एकदा माझ्या एका मित्रा च्या बागेत या फुलाचा ताटवा दिसला माझा हा मित्र वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांचा खूप शौकीन होता आमच्या गावी बदलीवर आलेला तो एका भाड्याच्या घरात राहत होता तरीही त्याने आजूबाजूला मस्त फुलबाग फुलवली होती जेंव्हा या फुलांचा ताटवा त्याच्याकडे पाहिला तेव्हा ती सुंदर पांढरीशुभ्र आणि गुच्छा प्रमाणे आलेली फुले बघून आणी त्याचा मंद मोहक वास पाहून मी त्याला या फुलांचे नाव विचारले तर तो“भुईकमळ असे म्हणाला ..त्या वेळीच त्या फुलांनी माझे चित्त आणि मन मोहून घेतले होते..दोन तीन वर्षे आमची मैत्री होती ..एकमेकांकडे सतत येण्याने असायचे माझी घरची बाग सुद्धा खूप मोठी होती त्यालाही माझी बाग आवडायची पण नंतर नोकरी एका वर्षी त्याची बदली होऊन त्याला खूप दूर जाण्याची पाळी आली व्यथित अंतःकरणाने त्याला निरोप द्यायची पाळी आली यानंतर कधी भेट होईल कोण जाणे....दोघेही थोडे नाराजच होतो त्याला निरोपाचे जेवण देण्यासाठी जेंव्हा मी घरी बोलावले तेव्हा त्याच्या बागेतले भुईकमळाचे मला आवडलेले.गड्डे काढून तो भेट म्हणून मला देऊन गेला त्याची आठवण म्हणून ..❤️तो नोकरीच्या गावी रुजू झाला पोचल्याचे पत्र आले हळुहळू तिकडेच रुळला तसे पत्रांचा ओघही कमी झालातसे भेट होणे दुरापास्त होते फक्त अधून मधून येणाऱ्या पत्रांची सोबत होती आता माझ्या बागेत या भुईकमळ कंदानी चांगला जोर धरला हळुहळू फुले लागू लागली मला पण ही फुले खूप आवडत असत उन्हाळ्याच्या दिवसात अचानक एक हजार फुले फुलल्या सारखे त्यांचे आगमन होत असे आधी छोटी छोटी फळे ..मग ती थोडी कडक होत असत ..आणी मग त्यातून कळ्या बाहेर पडत ..आणी मग अचानक एके दिवशी सुंदर वासाचा हा गुछ्..बाहेर पडे खूप मोहक वास ..पांढरा शुभ्र ..आकर्षक रंग आणी एकंदरच हिरव्या मोठ्या मोठ्या आणी गोल आकाराच्या पानाच्या आडोशातून डोकावणारी ही फुले पाहणाऱ्या माणसाला अगदी मोहून टाकत!!आमच्या कडे येणारा प्रत्येक जण आवर्जून या फुलाची चौकशी करे ,❤️ह्याचा बहर ..पण बरेच , दिवस राहत असे पहिल्या वर्षी त्याला फुले आली तेव्हा मला खूप बरे वाटले मित्राची आठवण प्रकर्षाने आली ..नंतर मात्र काय झाले कोण जाणेत्या छोट्या झुडपाचे आस्तित्व च संपले आणी अचानक ते सारे वैभव नाहीसे झाले ..मला मनातून खूप वाईट .. वाटले😥 त्या झुडपाच्या जवळच मी नुकतेच कमळाच्या फुलासाठी तळे बांधायला काढले होते कामगार पण काम करीत होते मला वाटले त्यांनीच काही धसमुसळेपणा केला असेल आणी त्यामुळे हे छोटेसे झाड मेले ..त्या कामगार मुलावर पण मी खूप ओरडले पण ओरडून थोडेच ..ते झुडुप परत येणार होते ...मनात आले मित्राने आठवण म्हणून पाठवले ..पण झाड गेले तर आठवण थोडीच जाणार आहे ?असेच मग काही दिवस गेले बागेतल्या इतर सर्व फुलांच्या नादात मी या फुलांना विसरून गेले आणी मग अचानक पुन्हा उन्हाळ्या ची चाहूल लागली ..उष्ण वारे वाहू लागले जमीन नुसती उन्हाने तावून निघाली या वेळी उन्हाळा थोडा जास्त आहे की काय असेही भासू लागले आणी मग ..अचानक लक्षात आले बागेतल्या तळ्या जवळ जमिनीला मोठ्या भेगा पडल्यात घुस वगैरें लागली की काय ..असे वाटले ..रात्री जोरदार वळवाचा ..पाऊस पण पडला .आणी दुसऱ्या दिवशी सकाळी पाहते तो काय चक्क जमिनीतून तोच जुना कंद बाहेर पडत होता दोन तीन दिवसात पुन्हा आहे तसे रुप त्या कंदाने धारण केले आणी आठ एक दिवसात त्याची मोठी मोठी हिरवी पाने पण तयार झाली ही वाढ इतकी वेगाने होत होती की पंधरा दिवसात कळीचे फुल होवून ..पुन्हा हिरव्या मोठ्या मोठ्या पानांच्या साथीने भुईकमळ ..बाहेर पडले सुध्धा आणी त्या सुंदर मोहक मंद वासात आसमंत ..डुंबून गेला ,❤️ आणी मग असेच दर वर्षी उन्हाळ्यात ठरल्या सारखेच या फुलांचे आगमन माझ्या कडे होत असते जणु काही उन्हाळी पाहुणाच ..हा पाहुणा मात्र याच्या रुपाने आणी वासाने आमच्या उन्हाळ्याची शीतलता वाढवत असतो ..खूप ऋणी आहे मी त्या निसर्गाची ..ज्याने माझ्या बागेत भरभरून सारे दिले आहे आणी ऋणी आहे मी माझ्या बागेची ..जिच्या मुळे आमच्या जीवनाला “अर्थ ..प्राप्त झाला आहे !!!