Josephine - 1 in Marathi Horror Stories by Kalyani Deshpande books and stories PDF | जोसेफाईन - 1

Featured Books
  • અસવાર - ભાગ 3

    ભાગ ૩: પીંજરામાં પૂરો સિંહસમય: મે, ૨૦૦૦ (અકસ્માતના એક વર્ષ પ...

  • NICE TO MEET YOU - 6

    NICE TO MEET YOU                                 પ્રકરણ - 6 ...

  • ગદરો

    અંતરની ઓથથી...​ગામડું એટલે માત્ર ધૂળિયા રસ્તા, લીલાં ખેતર કે...

  • અલખની ડાયરીનું રહસ્ય - ભાગ 16

    અલખની ડાયરીનું રહસ્ય-રાકેશ ઠક્કરપ્રકરણ ૧૬          માયાવતીના...

  • લાગણીનો સેતુ - 5

    રાત્રે ઘરે આવીને, તે ફરી તેના મૌન ફ્લેટમાં એકલો હતો. જૂની યા...

Categories
Share

जोसेफाईन - 1

Josephine D'Souza ही एक मानसिक रुग्ण स्त्री होती. ती एका गुप्त कंपनीत काम करायची. ती कोणाशीच बोलायची नाही. ती बरेचदा घरीच असायची. ती सतत घरात खिळे ठोकायची. ती सतत काहीतरी कुटत बसायची आणि सारखे दार आपटत बसायची. आणि दारावर डोके आपटत बसायची.

ती विचित्र दिसायची ती तिच्या मोठ्या चष्म्यामुळे. चष्मा काढल्यावर तिला काहीच दिसायचं नाही.

हां आणखी एक गोष्ट म्हणजे ही की तिला उजेड सहन व्हायचा नाही ती घरातील पडदे सतत बंद करायची.

तिला सतत पाणी पडण्याचा आवाज यायचा, थेंब थेंब पाणी... टप टप टप....

ती रात्री बे रात्री घरातील जड सामान एकडून तिकडे सर्कवायची.  तिचे घर आडबाजूला असल्याने कोणाचे सुरुवातीला फारसे लक्ष गेले नाही पण नंतर नंतर सगळ्यांना तिचे वागणे,राहणे विचित्र वाटू लागले.

ज्या व्यक्तीकडून तिने घर भाड्याने घेतलं होतं ती व्यक्ती पुन्हा कधीही दिसली नाही.

अश्या  विचित्र Josephine ला एक विचित्र बॉयफ्रेंड होता. Josephine त्याच्यासोबत live in मध्ये राहायची.

जोसेफाईन चे एकच दुःख होतं ते म्हणजे तिला मुलबाळ नव्हत. त्यासाठी ती तिच्या बॉयफ्रेंड जवळ भेसूर आवाजात रडायची. बरोब्बर शनिवारी रात्री एक दीड वाजता तिचा तो भेसूर आवाज वातावरणात घुमायचा.

ज्याने ज्याने तो आवाज ऐकला त्याच्या हृदयात चर्र व्हायचं.

रात्रीच्या शांत वातावरणात तो आवाज अत्यंत भयानक वाटायचा. तिला नैराश्याचे झटके यायचे. ती रात्री बारा वाजता बास्केट बॉल खेळायची. जोरजोरात इकडून तिकडून धावायची. रात्री एक वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत ती खराब झालेली वॉशिंग मशीन लावायची ज्यात एकही कपडा नसायचा.

त्या मशीन चा आवाज एखाद्या बुलडोझर सारखा यायचा. ती मशीन तिने तिच्या गावाहून आणली होती.

तिच्या घरातून सतत रात किड्याचा आवाज यायचा.

तिच्याकडे एक ड्रिलिंग मशीन होती जीचा आवाज बरोब्बर अमावस्येला रात्री बारा वाजता यायचा.  दर अमावस्येला रात्री बारा वाजता ती भिंतीला बारा खिळे ठोकायची.

जोसेफाइन असे विचित्र का वागत होती ते कोणालाही कळलं नाही. तिचे घर एका बाजूला होते. तेथे कोणीही येत जात नसे.

आणि हो जोसेफाईन आणि तिचा बॉयफ्रेंड ह्यांना अत्यंत घाणेरडी आणि विकृत सवय होती ती म्हणजे लोकांच्या घरांच्या खिडकीशी नाक लावून बघत राहणे. अनेकदा लोकांनी त्यांना ह्यासाठी बेदम हाणले होते पण त्यांची ती विकृत सवय काही जाईना. लोकं सतत त्यांना शिव्या शाप देऊ लागले.

एके दिवशी कमाल झाली. ती सकाळ वेगळीच होती. विचित्र आणि विकृत जोसेफाइन जवळ एक गोड बाळ दिसलं. तीने एक बाळ दत्तक घेतलं होतं. तिच्या घरातून बाळाचा आवाज येऊ लागला. दिवसभर आणि रात्रभर बाळ निपचित झोपून राहत असे. ते फक्त संध्याकाळी बाहेर दिसत असे. बाळाच्या आगमनाने जोसेफाइन ला वेडाचे झटके जरा कमी येऊ लागले. सकाळ संध्याकाळ बाळाशी थोडं बोलून ती बाळाला मोलकरणीपाशी सांभाळायला देत असे.

एके रात्री असेच बाळाला मोलकरणीकडे सोपवून वीकेंड ला तिने बॉस ला पार्टीसाठी तिच्या घरी invite केलं होतं. ती,बॉस आणि बॉयफ्रेंड यांच्यात भरपूर दारू,गप्पा झाल्या. कोणाला कशाचीच शुद्ध राहिली नाही. सकाळी किती तरी वाजता जाग आल्यावर बॉस धडपडत जवळच असलेल्या त्याच्या घरी निघून गेला.

असेच दिवस जात होते. काही दिवस चांगले गेल्यावर

जोसेफाइन ला पुन्हा वेडाचे झटके येऊ लागले. तिला जगातल्या सगळ्यांचा राग येऊ लागला. हळू हळू अती रागाने तिची वाचा जाऊ लागली. ती कुत्र्यासारखी भुंकू लागली. कोल्हेकुई करू लागली.

तिला माणसांची भाषा येईनाशी झाली. तिला बाळाशी बोलणे जड जाऊ लागले. आता संपूर्ण वेळ बाळ मोलकरणीपाशीच राहू लागले. मोलकरीण सुध्धा तिला घाबरु लागली परंतु पैश्याच्या आमिषाने मोलकरीण निमूटपणे काम करत असे.

अनेकांनी जोसेफाइन ला तिच्या गावी निघून जायचा सल्ला दिला पण तिला घर सोडण्याची भीती वाटत असे. ह्या भाड्याच्या घराशी तिचे काहीतरी मागच्या जन्माचे नाते असावे अश्या प्रकारे ती त्या घराला शेवटपर्यंत चिकटून राहिली.

त्या दिवशी झालेल्या पार्टीत बॉस सोबत झालेल्या चुकीमुळे तिला एका दुर्धर रोगाची लागण झाली. जेव्हा तिला आणि बॉस ला हे कळले तेव्हा त्या दोघांना धक्का बसला. दोघेही खूप घाबरले. बॉसला बायकोला आणि जोसेफाइन ला बॉयफ्रेंड ला कसे तोंड द्यायचे हे कळेना.

अत्यंत घाबरल्यामुळे आणि नैराश्यामुळे दोघांनी एक निर्णय घेतला. दोघांनीही एका अमावस्येच्या रात्री फास लावून आयुष्याचा शेवट केला.

त्यानंतर ते बाळ, तो बॉयफ्रेंड, ती मोलकरीण कुठे गेले हे कोणालाही कळले नाही.

आजही त्या घरात काहीतरी ठोकण्याचा,भुंकण्याचा,कोल्हेकुई चा आवाज येतो, बरोब्बर शनिवारी रात्री एक वाजता. त्यापाठोपाठ भेसूर आवाज येतो Josephine च्या रडण्याचा.