प्रत्येक भारतीय स्वयंपाक घरात मसाले नसतील तर स्वयंपाक अपूर्ण राहील असं म्हणायला हरकत नाही. मसाले भात असो वा बिर्याणी, चिंच गुळाची आमटी असो वा भरल्या वांग्याची भाजी अगदी तांबडा पांढरा रस्सा असला तरी प्रत्येक पदार्थ लज्जतदार बनवतात ते म्हणजे मसाले. स्वयंपाकांची चव वाढवणारे हे मसाले आरोग्यासाठीदेखील तितकेच महत्वाची भूमिका बजावतात. प्रत्येक मसाल्याचा स्वाद जसा निराळा आहे. तसेच त्याचे औषधी गुणधर्मदेखील पाहायला मिळतात. Hot Spices in Kitchen Helpful for Health🖤वेगवेगळ्या आरोग्यविषयक समस्यांसाठी Health Problems गरम मसाल्यांमधील जिन्नस उपयुक्त ठरू शकतात. या मसाल्यांमधील Spices जवळपास सर्वच मसाल्यांमध्ये आयुर्वेदिक Ayurved गुणधर्म पाहायला मिळतात. खरं तर तुमच्या अनेक आरोग्यविषयक समस्यांसाठी तुम्हाला औषध दुकानात जाण्याआधी घरातील मसाल्यांचा डबा उघडणं गरजेचं आहे. कारण हेच मसाले तुमच्या अनेक समस्या दूर करू शकतात. असे गुगल सांगते...🖤कोणताही मसाला घरी करण्यात वेगळी मजा असतेत्यात शुद्ध पदार्थ वापरता येतातत्याचा वास आणि स्वाद दोन्हीं अप्रतिम असते.त्यात घालायच्या वेगवेगळ्या पदार्थांचे वेग वेगळे खमंग वास..एकत्रित पणे त्यांचे मिसळण हे सारे अनुभव घेण्या सारखे असते वर्षाचा मसाला करून साठवून ठेवणे हे कौशल्याचे काम आजही अनेक घरात केले जाते🖤काळा मसाला हा स्वयंपाक घरातील हुकमी आणि आवश्यक खेळाडू...कित्येक घरात कांदा लसूण मसाला हा असा खेळाडू असतो.लहानपणा पासुन आपली आई आजी आणि लग्नानंतर सासू या बायकांना आपण मसाले करताना बघितलेले असतेत्यांची मेहेनत त्यासाठी लागणाऱ्या पदार्थांचे प्रमाण त्यातली "निगुती" हे सगळे आपण बघून बघून नकळत लक्षात ठेवलेले असते🖤मी सुध्दा लग्नापूर्वी आईला मसाला करताना मदत (तिच्या भाषेत मधेमधे लुडबुड) केलेली होतीलग्न झाल्यावर मात्र तिने सांगितले होतेएकदम मसाला करायला जाऊ नकोस.तुझा नविन संसार, नोकरी यात ही उस्तावार नको करुस थोडी संसारात रुळलीस मी शिकवेन तुला..मग मी काय... पडत्या फळाची आज्ञा म्हणून तिच्या आदेशाचा स्वीकार केला..😀🖤आई नोकरी करीत असून सुध्दा तिच्यासोबत मलाही एक दोन किलोचा मसाला करून देत असे..(मी तिच्या मदतीला मात्र जात असे )तेंव्हा मला आयता मसाला मिळाल्याने बरे वाटत असे. .🙂तशी ती मसाल्यात प्रत्येक गोष्ट अंदाजे वापरत असे.. पण तरीही ती सुगरण होती त्यामूळे मसाला उत्कृष्ट असे शिवाय इतक्या वर्षाच्या अनुभवाने तिला प्रत्येक पदार्थाचा उत्कृष्ट अंदाज होता 🖤आईचे असे मला मसाला पुरवणे कित्येक वर्षे चालू होतेमग भावाचे लग्न झालेतो परगावी असल्याने आणि वहिनी शिकावू असल्यानेआईची मसाल्याची जबाबदारी आणखी कीलो दीड किलो ने वाढलीआता मसाला केला की त्यातला तिसरा भाग भावाकडे जाऊ लागलाती आता तयार केलेल्या मसाल्याचे तीन वाटे करू लागली नक्की कीती किलोचा मसाला करायची हे नव्हते माहीत आम्हाला पण आम्हाला तो वर्षभर पुरत असे ..जर कधी आधीच संपला तर ती तिच्यातला परत थोडा आम्हाला देत असे🖤तिने केलेल्या मसाल्याचा वास स्वयंपाकघर ओलांडून अख्ख्या गल्लीत पोचत असेलगेच सगळीकडून चौकशी सुरु होई त्यामुळे शेजारी पाजारी थोडा थोडा नमुना द्यावाच लागे..🙂🙂🖤तो सुध्दा एक आनंदाचा भाग असायचानंतर सगळी तिची तारीफ करीतकिती चविष्ट मसाला आहे अशी "दाद "पण देत घरात तर तिच्या मसाल्याचा वास चार पाच दिवस तरी रेंगाळत राही...🖤मसाला केला की प्रथम ताज्या मसाल्याची आमटी, मसालेभात, मसालेदार भरली वांगी, तांदुळ मूग डाळ खिचडी असे पदार्थ आळीपाळीने केले जातत्याची चव अप्रतिम असे..😋. अगदी बोटे चाटत राहावी अशी😋🖤तयार केलेला मसालासाठवणीच्या काचेच्या मोठ्या बरणीत भरुन ठेवण्यापूर्वी ती तळाशी मीठ व हळद पावडर घालत असे.यामुळे मसाला टिकावू होत असेव बरणीला स्वच्छ फडके बांधून ठेवत असे म्हणजे त्याचा वास आणि स्वाद दोन्ही टिकत असे🖤मी सुध्दा हे दोन्ही करतेफक्त फडक्या ऐवजी बरणीच्या आतून पेपर नॅपकिन घालून घट्ट झाकणं लावते मसाल्याची बरणी सुध्दा वेगळ्या कपाटात ठेवलेली असते🖤रोजच्या वापराचा मसाला मसाला हिंग मोहरी हळद तिखट ठेवलेल्या पंचपाळ्यात काढला की परत झाकणं घट्ट लावुन मसाल्याची बरणी ठेवून द्यायची .अशी पूर्वापार प्रथा असे.🙂आई तुझा मसाला किती भारी होतो ग....असे म्हणले की ते श्रेय तिच्या सासूबाईंना देत असे..❤️काही वर्षांपूर्वी ध्यानी मनी नसताना आईचे अकस्मात निधन झाले 😥काही दिवसांनी माझ्या लक्षात आले की आता या वर्षी पासुन मसाला आपल्याला करायला लागेल...मग लग्नाच्या आधीच वडिलांनी भेट म्हणून दिलेले कमलाबाई ओगले यांचे "रुचिरा" पुस्तक मी बाहेर काढलेआणि त्यावर्षी त्या प्रमाणे प्रथमच मसाला केलाअतिशय उत्कृष्ट झाला...आईच्या हातची सर नसेल त्यालापण प्रयत्न यशस्वी झाला होतातशी दाद सुध्दा मिळाली सगळीकडून🙂🙂🖤नंतर मीच दर वर्षी दोन अडीच किलोचा मसाला करून किलोभर वहिनीला पाठवू लागले...कारण आई गेल्यावर तिला मसाला.. देणारी मीच होते🖤काही वर्षानी माझ्याही घरी सुनबाई चे आगमन झाल्याने आई प्रमाणेच माझ्याही मसाल्याचे तीन भाग होऊ लागले एक माझ्यासाठी ,एक भाग वहिनीला.. एक भाग सुनबाईला...आईची प्रथा मी पुढे चालू ठेवली 🖤हा केलेला मसाला "रुचिरा" पुस्तकात दिलाय असाच केलायफक्त बदल इतकाच की मी नेहेमी त्यात एक वाटीभर बडिशेप भाजुन घालतेहा एक मी दिलेला माझा टच म्हणा ना!त्यामुळें मसाल्याचा स्वाद आणखीन वाढतो..माझ्या मैत्रीणी पण माझ्या मसाल्याची तारीफ करीत असतातआईच्या हातचा मसाला खाल्लेले आप्त जेव्हा तुझ्या मसाल्याला आई सारखी चव आहे असे म्हणतात तेव्हां डोळ्यात पाणी येते..या मसाल्याचे श्रेय मी माझ्या आईला आणि कमलाबाई ओगले यांना देते 🙏🖤 नुकताच घरचा मसाला संपल्यामुळे हा छोट्या बरणी भर मसाला केला.फोटो काढे पर्यन्त निम्मा मैत्रीणीना नमुना म्हणून वाटण्यातच गेलाय 🙂🙂