Ek Pakda Wada - 4 in Marathi Horror Stories by Kalyani Deshpande books and stories PDF | एक पडका वाडा - भाग 4

Featured Books
  • અસવાર - ભાગ 3

    ભાગ ૩: પીંજરામાં પૂરો સિંહસમય: મે, ૨૦૦૦ (અકસ્માતના એક વર્ષ પ...

  • NICE TO MEET YOU - 6

    NICE TO MEET YOU                                 પ્રકરણ - 6 ...

  • ગદરો

    અંતરની ઓથથી...​ગામડું એટલે માત્ર ધૂળિયા રસ્તા, લીલાં ખેતર કે...

  • અલખની ડાયરીનું રહસ્ય - ભાગ 16

    અલખની ડાયરીનું રહસ્ય-રાકેશ ઠક્કરપ્રકરણ ૧૬          માયાવતીના...

  • લાગણીનો સેતુ - 5

    રાત્રે ઘરે આવીને, તે ફરી તેના મૌન ફ્લેટમાં એકલો હતો. જૂની યા...

Categories
Share

एक पडका वाडा - भाग 4

असा विचार करून मी भिंतीला टेकली आणि माझी मान वर जाताच मला जे काही दिसलं ते एवढं अनपेक्षित होतं की माझं हृदय बंद पडते की काय असं मला वाटून गेलं. मी खुणेने रक्षाला वर बघण्यास सांगितलं. तिनेही वर बघितलं आणि तिचे डोळे विस्फारल्या गेले.

वर छतावर सगळे सांगाडे लटकलेले होते. म्हणजे ते गायब झाले नव्हतेच आमच्यावर नजर ठेवून होते.
आमची नजर वर जाताच ते धडाधड एकेक करून खाली कोसळू लागले.
तेवढ्यात मला त्या चौथ्या मोठ्या कपाटात गेल्याशिवाय गत्यंतर नाही असं वाटलं कारण बाहेर पडण्याचं दार बंद होत आणि ते कपाट आत्तापर्यंत बंदच होतं ह्याचा अर्थ ते रिकामच असणार असं वाटून
मी धडपडत उठली आणि
"रक्षा त्या कपाटाकडे चल",असं मी तिला चौथ्या बंद कपाटाकडे खूण करून पुटपुटत म्हंटल.

आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करून कशातरी त्या चौथ्या कपाटाजवळ पोचलो.

"इथे का यायला सांगि...",तिने मला विचारायच्या आत मी पटकन कपाटाचं दार उघडलं कपाट माझ्या अपेक्षेप्रमाणे रिकामं होतं आणि खूप मोठं होतं. आम्ही दोघी त्या कपाटात गेलो आणि फटकन मी दार आतून लावण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यात एका सांगाड्याने दार धरून ठेवलं आम्ही सर्व शक्तीनिशी त्याला दूर ढकललं आणि दार लावून घेतलं.

"दुसरा मार्ग नव्हता बाहेर आपण जाऊ शकत नव्हतो ते सांगाडे आपल्याला जिवंत ठेवत नव्हते ह्या कपाटातून काहीच बाहेर आलं नाही म्हणून मला वाटलं हे रिकामं असेल म्हणून मी तुला इथे यायला सांगितलं",असं मी म्हणेपर्यंत ते सांगाडे बाहेरून चहूबाजूने कपाटाला धडका मारू लागले.

कपाट खल खल हलू लागले. आम्ही आतल्या आत कपाटाच्या आत आपटल्या जाऊ लागलो आणि अचानक कुठली तरी कळ दाबल्या जावी असं झालं आणि कपाटाची खालची बाजू दार उघडावे अशी उघडली आणि आम्ही दोघीही खाली एका अरुंद अंधाऱ्या बोगद्यातून खाली खाली घसरल्या जाऊ लागलो.

आपण कुठे जातोय काहीच कळत नव्हतं आपले डोळे उघडे आहेत की बंद हे सुद्धा कळणार नाही एवढा मिट्ट काळोख त्या बोगद्यात होता. आम्ही दोघींनी एकमेकींचे हात घट्ट धरून ठेवले होते. हा बोगदा कधी संपणार आणि आम्हाला कुठे घेऊन जाणार काहीच अंदाज लागत नव्हता. आम्ही मोठमोठ्याने किंचाळत होतो पण आमचा आवाज घुमत होता त्यामुळे खूप भेसूर वाटत होता.

हळूहळू बोगड्यातलं वातावरण थंड थंड अधिक थंड होऊ लागलं. आम्हाला प्रचंड थंडी वाजू लागली. आम्ही आता डावी वळून घसरल्या चाललोय असं मला जाणवलं त्या नंतर बोगद्याने उजवं वळण घेतलं. मग पुन्हा खाली आम्ही घसरू लागलो. आता अत्यंत कुबट ओला वास येऊ लागला.

बोगद्यातून एकदम खाली फरशीवर आम्ही आपटलो.

सगळीकडे अंधार होता सगळ्या फरशा शेवाळल्या होत्या. अंधारात डोळे सरावायला आम्हाला थोडा वेळ लागला. अत्यंत उग्र वास येत होता. तेवढयात काहीतरी माझ्या पायावरून वळवळत वर येतेय असं मला जाणवलं. मी हाताने ते काढून फेकलं तर ते वळवळत दूर निघून गेलं. तेवढ्यात रक्षाच्या डोक्यावर एक वेटोळं फटकन पडलं ती भीतीने गंगारली तिने डोकं झटकले, एक काळा शार नाग सळसळत निघून गेला.

आता आमची नजर बऱ्यापैकी अंधाराला सरावली होती. आम्ही बघतो तर काय आमच्या चहूबाजूने सापच साप होते, काळे,पिवळे करडे, हिरवे साप मोठमोठे फणा काढलेले नाग, शेपटीवर उभ्या असलेल्या अनेक धामण बापरे! भीतीने सरसरून काटा आला. सगळीकडे ते वळवळणारे भयानक विषारी प्राणी आणि सर्वत्र कुबट उग्र ओला वास ओलसर शेवळलेली जमीन
किळस भीती थकवा काळजी ह्या सगळ्या भावना आमच्या मनात गर्दी करून गेल्या.

आमच्यात उभं राहण्याचं त्राण नव्हतं कुठे बसायला काय उभं राहायला ही जागा नव्हती. सतत वळवळणाऱ्या त्या प्राण्यां पासून आम्ही स्वतः ला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. ते सारखे आमच्या पायांवरून वळवळत होते आणि आम्ही पाय झटकत एका पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत होतो.

क्रमशः