Murder Weapon - 2 in Marathi Crime Stories by Abhay Bapat books and stories PDF | मर्डर वेपन - प्रकरण 2

Featured Books
  • എന്റെ മാത്രം - 2

    റോ........... എന്നൊരു അലർച്ച കേട്ടതും അവൾ മനസിന്റെ ക്യാബിൻ ല...

  • അമീറ - 7

       ""അതൊന്നും സാരമില്ല മോളെ". ഉപ്പ അവളോട് പറഞ്ഞു.. "ഇനിയെന്ത...

  • അമീറ - 6

      മകളുടെ അവസ്ഥ കണ്ട അലവിക്ക് തോന്നി അവൾ ഒന്ന് ഫ്രഷ് ആവട്ടെ എ...

  • അമീറ - 5

    ഇന്നലെ രാത്രി ആമി റൂമിൽ നിന്നും കേട്ടത് ഇവരുടെ മൂന്ന് പേരുടെ...

  • അമീറ - 4

    പിറ്റേന്ന് രാവിലെ ആമി നേരത്തെ എണീറ്റിരുന്നു.അവൾക്കുള്ള ഭക്ഷണ...

Categories
Share

मर्डर वेपन - प्रकरण 2

प्रकरण २
ऑफिसची वेळ संपत आली तेव्हा सौम्याने पाणिनीला विचारलं,
“ बंद करायचं ऑफिस?”
“आणखी काही करण्यासारखं हातात नाही आपल्या.” पाणिनी म्हणाला.
“सर तुम्ही त्या मुलीचा रात्रभर विचार करत बसणार आहात का?”
“तिला विसरता येत नाही. मला वाटतं आपण तिला भेटायला विलासपूर ला जाऊया”
“पण ती तिथे नाहीये अत्ता.”
“पण तिचा फ्लॅट तिथे आहे आणि आपल्याकडे त्या फ्लॅटची किल्ली आहे.”
“तिच्या घरात आपल्याला काय सापडणारे?”
“काहीतरी क्लू मिळेल किंवा कदाचित काही मिळणारही नाही.” पाणिनी म्हणाला.
“सर, तुम्ही तिच्या फ्लॅटमध्ये शिरणार आहात?”
“मलाच माहीत नाही. आता तरी काही सांगता येणार नाही. पूल आला की तो कसा ओलांडायचा याचा मी विचार करीन. आत्ता तरी काही विचार नाही. ती घरी कधी येते तेच मला बघायचे सर्वात प्रथम”
“म्हणजे तुम्हाला वाटते की ती घरी जायला निघाली असेल आपल्या ऑफिस मधून बाहेर पडल्यावर?”
“जर ती इथून घरी गेली नसेल तर ती नक्कीच मोठ्या संकटात सापडलेली असणार.” पाणिनी म्हणाला.
“आपल्या ऑफिस मधून ती का बाहेर पडली असेल?” सौंम्या ने विचारलं
“ बहुतेक तिची गाडी तिने खाली लावली असणार ती कदाचित गाडीतून काहीतरी घेण्यासाठी म्हणून खाली गेली असणार आणि.....”
“हा असा एवढा मोठा अंदाज तुम्ही कशावरून करत आहात सर?” सौंम्या ने विचारलं
“तिच्या पर्स वरून”
“म्हणजे पर्स मधल्या वस्तूंच्या आधारे?”
“लक्षात घे सौम्या. ती विलासपूर मध्ये होती, तिचं ड्रायव्हिंग लायसन्स केरशी आहे याचाच अर्थ ती कार चालवतच विलासपूर वरून आपल्या ऑफिस पर्यंत आली असणार आपल्या ऑफिस खालच्या पार्किंग लॉटमध्ये तिने गाडी लावली असणार. तुला माहिती आहे की तो पेड पार्किंग लॉट आहे. त्याचे पैसे भरण्याची पावती तिने तिच्या पर्समध्ये टाकली असणार. ती वर आपल्या ऑफिसमध्ये आली तेव्हा खूप घाबरलेली किंवा उत्तेजित झालेली होती आणि आपल्याला आता हे कळलंय तिने तिच्या रिव्हॉल्व्हर मधून दोन गोळ्या झाडलेल्या होत्या. नंतर तिला एकदम आठवलं असेल की गाडीत ठेवलेली कुठली तरी वस्तू तिला हवी आहे तिनं तिच्या पर्स मधून पार्किंग लॉट ची पावती काढली असणार आणि पार्किंग लॉट मध्ये ती गेली असेल तिथे गेल्यानंतर असं काहीतरी घडलं असेल की ती परत आपल्या ऑफिसमध्ये येऊ शकली नाही.”
“आता प्रश्न असा आहे तिने जाणून बुजून तिची पर्स आपल्या ऑफिसमध्ये ठेवली असेल का की चुकून राहिली असेल?” पाणिनीनं विचारलं
“जाणून बुजून ती का ठेवेल पर्स आपल्या ऑफिसमध्ये?” सौम्याने विचारलं.
“ याचं कारण त्या पर्समध्ये रिव्हॉल्व्हर होतं आणि गरज नसताना ते रिव्हॉल्व्हर तिला तिच्याजवळ बाळगायचं नव्हतं. तिचा परत आपल्या ऑफिसमध्ये यायचा विचार होता. जाताना ती आपल्या गतीला सांगून गेली होती बघ, की ती पाच मिनिटात खाली जाऊन येते म्हणून. तिला तिच्या गाडीतून काहीतरी काढायचं असेल पण असं काहीतरी घडलं असावं की तिला तिचा प्लॅन बदलायला लागला" पाणिनीने त्याचा अंदाज सौम्याला सांगितला आणि तो विचार करत शांत बसला. आणि अचानक सौम्याला म्हणाला,
“ कनक ओजस ऑफिसमध्ये आहे का बघ. जर नसला तर त्याला फोन लाव आणि त्याला इथे बोलाऊन घे. त्याला जरा कामाला लावायचा आहे मला." पाणिनी म्हणाला.
पर्स मधल्या सगळ्या वस्तू सौम्याने काढून टेबलावर ठेवल्या होत्या त्या पाणीनी ला दाखवून तिने विचारलं, “याचं काय करायचं सर?”
पाणिनीने हातात रुमाल गुंडाळून तिचं रिव्हॉल्व्हर टेबलाच्या ड्रॉवरमध्ये टाकलं आणि इतर सगळ्या वस्तू परत तिच्याच पर्समध्ये ठेवून दिल्या.
“कनक येतोय. तो बाहेरच निघाला होता पण तेवढ्यात माझा त्याला फोन झाला आणि तो इकडे येतोय.” सौम्या म्हणाली.
कनक ओजसची विशिष्ट प्रकारची दारावर केलेली टकटक थोड्याच वेळात पाणिनी ला ऐकू आली
" गुप्तहेर आणि वकिलाच ऑफिस एकाच मजल्यावर असणं हे गुप्तहेरच्या दृष्टीने फारच वाईट पाणिनी. आता मी मस्तपैकी बाहेर फिरायला जायला निघालो होतो तेवढ्यात तू मला पकडलस. मला वाटतं अर्जंट काम नसावं तुझं" कनक म्हणाला आणि पाणिनीच्या टेबल समोर ठेवलेल्या सोफ्यावर हात ठेवायच्या ठिकाणी आपले लांबलचक पाय ठेवून आणि दुसऱ्या हाताच्या ठिकाणी पाठ टेकवून बसला कनकची सोफ्यावर बसायची ही एक विशिष्ट लकब होती.
“बोला महाशय काय सेवा करायची आपली?”
“मला तुला आता जे काम द्यायचे ते खरं तर दोन-तीन तासापूर्वीच द्यायला हवं होतं, तसा माझ्याकडूनच उशीर झालाय पण मला ते तातडीने करून हवंय” पाणिनी म्हणाला.
“बोल पटकन.” कनक म्हणाला
“आपल्या ऑफिसच्या इमारतीच्या खालचा पार्किंग लॉट बद्दल तुला माहिती असेलच” पाणिनीनं विचारलं
“अर्थातच. गेले सात-आठ वर्ष मी माझ्या गाड्या तिथेच ठेवतोय”
“मी माझी गाडी सुद्धा तिथेच ठेवतोय पण त्यामुळेच मला जे काम करायचं आहे ते मी करू शकत नाहीये पण एक गुप्तहेर या नात्याने तुला अधिकार आहे थोडं आत घुसून एक चौकशी करण्याचा”
“मी काय करायला पाहिजे नेमकं?”
“खाली जाऊन पार्किंग लॉट मध्ये ठेवलेली प्रत्येक गाडी तपास. ज्या गाडीचं रजिस्ट्रेशन केरशी च आहे ती आपल्याला पाहिजे. एकापेक्षा जास्त गाड्या केरशी रजिस्ट्रेशनच्या असल्या तर त्याचे नंबर लिहून घे आणि त्या सगळ्या गाड्यांच्या मालकांची नाव आणि पत्ते शोधून काढ.”
“ठीक आहे लागतो कामाला” कनक म्हणाला आणि लांब लांब टांगा टाकत निघून गेला.
“विलासपूर ला जायची तयारी करायची सर?” सौम्यान विचारलं
“कनक काय बातमी आणतो ती आधी बघू. तिची गाडी जर खाली असेल तर आपण इथूनच चौकशी करू आणि नसेल तर आपण विलासपूर ला जायला निघू.”
त्यानंतर बरोबर पंधरा मिनिटांनी कनक ओजस ऑफिसमध्ये आला
"केरशी रजिस्ट्रेशनच्या दोन गाड्या सापडल्या मला पाणिनी."
“त्याच्या मालकांची नावे कळली?" पाणिनीनं विचारलं
“नाही अजून मी पार्किंग अटेंडंट कडे चौकशी केली. त्या दोन गाड्यांपैकी एक गाडी गेले आठ तास त्या पार्किंग लॉट मध्ये आहे आणि दुसरी गाडी सहा तास आहे.”
“ठीक आहे कनक, आता एक काम कर केरशी ला तुझा कोणी संपर्कातील माणूस असेल त्याच्यामार्फत तिथल्या पोलिसांना हे गाड्यांचे तपशील कळव आणि त्यांच्या मालकांची नावे आणि पत्ते मिळव. दरम्यानच्या काळात तू बाहेर जाऊन मस्तपैकी जेवून ये त्याचं बिल माझ्या नावाने कर”
“हा एक सुखद धक्का आहे मला पाणिनी.तुझ्याबरोबर काम करताना मला सँडविच आणि कॉफी शिवाय काहीच खाता पिता येत नाही आणि ते देखील माझ्या खर्चाने मला करावं लागतं. तू काय करणार आहेस पाणिनी? आपण एकत्रच जाऊ खायला”
“मी आणि सौम्या एअरपोर्टवर चाललोय तिथून आम्ही विलासपूर ला जाणार आहोत आमचं खाणं एअरपोर्टवरच होईल” पाणिनी म्हणाला.
एअरपोर्टवरुन पाणिनीने कनक ला फोन लावला.
“ काही समजलंय त्या दोन गाड्यांबद्दल?”
“ अत्ताच हातात तपशील आलाय. एका गाडीचा नंबर UP AT २०५ असा आहे.मृगा गोमेद,नावाने नोंदणी आहे,सुरुची मार्ग, विलासपूर.दुसरी UP SF ८०४ उत्क्रांत उद्गीकर याच्या नावाने आहे. केरशी ” कनक ने माहिती दिली.
“त्या दोघांपर्यंत तुझा माणूस पाठवून दे आणि माहिती काढ.” पाणिनी म्हणाला.
“ माझ्या कनेक्शन मधला तिथे कोणी नाहीये.मी दुसरी काहीतरी सोय करून माहिती काढतो.” कनक म्हणाला.
“ मला आज मध्यरात्री पर्यंत दे शक्यतो.” पाणिनी म्हणाला.
पुढच्या दीड तासात ते विलासपूरला उतरले आणि त्यांनी टॅक्सी केली. रती रायबागी, ने तिचा जो पत्ता पाणिनीला ऑफिसात आल्यावर दिला होता त्यावर ते पोचले आणि त्यांनी दारावरची बेल वाजवली.आतून काही प्रतिसाद आला नाही.
“ काय करायचं आता? ” सौंम्याने विचारलं.
“ मला वाटतंय की आपल्याजवळची किल्ली लावून बघायला हरकत नाही.”
सौंम्या अस्वस्थ झाली.
“ आपल्या सोबत पोलीस असलेले बरे, आपण हे करताना.”
पाणिनीने नकारार्थी मान हलवली. “ अजून आपल्याला पुरेसा तपशील कळलेला नाही.पोलिसांना बोलावणे आपल्या अंगलट येऊ शकतं.तिला आपण संरक्षण द्यायला हवंय ”
“ कशापासून संरक्षण?” सौंम्याने विचारलं.
“ ते मला सांगता नाही येणार अत्ता तरी.” पाणिनी म्हणाला आणि रती च्या पर्स मधे मिळालेला किल्ल्यांचा जुडगा काढला, त्यातली एक एक किल्ली त्याने लॅच च्या फटीत घालायला सुरवात केली.बऱ्याच किल्ल्या ट्राय केल्यावर एक किल्ली बरोबर लागली.दार उघडल.
“ चल आत सौंम्या.” पाणिनी म्हणाला.
“ आत कसं जायचं सर? ती घरात नसतांना?” सौंम्याने विचारलं.
“ तुला काय माहित की ती घरात नाहीये?”
“ तिने आपण घंटा वाजवूनही दार उघडल नाही.” सौंम्या म्हणाली.
“ ती कामात असेल सौंम्या.किंवा तिला अत्ता कोणाला भेटायचं नसेल.”
सौंम्या तरीही अडखळली.
“ एक काम करू सौंम्या, तू जरा बाहेरच थांब,मी एकटाच आत जातो.”
“ तुमचा विचार का बदलला सर?” सौंम्याने विचारलं.
“ आत एखाद प्रेत वगैरे पडलेलं नाही ना जरा बघतो.” पाणिनी म्हणाला.
“ तिचं?” सौंम्याने विचारलं.
“ माहित नाही.तिच्या रिव्हॉल्व्हर मधून दोन गोळ्या मारल्या गेल्या आहेत सौंम्या, त्या कशात घुसल्या असतील सांगता येणे अवघड आहे.” पाणिनी म्हणाला.
त्याने आत जाऊन आधी दिव्याचं बटन शोधून काढलं आणि दिवे लावले. वरकरणी तो तीन खोल्यांचा फ्लॅट दिसत होता.अत्ता तो उभा होता तो हॉल, बाजूचं दार बहुदा बेड रूम मधे उघडत असाव.दुसर दार उघडच होत,त्यातून स्वयंपाकघर दिसत होत.
“ आत प्रेत वगैरे पडलेलं दिसत नाहीये.” पाणिनी म्हणाला. “ काही पुस्तकं दिसताहेत इथे आणि टेबलावर काही मॅगाझीन आहेत.टेबलावर अॅश ट्रे आहे, त्यात सिगारेट ची दोन थोटकं आहेत सौंम्या, आणि ग्लास आहे, ... माय गॉड......” पाणिनी उद्गारला.
“ काय झालं सर?” सौंम्या ने घाबरून विचारलं.
“ अग, ग्लासात बर्फाचे तुकडे तरंगताहेत अजून ! याचा अर्थ......” पाणिनी म्हणाला.
“ कोणीतरी इथे होत, थोड्या वेळापूर्वी ” सौंम्या म्हणाली.
“ किंवा अजूनही इथेच असाव ! ” पाणिनी म्हणाला.
बेडरूम चे दार अचानक उघडलं.दारात एक तरुणी उभी होती.डोक्याला शॉवर कॅप होती.खांद्यावर टॉवेल होता.
“ आरामात बसा, माझी दखल न घेता घरच्या सारखं बसा.” ती म्हणाली.
“ माफ करा मला, पण मला माहित नव्हतं तुम्ही आत आहात म्हणून.मी दोन वेळा बेल वाजवली.दारावर खटखट केलं.त्या पूर्वी तुम्हाला दोन तीन वेळा फोन लावला होता पण मला कशालाच प्रतिसाद आला नाही.” पाणिनी म्हणाला.
“ मी दिवसभर चैत्रापूर ला होते.आता कृपा करून मला सांगाल का तुम्ही कोण? काय हवंय तुम्हाला आणि आत कसे आलात तुम्ही ते? की मी पोलिसांना बोलावू? ”
“ मी अॅडव्होकेट पाणिनी पटवर्धन. मी चैत्रापूर ला असतो.काल तुम्ही माझ्या ऑफिसातून निघून गेलात तर नंतर परत का नाही आलात? ”
“ काय बोलताय तुम्ही? माझ्या आयुष्यात मी कधी तुमच्या ऑफिसात आलेली नाहीये.मला तर वाटतंय तुम्ही वकील वगैरे नाहीच आहात. तुमच्या बरोबर ही कोण आहे? ”
“ माझी सहकारी सौंम्या सोहोनी.” पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही आत कसे आलात?”
“ तू दिलेली किल्ली वापरून.” पाणिनी म्हणाला.
“ माझी किल्ली?म्हणजे?”
“ तू तुझी किल्ली माझ्या ऑफिसात विसरून गेली होतीस.इतरही अनेक वस्तू होत्या.”
“ मला वाटत पोलिसांना बोलावणं ठीक राहील.” अचानक ती बेडरूमच्या दारातून आत पळाली.पाणिनीला दिसल की तिने आपल्या टेवलाचा ड्रॉवर झपकन उघडला.तिच्या चेहेऱ्यावर भीतीयुक्त आश्चर्य उमटलं.झटक्यात ती बाहेर आली.आपल्या जवळचा फोन उचलला.
( प्रकरण २ समाप्त)