Does karma come back? in Marathi Classic Stories by Ankush Shingade books and stories PDF | कर्म फिरुन येत असतं?

Featured Books
Categories
Share

कर्म फिरुन येत असतं?

कर्म फिरुन येते?       


           एक स्री. तिला संसार करतांना बऱ्याच अडचणी येतात. घरं सांभाळतांना नाकीनव येत असतं. त्यातच नोकरीही करावी लागते. तरीही तिच्या नशिबी दुषणंच असतात. परंतु तिनं घाडरण्थाचं कारण नाही. कारण कर्म फिरुन येत असतं.          कर्म फिरुन येत असतं? हा काय प्रकार आहे? नक्कीच हा प्रकार कुणालाही विचीत्र वाटत असेलच. कारण कर्म हे कधीच फिरुन येत नाही आणि ते कुणीही आजमावले सुद्धा नाही.       

          कर्म फिरुन येत असतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे एखादा पक्षी. हा रानपक्षी किडे खात असतो. परंतु ते जेव्हा मरण पावतं. त्याला किडे खात असतात. याचाच अर्थ असा की त्या पक्षाचे कर्म हे फिरुन आलेले असतात. त्या पक्षानं जीवनभर किड्यांना खाण्याचं काम केलेलं असतं आणि आता मृत्यूनंतर तेच किडे त्याला खात असतात.  हे झालं त्या पक्षाच्या मृत्यूनंतरचं जीवन. मरणानंतर कोण पाहात असतं की आपल्या या नश्वर शरीराचं काय होणार आहे. परंतु कधीकधी जेव्हा हेच कर्म त्या पक्षाच्या जीवंतपणी परत येत असतील तर...... आहे ना विचित्र कल्पना. खरंच ही स्थिती, त्या पक्षाच्या जीवंतपणी निर्माण होवू शकेल काय? होय, ही स्थिती पक्षांच्या जीवंपणी निर्माण होवू शकते. जेव्हा तो पक्षी घायाळ वा जखमी होवून खाली जमीनीवर पडतो. तेव्हा हेच किडे त्याच जखमी अवस्थेत त्याला खात असतात. हे झालं पक्षांचं. ज्याला आपण जंगलाचा राजा समजतो. त्याची स्थितीही अशीच असते. तो शेकडो प्राण्यांना खात असतो व ते शेकडो प्राणी मरण पावून त्यांचा किड्यातच जन्म झालेला असतो. तेच किडे जंगलाचा राजा म्हातारा झाल्यावर वा तो असहाय्य जखमी अवस्थेत असल्यावर त्याला खात असतात. तसा पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही. परंतु कधीकधी पुनर्जन्मावरही विश्वास ठेवावा लागतो. असंच कधीकधी घरात वा परीसरात घडतं. आपल्याला दिवंगत व्यक्तींसारखी दिसणारी व्यक्ती दिसते. त्यावरुन मेलेल्या माणसांची आठवण येते. कधीकधी त्यांचे हावभाव मेलेल्या माणसांसारखे असतात. कधीकधी वर्तमानपत्रात छापून येतं की अमूक व्यक्ती जन्माला आला व त्याला, तो जिथे जन्मला. तेथील परीसर आठवला. त्यानंतर त्याला तिथं नेलं असता ते सत्य होतं.      

             कर्म परत येत असतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बेडूक व सापाचं उदाहरण. साप बेडकाला खातं. हे आपण नेहमी अनुभवलं. परंतु कधीकधी बेडूकही सापाला खातं. याचेही उदाहरण फेसबुकवर येय असतात आणि वास्तविक सत्य आहे. आपण नेहमी ऐकलं आहे की साप उंदराला खात असतं. परंतु कधी उंदीर सापाला खातं का? हे ऐकलं नाही. परंतु मी एकदा स्वतः पाहिलं आहे सापाला उंदीरानं खाल्लेलं.            कर्म फिरुन येतं. ही गोष्ट माणसाच्याही जीवनात लागू आहे. माणूसही जेव्हा तरुण असतो. तेव्हा तरुणाईचा जोश दाखवत असतो. असं वाटत असतं की तो किती बलवान आहे. तो त्या बलवानपणाचा अघोरीपणानं वापर करीत असतो. त्यावेळेस तो कुणावरही अत्याचार करीत असतो. परंतु जेव्हा तोच व्यक्ती म्हातारा होतो व असहाय्य होतो. त्याचे खांदे थरथरतात. हात करकर कापतात. तेव्हा मात्र तो असहाय्य समजू शकतो स्वतःला. त्या वयात त्याला लहान लहान आजुबाजूची मुलं चिडवीत असतात. त्यांची नातवंड त्याला त्रास देत असतात. त्याची सुन त्याला खायला प्यायला देत नाही. असं का होतं? असं होतं, कारण त्या व्यक्तीनं आपल्या तरुणपणात ज्या व्यक्तीवर अत्याचार केला होता. तो व्यक्ती आपला बदला घेण्यासाठी त्याच व्यक्तीच्या आजुबाजूला जन्म घेवून आलेला असतो व तो व्यक्ती त्याला त्या व्यक्तीकडून जो जो त्रास झाला, त्याचा बदला घेण्यासाठी आलेला असतो.       

            स्रियांच्या जीवनातही तसंच होत असतं. म्हणतात की चार दिवस सासूचे व चार दिवस सुनेचे असतात. जेव्हा सासू तरुण असते व ती सुन असते. तेव्हा ती आपल्या सासूवर अत्याचार करीत असते. परंतु तीच सासू मरण पावते. ती मेल्यानंतर अशा ठिकाणी जन्म घेते व ती सुन म्हणून तिच्या घरी येते. त्यानंतर काय घडते हे आपल्याला माहितच आहे. विशेष म्हणजे आपले कर्म नेहमी परत येत असतात. जर आज आपण कोणावर आज अत्याचार करीत असेल तर तोच व्यक्ती आपल्यावर तद्नंतर अत्याचार करीत असतो. कधी दुसरा जन्म घेवून. ज्याला आपण पुनर्जन्म म्हणतो. कधी त्याच्या यातना त्याच जन्मात जीवंतपणीच भोगाव्या लागतात. ते आपल्याला दिसतं. कधीकधी आपण अशा यातना भोगणाऱ्या व्यक्तीमत्वाकडे पाहून हळहळत असतो. आपल्याला दया येत असते व आपण विचार करीत असतो की किती ह्या बिचाऱ्यांना यातना. या यातना सहन होणाऱ्या नाहीत. हे आपलं खरं असलं तरी आपल्याला हे माहित नसतं की त्या व्यक्तीचे कर्म हे परत आलेले असते. ज्या तरुण किंवा बालपणात त्यानं आपल्या अक्कलहुशारीनं कुणाला दुखावलेलं असतं. ज्यामध्ये केवळ मानवच नाही तर पशुपक्षी, प्राणी, किटक, वा सुक्ष्म जीव असू शकतात. हेच आपण अनवधानानं त्रास दिलेले संबंधीत सृष्टीतील जीव पुनर्जन्म घेवून आपल्या अवतीभवती जन्माला आलेले असतात. आपल्याला त्रास देत असतात. कधी एखादा डास बनून ते चावत असतात तर कधीकधी एखादा ढेकुण बनून. कधी सुन बनून आपल्याला त्रास देत असते तर कधी एखादा वात्रट मुलगा बनून. मग आपण म्हणतो, की मी काय असं वाईट केलंय. महत्वपूर्ण बाब ही की आपण केलेले चांगले कर्म तेवढेच आपल्याला दिसतात. वाईट कर्म कधीच आपल्याला दिसत नाहीत. याबाबत एक उदाहरण आहे. शय्येवर पडलेला भिष्म पितामहा क्रिष्णाला विचारतात.   

     " प्रभू, मी असं कोणतं पाप केलं की मला ही शय्या भोगावी लागत आहे?"     

     क्रिष्णानं ते ऐकलं व म्हटलं,       

    "ही शय्या म्हणजे तुझ्या हातून घडलेलं पाप आहे." 

         "ते कसं काय?"

           "तुला आठवत नसेल तर मी सांगतो." असं म्हणत क्रिष्ण सांगू लागला. 

           "तू तरुण असतांना जेव्हा आपल्या रथावर चालला होता. तेव्हा अचानक घोडे थांबले. त्यावर तू विचारलं, काय झालं. तुला उत्तर मिळालं, एक मोठा साप रस्त्यावर आडवा आलाय. त्यावर तू उत्तर दिलंय की त्या सापाला उचलून बाजूला करा. परंतु त्या शिपायांनी त्या सापाला उचलून बाजूला केलं नाही. त्याला फेकून दिलं. त्यानंतर तो साप एका कोटेरी बाभळीच्या फांदीवर पडलं. त्याला असंख्य काटे बोचले व ते तडफडून मरण पावलं. आज तोच साप अर्जून रुपानं बदला घेण्यासाठी जन्माला आलाय व त्यानं तुला त्याच बाभळीच्या काट्यासारखे बाण मारलेय." 

        भिष्माला क्रिष्णानं सांगितलेला सारिपाट. आज भिष्माला ते माहित होताच पश्चाताप होत होता. परंतु आता पश्चाताप करुन काहीच उपयोग नव्हता. कारण  जे कर्म केले होते. ते परत आले होते. 

         माणसानं चांगलेच कर्म करावे. वाईट कर्म करु नये. कारण चांगल्या कर्माचा परिणाम हा चांगलाच होतो व वाईट कर्माचा परिणाम वाईटच होतो. कालांतरानं का होईना, कर्म परत येतंच. जे कर्म आपल्याच नाशाला कारणीभूत ठरत असतं. आपण जेव्हा वाईट कर्म करीत असतो. तेव्हा आपल्याला आनंद वाटत असतो. परंतु हेच कर्म जेव्हा आपला काळ बनून येत असते. तेव्हा मात्र अतीव वेदनादायक त्रास होत असतो. म्हणूनच कोणतेही वाईट कर्म का असेना, ते करतांना दहावेळा विचार करावा. मगच पावलं टाकावीत. कारण कर्म हे कधीतरी आयुष्यात परत येत असतात. आपण जर चांगलं कर्म केले असतील तर त्याचे परिणाम चांगले निपजतात. आपण जर वाईट कराम केले असतील तर त्याचे परिणाम वाईट निपजतात. आपले वाईट कर्म असतील व त्यातून वाईट परिणाम दिसत असतील तर लोकं हळहळतात. परंतु मदतीला कोणीही येत नाही. अन् वाईट कर्मासोबत चांगल्या कर्माची जोड असेल तर लोकं हळहळतच नाहीत. मदतही करतात. म्हणूनच कर्म करतांना चांगलेच कर्म करावे. कारण अनवधानानं घडणाऱ्या वाईट कर्माला आपले चांगले कर्म संरक्षक कवच म्हणून लाभदायक ठरत असतात. हे तेवढंच खरं.         


   अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०