Dear Baiko... in Marathi Letter by Vaishnavi Pimple books and stories PDF | Dear बायको...

Featured Books
  • 99 का धर्म — 1 का भ्रम

    ९९ का धर्म — १ का भ्रमविज्ञान और वेदांत का संगम — 𝓐𝓰𝓎𝓪𝓣 𝓐𝓰𝓎...

  • Whispers In The Dark - 2

    शहर में दिन का उजाला था, लेकिन अजीब-सी खामोशी फैली हुई थी। अ...

  • Last Benchers - 3

    कुछ साल बीत चुके थे। राहुल अब अपने ऑफिस के काम में व्यस्त था...

  • सपनों का सौदा

    --- सपनों का सौदा (लेखक – विजय शर्मा एरी)रात का सन्नाटा पूरे...

  • The Risky Love - 25

    ... विवेक , मुझे बचाओ...."आखिर में इतना कहकर अदिति की आंखें...

Categories
Share

Dear बायको...

Hiii बायको ...

कशी आहेस ??? कधीही समोर न विचारलेला प्रश्न चक्क आज विचारतो तो पण असा ?? अजब वाटल ना....पण काय करू...तू म्हणते तस माझं काम म्हणजे तुझी सवत झाली आहे....आणि आज मी तुझ्या सवतीला सुट्टी देऊन तुझ्यासाठी हे पत्र लिहीत आहे....तुला आठवंय आपण कॉलेज मध्ये असताना असेच पत्र लिहायचे...तेव्हा मी लिहलेल प्रेम पत्र तुला खूप आवडायची...आणि तुला आवडतात म्हणून मी अजून जोशात लिहायचो...मग लग्न झालं आणि हा पत्रव्यवहार संपला... तुला माहिती आहे आज मी पत्र लिहायला सुरुवात केली तेव्हा शब्दाचं सुचत नव्हते...काय लिहू ते पण समजत नव्हत मग विचार केला आज आपल्या जुन्या आठवणी ताज्या करू ते पण पत्राच्या आधारे....

तुला आपली पहिली भेट आठवते... त्या कॅण्डक्टर सोबत १ रुपया साठी भांडत होतीस...काय तर म्हणे १-१ रुपया शंभर लोकांनी घेतला नाही तर १०० रुपये जमा होतील तुमच्या कडे...हे वाक्य ऐकून हसू च आलं...पण तूझ्या रागानी भरलेल्या चेहरा पहिला आणि हसू गायब च झालं...पण हा पहिल्या नजरेत आवडली तू मला...

नंतर बस मुळे ओळख झाली....आणि कॉलेज पण एक आहे ते समजल...तुला चोरून पाहण्यात जे सुख आहे ना ते स्वर्गात पण नाही ग...तुझे ते डोळे...गोरा गोमटा रंग....पंजाबी युनिफॉर्म...त्यात त्या लांब सडक दोन वेण्या...फुल फिदा यार...

तू आठवत आपण बस स्टॉप बोलत होतो आणि तुझा भाऊ आला...काय फाटली होती दोघांची...तेव्हा तर मला वाटलं संपल आता सगळ संपल...ती आपली शेवटची भेट असच वाटल होत मला...पण आपल नशीब की त्याने आपल्याला बोलताना पहिलं नाही....आणि आपण वाचलो...काय घाबरलो होतो तेव्हा...मला तर वाटलं हे प्रकरण बाबां पर्यंत जाईल...आणि बाबा पट्टयाने सोलून काढतील...कारण तेव्हा प्रेम करण म्हणजे गुन्हाच होता जणू...
त्यानंतर बोलताना चारही बाजूने बघत बोलायचो आपण...मी जेव्हा तुला पाहिलं पत्र लिहाल ना...तेव्हा मी तब्बल २२ वेळा ते लिहलेले पान फाडल होता...कधी शब्द रचना नाही जमली तर कधी अक्षर खराब म्हणून...पण शेवटी एकदाचं लिहाल...मी पत्र तर लिहल पण द्यायची हिम्मत कुठे होते...आणि हिम्मत येईल तरी कुठून कारण मी त्यात माझ पहिलं प्रेम पहिल्यांदा व्यक्त जे केलं होत...तुझ उत्तर काय असेल ह्या भीती मुळे द्यायला घाबरत होतो...शेवटी कस तरी हिम्मत करून दिलं...

तू पण घरी जाऊन वाचते म्हणाली...मी तर मनातल्या मनात सगळ्या असतील नसतील तेवढ्या देवांचे आभार मानले...कारण तू ते माझ्या समोर वाचलं अस आणि माझ्या कानशिलात भडकावली असती तर...वाचलं एकदाचा...

पण दुसऱ्या दिवशी तुला पहिलं तर रडूच आल...अस वाटत होत इथून कुठेतरी लांब जावं...तू माझ्या जवळ आली आणि एक पुस्तक हातात देऊन गेली...पण मी अजिबात काही बघायच्या किंवा समजायच्या मूड मध्ये नव्हतो...

त्यानंतर दोन दिवस कॉलेज ला पण आलो नाही...एक दिवस अभ्यास करताना तू दिलेलं पुस्तक दिसल म्हटल बघू तरी काय आहे एवढं त्या पुस्तकात जे तू मला दिलं...पुस्तक जसं बोर होत..म्हणून पटापट पान पलडत होत तेव्हा एक कागद त्यातून पडला... उघडून पहिला तर तू लिहलेली चिठ्ठी....


" प्रिय....

पाहिले तर sorry....कारण तू लिहल्या होत की तूझ्या होकार असेल तर निळा रंगचा ड्रेस घाल...आणि दुसऱ्या दिवशी शनिवार...पण माझ्या कडे निळ्या रंगाचा ड्रेस नाही....आणि तू पण लाल रंग प्रेमाचं असतो तर त्या रंगाचा ड्रेस घालायचा सांगायचं सोडून निळा सांगितला...वाचून तर मी डोक्यालाच हात मारला...म्हणून मी लाल रंगाचा ड्रेस घातला...तू सांगायचं होत पण नेमकी त्याच दिवशी मेधा सोबत येणार होती...त्यामुळे तुझ्यासोबत बोलू नव्हते शकत...म्हणून ही चिठ्ठी...

आणि हो माझ पण तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे...

तुझीच
प्रेमवेडी"



पत्र वाचून तर माझच मला हसू आल...काय वेड्यासारखा विचार केला मी...मग सुरुवात झाली नवीन प्रेमाला...ते चोरुन भेटण, ते चोरुन बघणं,तुझ माझ्यासाठी तयार होणं...

कॉलेज संपून मी जॉब ला लागतो...आणि ते पण शहरात...तुला सोडून जायची इच्छा तर नव्हती पण तुझ्यासाठी गेलो...किती खंबीर पणें माझ्या पाठीशी उभी राहिलीस...मी गावातून शहरात आलो पण मन मात्र तुझ्याजवळ ठेवून आलो...

जरा सेटल झालो मग तुझ्याबद्दल घरी सांगितलं....थोड्या...नाही नाही खूप विरोध झाला..कारण माझ्या घरातून त्या काळी लव marriage आपल पाहिले होतो...मग बाबांनी तूझ्या घरी सांगितलं...मग काय बघायलाच नको...सगळीकडून फटाके फुटत होते...तूझ्या आणि माझ्या बापाने तुडव तूडव तुडवल होत...दोन दिवस बेड सोडला नाही मी...पण लग्न करेन तर तुझ्याशीच हे नक्की केलं...भांडून, समजावून , शेवटी नाईलाजाने दोन्ही घरच्यांनी लग्न लावून दिलं...आणि हात वर केले...

आता माझी प्रियसी माझी बायको झाली होती...ते गोड दिवस आपण खूप कमीच अनुभवले...तू घरच्या व्यापात तर मी ऑफिसच्या कामात व्यस्त झालो...पण प्रेम मात्र तेच राहिलं...
मी आल्याशिवाय तू जेवायची नाहीस...त्यामुळे लवकर घरी यायची एक वेगळीच ओढ होती...नंतर हळू हळू तू घरातल्या प्रत्येक माणसाला आपलस करून घेतलं...आई आणि बाबांना तर तू इतकी आवडली की मला आज पण तू त्यांची मुलगी आणि मी जावई आहे की काय असं वाटतं....

माझ्या छोट्यासा पगारातून आपण घर चालवत होती...कधी पैसे कमी पडले म्हणून बोलली नाहीस...उलट महिना अखेरला सुद्धा आपल्या खाऊच्या डबात ५००-६०० रुपये नेहमी असायचे...सगळ्यांना सगळ देऊन पण तुझ्याजवळ पैसे कसे राहायचे हा आज पण अनुउत्तरीत प्रश्न आहे...

आत आपल्या चीलीपिल्यांच आगमन झालं... आपल्या परिवार पूर्ण झाला...पण माझं काम पण वाढल.... ह्यासागळ्यात आईबाबा , मुलांना वेळ देता आला पण तुला कधी वेळ देताच आला नाही...आणि तू ही कधी तो मागितला नाही...पण ह्या वर्षी तूझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण आपल्या पहिल्या हनिमून ला जायचं... ऐ कसल भारी ना लग्नाच्या २० व्यां वर्षी आपण आपल्या पहिल्या हनिमून साठी जाऊ...तू बोलत आशील ना काय हा वेडे पणा..आईबाबा आणि मुलांना सोडून आपण कस जायचं..तू फक्त तयारी कर....
आज वर तू दिलेली साथ...खंबीर पणे माझ्या पाठीशी उभी राहिली आहेस...त्यासाठी तुझे आभार मानावे तेवढे कमीच...तू आहे म्हणून मी आहे...आपल लग्न झालं तेव्हा खूप लोक मला बोलले होते की काय बायको आणली आहे...२-४ वर्षांत घर तोडेल... तुला शोभत पण नाही...पण आज त्याच सगळ्या लोकांना ओरडून सांगावस वाटतंय " तू माझी बायको आहेस...माझ्या घरची लक्ष्मी आहेस"..... I love you...माहिती आहे आज पूर्ण २० वर्षांनी हे तीन शब्द बोलत आहे...ते पण पत्राद्वारे...माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे....बायको...
तूला माहिती आहे आज पण तू तशीच आहेस...अगदी नवीन नवरी...तुझा माझ्यासाठी केलेला साज...मी आणलेला गजरा हट्टाने माझ्याकडून माळून घेणे...आज पण तुझ्याकडे नजर केली की लाजने तुझी झुकणारी नजर...आणि गालावर चढणारी ती लाली...आज पण जीव तिथेच घुटमळतो.....मला आवडत म्हणून रोज नेसलेली साडी...आणि त्या साडीतून दिसणारी तुझी नाजूक कंबर...जीव धोक्यात घातले माझा...

आता तुला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर....हे पत्र मी अचानक का लिहाल....
तर काल सहज कपाट बघत होत...तर तूझ्या जुना साडी तून मी दिलेल्या पहिल्या चॉकलेट चा कागद पडला...तू माझी प्रत्येक गोष्ट जपली...आता मी तुझ प्रेम जपणार...आणि तुला पुन्हा आपल्या पुन्हा प्रवासाची सैर करून आणणार...म्हणून हा खटाटोप...
मग आठवली का आपली प्रेम कथा...

इतक्या वर्षात केल्याला सर्व चुकीची माफी मागतो...आणि इतक्या वर्षात तू माझ्यासाठी केलेल्या सर्व गोष्टींसाठी तुला thank you....


. तुझ्याच वेडा
नवरोबा...

################################



मग काय कस वाटल हे ???

हा लेख आपल्या 90's च्या लव बर्डस साठी....असा वाटला ते नक्की सांगा...आणि तुमच्या काळी असच प्रेम होत का?? मी हे इमाजिनेशन चे घोडे घवडवून लिहाल आहे...काही चुकल असेल तर माफ करा...अजून एक मी हे जसं पत्र एका नवऱ्याने बायकोला लिहाल आहे तसच एक बायकोने नवऱ्याला लिहाल असा लेख पोस्ट करायच्या विचार करत आहे...जर तुम्हाला वाचायचा असेल तर नक्की सांगा...

आणि हा लेख कसा वाटला ते पण नक्की सांगा....हे अस काही लिहण्याच्या पहिल्या प्रयत्न आहे...जमल का ??🙄🙄


भेटू पुन्हा....



Vaishu...😘