निकीताचे हात पाय घट्ट बांधले होते . त्यामुळे तिला कोणतीच हालचाल करता येत नव्हती ती एकटक छताकडे पाहत होती . बघता बघता ती भुतकाळ हरवली कारण , ती आता निकीता नव्हती तर , कोणातरी वेगळ्या स्त्रीने तिच्यावर कब्जा केला होता . कोण होती ती ? काय होता तिचा भुतकाळ ?काही वर्षांपूर्वी......" श्रुती अगं ए... , श्रुती लवकर उठ बघ तुझी मैत्रीण तुझी वाट पाहत आहे ", श्रुतीच्या आईने तिला पाचव्यांदा आवाज दिला . श्रुतीने घड्याळही खाली आपटले होते . ती आळस देतच उठली . "अगं ! तुला कॉलेजला जायचे नाही काय ? बघ तुझी मैत्रीण केव्हाची तुझी वाट पाहत आहे.", श्रुतीची आई पुन्हा तिच्यावर ओरडली . " कोण मैत्रीण , अरे बापरे आधीच का नाही सांगीतलेस", श्रुती घाईघाईत उठत म्हणाली . "केव्हापासून आवाज देत आहे तुला , पण तु काही उठण्याचे नाव घेत नाहीस . "श्रुतीने घाईघाईत आपले सर्व काही आवरले . आपली पर्स तिने गळ्यात घातली व लगेचच बाहेर पडली ."अगं ! नाश्ता तर करून जा! ", आई म्हणाली . " नको आई आधीच फार उशीर झाला आहे , आम्ही कॅन्टीनमध्ये खाऊन घेऊ..... बाय पप्पा ..", आपल्या बाबाला बाय करतच श्रुती म्हणाली . ती घराबाहेर पडली .श्रुती," , सॉरी यार उशीर झाला... मला माफ कर..."" तुझे हे नेहमीचेच असते , दरदिवशी उशीर."श्रुतीने स्कुटी काढली . तिची मैत्रीणही मागे बसली . काही वेळातच त्या दोघ्याही कॉलेजला येऊन पोहचल्या. आधी दोघींनी खाऊन घेतले . " तु कितीदा माझा खर्च उचलनार गं! श्रुती."श्रुती ," मला माहित आहे तुझी परीस्थिती आणि असे नेहमीच टोकत जाऊ नकोस मला, वाईट वाटते."दोघीही क्लासरूमध्ये बसल्या होत्या इतक्यात श्रुतीला फोन आला. " कुठे चाललीस तु आता क्लास सुरू होईल."" तु बस ! माझी काळजी करू नकोस मी येतेच ", असे म्हणत श्रुती बाहेर पडली .लेक्चर संपून गेले तरी श्रुतीचा काहीच पत्ता नव्हता . तिची मैत्रीण वाट पाहत स्कुटी जवळ येऊन थांबली . काही वेळातच तिला श्रुती एका बाईकवर दिशली एका मुलाबरोबर . दोघेही हसत होते . बाईक तिथेच थांबली . श्रुती त्या मुलाला बाय करतच स्कुटी जवळ आली . तिची मैत्रीण एकटक तिला पाहत होती," कोण होता तो ? ज्याच्यासाठी तु तुझा क्लास बुडवतेस ." श्रुती ," आहे कोणीतरी आपला जवळचा ." " म्हणजे तुझा बॉयफ्रेंड काय ? नाव काय आहे त्याचे ?"श्रुती लाजतच म्हणाली," सोहम ....."श्रुती आपल्या मैत्रीणीला घरी पोहचवून आपल्या घरी परतली . समोरच समीरची कार उभी होती . " आज दादा इतक्या लवकर का परतला?', तिने स्वत: शीच विचार केला . पण ते काही तिच्या साठी म्हत्त्वाचे नव्हते . ती आज फार आनंदात होती . एक वेळ तिने सोहमने दिलेल्या साखळीकडे नजर टाकली व तिने घरात प्रवेश केला . पण समोरचे दृश्य पाहून तिचा आनंद ओसरला.श्रुतीच्या घरात एकदम शांतता होती . सगळेच काळजीत दिसत होते . " काय झाले तुम्ही इतके काळजीत का? ", त्यांना तसे बसलेले पाहून श्रुती म्हणाली . तिचा आवाज ऐकताच सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळल्या . " तो कोण आहे ? ", तिचे वडील रागातच खुर्चीवरून उठत म्हणाले . श्रुती थोडी घाबरली," कोण पप्पा? तुम्ही कोणाविषयी बोलत आहात ? "श्रुतीचे वडील तिला मारण्यासाठी म्हणून धावले पण श्रुतीच्या आईने त्यांना थांबवले .समीर मध्ये पडत म्हणाला ," मी ओळखतो त्याला ड्याड , माझ्याच कंपनीत काम करतो तो , पण मला त्याचा स्वभाव जराही आवडत नाही . त्याचे नाव सोहम आहे ."श्रुती आता चांगलीच बावचळली होती ," तुम्ही असे कसे सांगता?"समीर," आजच मी तुला त्याच्यासोबत पाहीले , पहले तर माझा विश्वास बसला नाही मग मी तुमचा पाठलाग केला आणि सर्वकाही आता समोर आले ."श्रुती," होय मी त्याच्यावर प्रेम करते आणि मला तो कोणत्या धर्माचा आहे किंवा काणत्या जातीचा आहे ह्या विषयी काहीच उत्सूकता नाही कारण तो माझ्यावर जिवापाड प्रेम करतो."" काय बोलतेस तू.....असे म्हणत श्रुतीचे वडील पुढे झाले व एक जोरदार थप्पड तिच्या कानाखाली हानली ." ड्याड प्लिज तुम्ही थांबा मी सांभाळतो तिला . बघं श्रुती तो चांगला मुलगा नाहीये मी ओळखतो त्याला .", समीर तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला . श्रुतीच्या डोळ्यातून आसवे ओंघळत होती . ती समीरचा हात झटकत म्हणाली," मला कोणासीच बोलायचे नाही." असे म्हणत ती रडतच आपल्या खोलीत शिरली व तिने दरवाजा जोरात बंद केला . बाहेर पुन्हा सगळे काळजीत पडले . काही वेळ गेला श्रुती फारच रडली होती आई व दादा दारावर कितीदा येऊन गेले होते, त्यांनी दारही वाजवले होते पण श्रुतीने कोणताच प्रतिसाद दिला नव्हता . श्रुतिने लगेच सोहमला फोन लावला व घरात घडलेला सगळा प्रकार सांगितला . " तू असे रडू नकोस हं! मी काहीतरी मार्ग काढतो ", असे म्हणत सोहमने फोन ठेवला . सोहमला आई - वडील नव्हते नी कोणी आप्तेष्ट . त्याचे संगोपन त्याच्या आजोबा आजीने केले होते . सोहम हा लहानपणापासूनच थोडा वेगळ्या स्वभावाचा होता .श्रुतीचा फोन घनानला , फोनवर सोहम होता," श्रुती मी काय सांगतो एक ही माणसे आपल्याला कधीच एक होऊ देणार नाहीत म्हणून तुला माझ्यासोबत पळून जावे लागणार तेही आज रात्रीच . तु तयार आहेस ना ? ", सोहम म्हणाला . आधीच सोहमच्या प्रेमात वेडी झालेली श्रुती , तिने कोणताही विचार न करता होकार दिला कारण तिला सुध्दा वाटत होते घरचे कधीच आपले लग्न सोहम सोबत होऊ देणार नाहीत . ती लगबगीने आपले सामान आवरु लागली . तेवढयात तिचा दारावाजावर थापा पडल्या . " श्रुती बाळा जेवूण घे ! असी रागावू नकोस , सगळे काही ठिक होईल.", बाहेरून तिच्या आईने आवाज दिला तसी श्रुती दचकली ती म्हणाली ," नको आई मला भुक नाही आणि वेळोवेळी येऊन असे मला डिस्टर्ब नको करू , मला झोप येत आहे मला झोपू दे ."तिची आई निघून गेली होती . मध्यरात्र उलटून गेली होती . परत एकदा सोहमचा फोन आला . तो तिच्या घरासमोर . वाट पाहत आहे असे म्हणला . श्रुतीही किचनच्या खिडकी मधून बाहेर पडली . सोहम तिथेच . तिची वाट पाहत होता . दोघेही टॅक्सीने रेल्वे स्टेशनवर आले व ते एका रेल्वेत बसले . खरंतर श्रुतीला आपण काहीतरी चुकीचे करतोय असे वाटत होते . तिने साहिलच्या खांद्यावर डोके ठेवले .श्रुती," आता कुठे जायचे?"साहिल," कुठेही पण इथून दूर."मुंबईत राहणारे सोहम व श्रुती आता नाशिकला येऊन राहिले . श्रुती सोहम बरोबर अगदी आनंदात होती . काही वेळ तिला त्याचे वागणे विचित्र वाटे पण तिला त्याचे फारसे काही वाटत नव्हते . सोहम एका कंपनीत नोकरीला लागला . तसेच श्रुतीचे शिक्षण चांगले असल्याने तिलाही एका कंपनीत नोकरी मिळाली . तिला इथे चाळीत राहणे फारसे आवडत नव्हते . बऱ्यापैकी पैसे आल्यावर तिने सोहमला तिची ईच्छा बोलून दाखवली . पहले तर त्याने साफ नकार दिला पण नंतर तो राजी झाला . शहराबाहेर त्यांना जागाही मिळाली . श्रुतीने आपली पाई पाई गोळा केली घरासाठी व शेवटी एक सुंदर घर बांधून झाले . आता श्रुतीचा आनंद गगनात मावत नव्हता . आतातरी सोहमने आपल्यासी लग्न करावे असे तिला वाटत होते . पण सोहम नेहमीच टाळाटाळ करायचा . दिवस चालले होते . श्रुतीला सोहमच्या वागण्यात बदल जाणवू लागला . केव्हा केव्हा तर तो अगदीच रागात यायचा , काहीसे चिडचीडाही वागायचा . त्याने आपली नोकरीही गमावली होती, पण तो संपूर्ण दिवस कुठेतरी बाहेर असायचा काही वेळा रात्रीही तो घरी येत नसे . श्रुतीला त्याचे हे वागणे आवडत नसे .एके रविवारी ती असीच खोलीत बसली होती . आज तिच्या ऑफिसला सुट्टी होती . तेवढयात फोन घनाणला . श्रुतीने आपला फोन हातात घेतला पण त्यावर फोन आलेलाच नव्हता . तेवढयात तिचे लक्ष उशाला गेले सोहम आज फोन घरीच विसरला होता . त्याचाच फोन घणानत होता . श्रुतीने तो फोन उचलला .तसा तिकुन आवाज आला," सोहम , तु माझा फोन का उचलत नाहीस? मी तुझ्या मुलाची आई होणार आहे . हे जर माझ्या घरच्यांना कळले तर ते माझा जीव घेतील ." समोरून एका मुलीचा रडण्याचा आवाज येत होता . ते सर्व एकूण श्रुती अगदीच स्तब्ध झाली . " तु बोलत का नाहीस सोहम?....."श्रुतीने तसाच फोन खाली आपटला . तिला आपल्या काणावरती विश्वासच बसत नव्हता .ती आपल्या डोक्याला हात धरून बसली होती . खुप वेळाने . फोन कट झाला . श्रुतीने मोबाईल उचलला व तो ती चाळू लागली वेगवेगळे चॅटिंग व कॉल डिटेल्स ती तपासून लागली. ते सर्व पाहून ती हादरली तिला समजायचे ते सर्व ती समजली होती . तिने एक एका नंबरवरती कॉल केले प्रत्येकवेळी एखाद्या मुलीचा आवाज येत असे व त्यांचे काही बोलने . तिला फारच धक्का बसला होता . तिने एक शेवटचा नंबर चेक करायचा ठरवला .फोन लगेचच उचलला गेला तसे समोरून बोलने एकू आले, " सोहम तू इथे असता तुझा फोन मला कसा आला?"" वेडी ..लवकर ठेव तो पटकन.."आणि पुढच्याच क्षणी फोन कट झाला. .........हम्म तर , सोहम श्रुतीला धोका देत आहे , बघुयात ह्याचे परिणाम काय होतात व कथेचा शेवट कसा होतो ?