हातात घेऊन एकटक तिच्याकडेच पाहत बसलेले.

" महाराणी, आता जास्त वेळ घालवण आमच्या संयम क्षमतेच्या पल्याड आहे. तर कृपया करुन आम्हाला हे सांगा..की कोण आहे ही मुलगी? !" महाराज महाराणींच्या कानात पुटपुटले.

" तुमच्या सर्व प्रश्णांची उत्तरा आम्ही सांगतो बाबासाहेब! या बाहेर येऊन बोलुयात " मागुन यु.ज्ञी:रुपवतीचा आवाज आला.महाराज-महाराणी अस मिळुन दोघेही खोलितुन बाहेर पडले.

जाताना एक कटाक्ष यु.ज्ञी:रुपवतींनी त्यांच्या भाऊसाहेबांवर टाकला..

त्यांच्या चेह-यावर शून्यहिंत भाव होते.बाजुलाच

रघुबाबा कोणत तरी औषध कुटत बसलेले.

" हम्म बोला युवराज्ञी! काय प्रकार आहे हा!"

" बाबासाहेब ! " अस म्हंणतच युवराज्ञींनी एक -एक गोष्ट जशीच्या तशी

महाराजांसमोर मांडायला-त्यांना सांगायला सुरुवात केली. त्या तिघांच्याही बाजुला एका रांगेत प्रत्येक खोलीसमोर उभ्या लाकडी स्टैंडला लावलेला कंदील फड-फड करत जळत होता. युवराज्ञींच आतापर्यंत सगळ काही सांगुन झाल होत.

" आम्हाला ठावुकच होत. एक ना एकदिवस हे अस काहीतरी होणार आहे! नाहीतरी आम्ही उगीचंच तुम्हाला त्यांच्या समोर त्यांच्या लग्नाचा विषय काढायला सांगितल नसत ! " महाराजांनी महाराणींकडे एक धार धार कटाक्ष टाकला व पुढे म्हणाले.

" ती मुलगी गर्भवती आहे! "

" जी !" महाराणी मान खाली घालुनच म्हणाल्या.

" आमची पुर्णत अब्रू वेशीवर टांगली ह्या मुलाने आज म्हणायच आणि हेच व्हायच बाकी होत.!" महाराज जरा रागातच म्हणाले.

" बाबासाहेब ! " यु.ज्ञी: म्हणाल्या.परंतु महाराजांनी तिच्याकडे वळून पाहिल नाही." दादासाहेबांनी अस काहीही केल नाहीये की ज्या कारणाने आपली अब्रु जाईल..आम्ही मानतो की दादासाहेबांकडून एक चुक घडली..!"

" चुक!" महाराज मध्येच म्हणाले." फक्त चुक नाही ,खुप मोठी चुक आहे ही!आणि तुम्ही ही आमच्याशी खोट बोल्लात युवराज्ञी! एकवेळ युवराजांवर आमचा जितका विश्वास नाही तेवढा तुमच्यावर होता..पन आज तो विश्वास तुम्ही तोडलात त्या विश्वासाला तडे जाण्यास भाग पाडलत आणि ही गोष्ट आम्हाला खुप लागली आहे !:" महाराज युवराज्ञींकडे न पाहताच आप्ल्या विश्रांती गुहेच्या दिशेने निघुन गेले.

" बाबासाहेब!" यु.ज्ञी:रुपवतींचा चेहरा जरासा पडला गेला.डोळ्यांतुन नकळत एक अश्रु टपकल.

" शांत हो बाळ ! तुम्हाला माहीती आहे ना? महाराजांचा राग जास्त काळ टिकत नाही आणि जर तो तुमच्यावर असेल, तर कधीच..नाही! तुम्ही सकाळीच त्यांच्याशी बोला."

महाराणींनी यु.ज्ञी:रुपवतींची समजुत काढली व त्याही निघुन गेल्या.

××××××××××××

सावकाराच्या वाड्याबाहेर अंगणात पांढरट धुक माजल होत.

त्या पांढरट धुक्यात त्या झोपाळ्याची लाकडी फळी विशिष्ट प्रकारचा (कुई,कुई,कुई) आवाज होत पुढे मागे झुळत होती,कोणीतरी बसल असावी अशी.झोपाळ्यापासुन उजव्याबाजुला एक छोठासा गोठा होता..त्यात दोन बैल - एक गाई आणि तिचा वासरु

खाली मान घालून निजलेले.पर्ंतु एक बैल मात्र त्या झोपाळ्याकडेच टक लावुन पाहत बसलेला.कारण त्या झोपाळ्यावर त्या मुक्या प्राण्याला एक आकार दिसत होता.काळी मेक्सी घातलेला-पांढ-याफट्ट सुकलेल्या त्वचेच्या शरीराचा जणु एक प्रेतच असाव. लंक्याने शलाकाच लाल साडीतल प्रेत आपल्या दोन्ही हातांत उचलून घेतल होत.त्याच्या मागे संत्या, ढमाबाई असे सर्व मिळुन जिन्याची एक एक पायरी उतरत खाली येत होते.लंक्याच्या प्रत्येक पावलासरशी मृत शलाकाच्या बांगड्यांचा, पायांतल्या पैजणांचा (छण,छण,छण) अगदी बेसुर ध्वनी त्या हॉलमध्ये घुमत होता.... प्रेतयात्रेत वाजल्या जाणा-या टालांसारखाच समजा.

शेवटची पायरी उतरुन लंक्याने डाव्या हाताला वळण घेऊन तो स्वयंपाक घरातल्या दारातुन आत घुसला. सर्वप्रथम स्वयंपाक घरात प्रवेश करताच ढमाबाई,संत्या,लंक्या तिघांनाही फरशीवर रक्ताच्या थारोळ्यात खाली पडलेली काशी दिसली ,काशी म्हंणजेच रामु सावकाराच्या वाड्यात काम करणारी एक बिचारी गरीब स्त्री.

जीला सावकाराने फक्त बळी साठी पाळल होत आणि आजतिला वापरल ही होत.काशीच देह निपचित खाली फरशीवर पडलेल ,तिच्या कपाळावर एक काळसर होल पडलेला..ज्या होलातुन लालसर रक्त बाहेर येऊन पुर्णत चेहरा भिजवुन गेलेला,डोक्यावरचे सुटलेले काळसर केस चेह-यावर पसरलेले..जे की रक्ताला चिटकले गेलेले. त्याच केसांतुन चेह-यावर लागलेल रक्त थेंबाथेंबाने खाली पडून फरशीवर एका नदीसारख बाजुला पसरल होत.एका सामान्य मांणसाला न पेलणार दृष्य होत हे! नाहीतर ह्दयात बिघाड होऊन ह्दयाचा झटका येण , साहजिकच असेल अस म्हंणनार नाही मी!

काशीच्या देहाजवळच रामु सावकार उभा होता, हातात एक रक्ताळलेला वरवंटा होता, तोच त्याने काशीच्या कपाळावर मारलेला..

समोरची चुल दोन भागांत विभागलेली मधोमध एक गोल भुयारी मार्ग होत..त्या मार्गातुन प्रकाश आणि थंड वाफ एकत्रितरीत्या बाहेर येत होती.

" लंक्याऊ ?"

" जी आबा!"

शालुबाई ना घेऊन आत या! आणि तू संत्या ह्या काशीच म्हड घेऊन ये.!" सावकार म्हणाला.त्याच्या ह्या हुकमी वाक्यावर संत्याने फक्त होकारार्थी मान हळवली.सर्वप्रथम त्या भुयारी मार्गात रामुसावकार शिरला..खाली जाण्यासाठी दगडाच्या चौकोनी पाय-या होत्या.सावकार आत जाताच त्याच्या मागोमाग लंक्या ,ढमाबाई,मग शेवटला काशीच्या प्रेताला(मयताला) दोन हात धरुन तिला सरपटत-सरपटत घेऊन संत्या आला. जेमतेम वीस-बावीस पाय-या होत्या. शेवटची पायरी उतरुन संत्याने काशीच प्रेत खाली तलघरात आणल. त्या प्रेताला वरुन तलघरात आणे पर्यंत लुकड्या संत्याची दमछाक झाली..त्याने हाताने कपाळावरचा घाम हलकेच पुसला..आणि जशी नजर समोर गेली.

××××××××××

यु.रा:सुरजसेन यांच्या खोलीतल्या पलंगावर मेघा शांतपणे डोळे मिटुन पडली होती. तिचा एक हात युवराजांनी आपल्या हातात धरुन ठेवलेला..सर्व लक्ष तिच्या चेह-यावर स्थिरावलेल.

रघुबाबा पलंगा बाजुलाच खाली काही औषध कुटून त्यांचा रस बनवत बसलेले. की त्यांनी युवराजांकडे पाहिल व म्हणाले.

" युवराज ! "

रघुबाबांच्या ह्या वाक्यावर युवराजांनी त्यांच्याकडे पाहील.

" जी!" युवराज इतकेच म्हणाले.

" तुम्हाला वाईट वाटणार नाय तर,... एक बोलु!"

" वाईट...वाईट का वाटेल बर,..बोलाना !"काहीवेळ विचार करुन युवराज म्हणाले.

" तुमच ह्या पोरीवर प्रेम हाई का?" युवराजांनी रघुबाबांकडे नुस्त पाहिल परंतु एक चकार शब्द बाहेर काढला नाही.

" ह्या पोरीस्नी दिवस गेल हाईत म्हंणुन म्हंटल!" रघुबाबांच्या ह्या वाक्यावर मात्र युवराजांनी खाडकन वळुन त्यांच्या चेह-याकडे पाहिल , युवराजांचे डोळे जरासे विस्फारले गेलेले. इकडे मेघाने हळकेच डोळे उघडले , सर्वप्रथम आपण कोठे आहोत हे तिला कळलच नाही.परंतु जशी नजर युवराजांकडे गेली तिच्या सकाळपासुन आडवुन धरलेल्या भावनांचा बांध डोळ्यांतुन अश्रुच्या धारांवाटे वाहू लागला,तिने युवराजांना मिठीच मारली, हे सर्व अचानकच घडल.

" त्या काळ्या सैतानी सावलीने माझ्या आबाला मारल युवराज ! मारल माझ्या आबाला. मी....मी..मी पाहिल त्यांना ! काल गावात जी तीन पोर मेली ना तिच जिवंत होऊन आली होती.पन बत्तीचा स्फोट झाला आणि वाचले मी..वाचले मी!" मेघाच चित्त था-यावर नसल्याप्रमाणे तिची अखंड बडबड सुरु होती.जे की युवराज रघुबाबांना समजुन येत नव्हती.

" मेघा मेघा." युवराजांनी तिच डोक आपल्या हाताने पकडल. मग तिच्या डोळ्यांत झाकून पाहिल." मेघा.. आधी शांत हो पाहू !" युवराजांच्या काळजीपूर्वक बोलण्याने मेघा जरा शांत झाली ,वाढलेले श्वास कमी झाले. " हे बघ आता इथे तुला कसलाही धोका नाहीये ! म्हणुनच कालरात्री जे काही घडलंय ते निट आणि शांत चित्तेने आम्हाला सांग! "युवराजांनी तिच्या डोळ्यांत डोळे घालून हे वाक्य उच्चारल! मेघाला त्या डोळ्यांत पाहताच न जाणे का परंतु फ्रेश वाटु लागल.तिला जरासा धीर आला.तिने एक कटाक्ष रघुबाबांवर टाकला , त्यांनीही तिच्याकडे पाहून एक स्मित हास्य केल.

" सांग बाळ! बिल्कुल घाबरु नकुस. म्या असताना कोणती बी वाईट शक्ति तुझ्या केसाला बी धक्का लावु शकणार नाय." रघुबाबांच्या ह्या वाक्यावर मेघाने एकवेळ युवराज मग पुन्हा रघुबाबांकडे पाहिल व काळरात्री जी काही अमानवयीय शक्तिची विद्रूप जत्रा भरली होती..त्यातले भयान ह्दयाचा थरकाप उडवणारे दृष्य आपल्या बापाचा गेलेला जिव , तो खिडकीतला पांढराफट्ट हात -बत्तीचा स्फोट मग त्या स्फोटाने जळालेले ते मृतदेह सर्वकाही मेघाने समोर मांडलं.

" बापरे !ह्याचा अर्थ ते आले आहेत तर , अपेक्षा पेक्षा जरा जास्तच लवकरच पोहचले आहेत." युवराज स्व्त:शीच पुटपुटले. परंतु ते वाक्य

मेघा,रघुबाबा दोघांनीही ऐकल होत.ज्याच अर्थ एक रहस्य होत.

" कोण आलेत युवराज? " मेघा म्हणाली.

" व्हय युवराज कोण आलेत! कोणाबदल बोलताय तुम्ही !"

रघुबाबानीही मेघाच्या वाक्याला दुजोरा देत आपल मत मांडल.

" सैतान , स..सैतान आला आहे ना ! अस म्हणायचय मला!" युवराजांच्या चेह-यावर जरासे विचित्र भाव पसरले गेलेले, जणू बोलतांना ते काहीतरी लपवत असावेत.

" अच्छा!"खात्री पटल्याप्रमाणे मेघा इतकेच म्हणाली.परंतु रघुबाबा मात्र युवराजांकडे जरा संशयास्पद नजरेनेच पाहत होते..जणु युवराजांच ते उत्तर त्यांना पटल नसावच.

××××××××××××

लुकडा संत्या आपल्या विस्फारलेल्या डोळ्यांनी एकटक समोर पाहत बसलेला. त्याच्या चेह-यावर लाल रंग पसरलेला,त्या दोन कवडीसारख्या घा-या डोळ्यांत लाल रंग दिसुन येत होता.समोर एक अद्भूत जग दिसत होत.जिकडे नजर जाईल तिकडे रक्तासारखा लाल रंग.

खालची मातीही लाल रक्तासारखी ,झाड लाल , वरचा समंद आकाश..ते ढग सर्व लाल रंगासारख भेसुर. समोरुन लाल झाडांनी वेढलेली एक चार मांणस एकाचवेळेस चालत जातील अशी लाल मातीची वाट पुढे गेलेली दिसत आहे. पन्नास पावल चालून झाल्यावर ती झाड संपत आहेत..मग पुढे एक चढण दिसत आहे..जी चढुन गेल्यावर....मग उंचावर एक भव्य दिव्य कालपट भिंतींचा एक श्रापितलेला महाल दिसत आहे..आणि त्या महाला मागे ठिक आकाशात एक गोल रक्तासारखा आकार तरंगताना दिसत आहे, जणु तो चंद्र असावा.

"मालकीणबाई ,लंक्या ? " रामु सावकाराचा आवाज आला.

" जी आबा !" लंक्या म्हणाला.

" तुम्ही संमदी परतीची वाट धरा! आमची फिकिर करु नका ! आम्ही

आमच्या शालूबाईंना परत घेऊनच येतो !" रामु सावकाराच्या ह्या वाक्यावर लंक्याने शलाकाच प्रेत त्या लाल जमिनिवर खाली ठेवल..

सर्वप्रथम ढमाबाई,मग संत्या आणि शेवटला लंक्या अस मिळुन सर्वजन त्या तलघराच्या पा-या चढुन बाहेर आले , शेवटच्या पायरीला लंक्या थांबला..जिज्ञासेपोटी त्याने वाकुन खाली पाहिल. तसं त्याच्या नजरेस जरा विलक्षणच दृश्य दिसल. त्या भव्यदिव्य महालाचा दोन झापांचा मोठा विशाल दरवाजा करकरत उघडला गेला जो आवाज समंद वातावरणात गुंजला..एक विज त्या महालामागे आकाशात कडाडली..त्या उजेडात महालाच्या दारातुन एक-एक करत काळे कपडे नी डोक्यावर टोपी अशे सैतानाचे समर्थक शेकडोच्या संख्याने हातात मशाली टिटव्या घेऊन बाहेर पडले. ती चढन उतरुन मग ती झाडांची वाट सर करुन रामुसावकार जवळ आले. काहीक्षण त्या समर्थकांशी रामुसावकाराशी काही चर्चा झाली...मग त्या काळ्या कपड्यातल्या मांणसांनी शलाकाच प्रेत उचल्ल ,तर अर्ध्यांनी काशीच..

मग एक-एक करत सर्वजन आल्यापावळे त्या महालाचे दिशेने जाऊ लागले ,रामुसावकारही....त्यांच्याच बरोबर निघून गेला.

×××××××××××

चंद्राच्या प्रकाशात राहाजगडच्या जंगलातुन एक बैलगाडी चाललेली! बैलगाडीला दोन रेड्यासारख्या शरीरयष्टीचे काळे बैल जुंपलेले.त्यांची डोक्यावरची शिंग धारदार होती, गळ्यात घंटी बांधलेली जिचा आवाज होत-होता.(टंग,ट्ंग) बैलगाडीला एक बोगद्यासारख विशिष्ट प्रकारच एक कुडाच छप्पर बसवलेल.ज्याने आत कोण बसलय हे कळुन येत नव्हत. गेल्या दोन महिन्यां अगोदरच राहाजगड मधल्या सविताच लग्न दुरच्या गावात झाल होत. परंतु सासर लांब असल्याने,व नवरा दिनकर सैनिक असल्याने सुट्टि काही मिळत नव्हती आणि ह्या ह्या दोन कारणांमुळे तिला माहेरला यायला ही मिळत नव्हत. माहेरच्या आठवणीने तिचा जिवखात होता, तिला आपल्या आई:-वडीलांची खुप आठवण येत होती.म दिनकररावांनी आपल्या बायकोसाठी काही दिवस का असेना सुट्टि घेऊन तिला माहेरला नेण्याच ठरवल. पराहाजड मध्ये चाललेल्या घडणा-या विचित्र अमानवीय शक्तिंच्या अघोरी क्लिष्ट , कारनाम्यांपासुन हे दोघे अजाण होते. त्या दोन्ही जिवांना ह्या धोक्याची जराशीही जाणीव नव्हती कल्पनाही करु शकणार नाहीत असे विचित्र आकार आपल्या आजुबाजुला घुटमळत आहेत.

बैलगाडीच्या आत एक कंदील जळत आहे, त्या कंदीलाच्या तांबरट प्रकाशात काही सामान बांधलेले साडीचे विशिष्ट प्रकारचे गोले.. तर त्या गोळ्यांबाजुलाच दोन आकृत्या दिसत आहेत.एक जेमतेम पंचवीस वर्षाची स्त्री जी की सविता असावी दुसरी आकृती एक तीस वर्षाचा हट्टा-कट्टा बलदंड शरीर व बाहूंचा दिनकर तिच्या बाजुला तिचा हात आपल्या हातात घेऊन बसलेला.

" सवि, झाल तुझ्या मनासारख ! आता काहीयेळातच आपण तुझ्या घरी पोहचु!" दिनकर सविताकडे पाहत म्हणाला.

" व्हई की! माझी आई तर किती खुश व्हिल मला आण तुम्हाला बघुन."

सविताच्या डोळ्यात टचकन पाणि जमा व्हायला लागल.

:"अंग ए बाई आता तु मयताला चालल्यासारख रडाया सुरुवात नको करु !" दिनकरच्या ह्या वाक्यावर सविता खुद्दकन हसली,तिने आपले डोळे पुसले. की तेवढ्यायतच दिनकरने सविताचा हात आपल्या हातात घेऊन तिला आपल्या अंगावर ओढल.

" अव काय करता , कोणि बगल की!"

सविता जराशी लाजतच म्हणाली.

" अंग जंगलात अहोत आपण इथ बघणार कोण हाई आता ! आण तस बी गाव यायला अजुन ले टेम हाई." दिनकरने अस म्हंणतच आपले ओठ

सविताच्या दिशेने नेहायला सुरुवात केली. लाजेने चुरचूर झालेल्या सविताने आपले डोळे बंद केले , तिचा श्वास जलद गतीने वाढु लागला.

दोघांच्याही शरीरांना प्रणयाची भुक जाणवु लागली. परंतु अचानक बैलगाडीला एक धक्का बसला,बैल जागेवरच थांबले.

" हे बैल कशापाई थांबल म्हंणायच! " सविताने प्रश्नार्थक नजरेनं दिनकरकडे पाहिलं.

"थांब म्या बघतु." दिनकर च्या उजव्या हातालाच एक चौकलेटी पडदा होता. तो पडदा बाजुला करताच समोरचे बैल व पुढच दृश्य दिसत होत.

दिनकरने तो चौकलेटी रंगाचा पडदा बाजुला सारला.बैलांच्या दोन्ही तर्फे निर्जीव मृत प्रेतांसारखी झाड उभी होती,खालच्या जमिनीवरुन

बैलांच्या गुढघ्यांन इतक्या पायांमधुन पांढरट धुक वाहत होत.

" सवे आईशप्पथ इतक धुक कस काय पडलय! आण इतक धुक पडून बी थंडी नाय वाजत हाई!"दिनकरला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना ,की हे काय चाललं आहे.

" व्हई की! आण हे बैल पण का थांबले हाईत ?" सविताने सुद्धा बाहेर डोकावून पाहिल.सामान्य मानवाच्या नजरेला एकवेळ अमानविय

हिंस्त्र शिकारी त्या काळशक्तिच्या मायावीनी मार्फत फेकलेल्या जाळ्याने

सावजाला हव ते दृष्य दाखवु शकतो. परंतु ती मायावीनी फक्त मानवाच्या बुद्धीला वशीकरणास भुल पाडु शकतो.त्याला हव ते दृश्य दाखवु शकतो.पन बैलगाडीला बांधलेल्या त्या मुक्या जनावरांच्या नजरेस ज्याप्रकारे दिनकर सविता ह्या दोन्ही मानवांना जे धुक,ती निर्जीव झाड,अभद्र शांतता दिसत होती..त्यापल्याडच दृष्य दिसत होत.

ते धुक वगेरे सर्व जंजाळ होत-त्या धुक्यात काहीबाही चित्रविचित्र आकार रेंगाळत सरपटत होते,त्या रातकीड्यांची किरकिर त्या श्वापदांच्या विव्हळ,अभद्र हास्याला आडवुन धरत होती-जी की सविता-दिनकरला जरी ऐकु येत नसली तरी त्या बैलांच्या कानांवर मात्र पडत होती.त्या काळ्या निल्या पडलेल्या झाडांवर काय-काय विकृत ध्यान आपला ठाव बस्तान मांडूण बसला होता जे पाहुन ते बैल बिचारे बिथरल्या सारखे मागे मागे सरकु लागले.

" अहो ह्यांना काय झाल ! हे मांग-मांग का सरकत हाईत !"

" शुश्श शांत रहा !" दिनकरने तोंडावर बोट ठेवल." कसला तरी आवाज येतोय बघ!" दिनकरच्या ह्या वाक्यावर सविताने होकारार्थी मान हलवली...आपले दोन्ही डोळे बंद करुन ती तो आवाज ऐकु लागली.

बैलगाडी बाहेर एक ध्यान प्रगटल गेलेल.त्याच्या लालसर,तांबरट नजरेला ती बैलगाडीची चाक -दिसत होती..मग हळू-हळू ते ध्यान पुढे जाऊ लागल..चाक मागे जाऊन आता ते ध्यान बैलगाडीच्या मागच्या बाजूस उभ राहिल.त्या निळसर,तांबरट नजरेसमोर आता फक्त एक चौकलेटी पडदा दिसत होता...बस्स. आणि त्या पडद्यामागे होते दोन भक्ष्य.त्या ध्यानाने आपला धारधार पातळसर कालपट नख असलेला..पंजा पुढे-पुढे नेहायला सुरुवात केली.हलकेच एक धार धार बोट त्या पडद्यावर ठेवुन सरकन एका रेषेत खाली आणल.समोरचा पातळ पडदा टर,टरत..फाटला गेला.नी समोरऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ

 

क्रमश: