अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग ४२ )
दुसऱ्या दिवशी सकाळी मॉम ना जाग येते. त्या मागे वळुन पाहतात तर अंजुचे डॅड बेडवर नव्हते. रूम चा डोअर ओपन करून त्या बाहेर लॉबी मधे पाहतात, ते तिथेही नसतात. मॉम ना थोडं टेन्शन येतं. त्या पुन्हा आत जाऊन अंजलीजवळ बसतात.
खरं तर डॅड हॉस्पीटलच्या बाहेर येऊन सिगरेट पित होते. या सर्व घडलेल्या गोष्टीमुळे त्यांनाही खुप टेन्शन आले होते. थोड्या वेळाने ते पुन्हा तिच्या रूम मधे येतात.
अंजली अजुनही झोपली होती. त्यांना पाहून मॉम बोलल्या....
मॉम : कुठे गेला होतात...?
डॅड : इथेच होतो खाली...!
मॉम : सांगुन तरी जायचं ना...?
डॅड : झोप लागलेली तुझी. म्हणुन नाही आवाज दिला.
* ते दोघे बोलत असतात तेवढ्यात एक नर्स तिथे अंजूच्या चेकअप साठी येते. तिचा बीपी चेक करताना अंजुला जाग येते. ती ऊठुन तशीच बेडवर बसते. तिचे चेकअप झाल्यावर डॅड त्या नर्सला विचारतात...
डॅड : सर्व काही ठिक आहे ना सिस्टर...?
नर्स : हो सर...! ठिक आहे सर्व...! आता काळजी करण्यासारखे काही नाही. आणि कदाचित डॉक्टर आज सोडतील तिला घरी. तरीही तुम्ही डॉक्टर राऊंड ला येतील तेव्हा त्यांच्याशी बोलुन घ्या.
डॅड : हो सिस्टर... थॅन्क्स...!🙂
* नर्स त्यांना वेलकम बोलुन बाहेर निघुन जाते.
मॉम त्यांना बोलतात...
मॉम : तुम्ही घरी जाऊन फ्रेश होऊन या तोपर्यंत...!
डॅड : हो... मी जाऊन येतो घरी, काही गरज वाटली तर कॉल कर, बाहेर फोन आहे तिथून.
मॉम : ठिक आहे...!
* डॅड तिथून घरी जायला निघतात.
मॉम अंजुला बेडवरून खाली उतरवून फ्रेश होण्यासाठी बाथरूम मधे घेऊन जातात. ती ब्रश वगैरे करून, फ्रेश होऊन पुन्हा बेडवर येऊन बसते.
थोड्या वेळात तिच्यासाठी चहा येतो. मॉम सोबत गप्पा मारत दोघी चहा पित असतात.
इकडे मेघा हॉस्पिटल मधे जायला निघत असते. तिने अंजूसाठी एका टिफीन मधे उपमा बनवून घेतलेला होता. किचन मधुन जशी ती बाहेर येते, तिचे वडील तिला थांबवतात. तेवढ्यात सिद पण तिथे आलेला असतो. त्याला आत बोलवून ते दोघांनाही बोलतात.
" आज अंजुची जी हालत झाली आहे त्याला तुम्ही दोघेही तितकेच जबाबदार आहात. एवढे दिवस आमच्यापासून हि गोष्ट लपवुन ठेवली, त्याचेच हे परिणाम आहेत. आणि इथुन पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा. पुन्हा जर तुम्ही त्या मुलाशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलात तर माझ्याशी गाठ आहे."
* त्यांचे बोलणे दोघेही मान खाली घालून गप्प ऐकुन घेत होते. त्यांना थांबवुन मधेच मेघा बोलते...
मेघा : पप्पा... हॉस्पीटल मधे चाललोय, अंजुला ब्रेकफास्ट घेऊन, थंड होईल तो, जाऊ का...?
मेघाचे वडील : ठिक आहे निघा आता पण मी सांगितलं आहे ते लक्षात असु द्या.
* त्यांच्या बोलण्यावर होकारार्थी मान हलवत मेघा सिद ला घेऊन पटकन बाहेर पडते. निघताना अंजुच्या घरची चावी सोबत घेते.
ते दोघेही त्याच्या बाईक वरून अंजुच्या घरी पोचतात. डोअर लॉक ओपन करून ते आत जातात. तिथून मॉम आणि अंजलीचा मोबाईल आणि चार्जर घेऊन ते बाहेर पडतात.
डोअर लॉक करून ते खाली उतरत असतात तेवढ्यात समोरून अंजूचे डॅड वरती येताना त्यांना दिसतात. ते त्या दोघांकडे जरा रागातच पहात असतात.
' आता पुन्हा एकदा लेक्चर ऐकावे लागणार की काय असं त्यांना वाटत असतं ' तेवढ्यात मेघा त्यांना बोलते.
मेघा : हॉस्पीटल मधे चाललोय, अंजु साठी ब्रेकफास्ट घेऊन. आणि मॉम नी मोबाईल घेऊन यायला सांगितलं होतं, तो घ्यायला आलो होतो. उशीर होतोय आम्ही निघतो.
* एवढं बोलुन ते दोघे पटकन त्यांना क्रॉस करून जिन्यावरून खाली उतरतात. तिचे डॅड त्यांना काहीच बोलले नव्हते. पण खाली आल्यावर मेघाच्या जीवात जीव येतो. ती सिद ला बोलते.
मेघा : आज तरी वाचलो बाबा...! नाहीतर पुन्हा यांच्याकडून ऐकुन घ्यावं लागलं असतं. चल निघु पटकन.
* तिथून ते दोघे हॉस्पीटल मधे पोचतात. तिच्या रूम मधे येताच मेघा हातातील बॅग मॉम कडे देत अंजुजवळ जाऊन तिला घट्ट मिठी मारून बोलते.
मेघा : कशी आहेस... मेरी जान...? 😊
अंजु : आता ठिक आहे...! 😊
* त्या दोघी बोलत असतात. मॉम त्या बॅगेतून दोघींचे मोबाईल आणि टिफीन काढून टेबलवर ठेवतात. आणि मेघाला बोलतात.
मॉम : बरं झालं तु मोबाईल घेऊन आलीस. आणि टिफीन मधे काय आणलंय...?
मेघा : उपमा...! मॅडम ना आवडतो ना माझ्या मम्मीने बनवलेला. म्हणुन तिने पाठवलाय...😊
* अंजु तिचा मोबाईल पाहून ती मॉम कडे मोबाईल मागते. पण मेघा मॉम ना देऊ नका बोलते आणि तिथून उठून तो टेबलवरील टिफीन बॉक्स ओपन करते. त्यातील थोडा उपमा एका डिश मधे काढून ती मॉम ना देते. आणि तो टिफीन घेऊन तिच्याजवळ येते. आणि तिला बोलते.
मेघा : आधी हा ब्रेकफास्ट संपव, मग मोबाईल मिळेल. 😊
अंजली : अगं... खाते मी, पण थोडा वेळ बघु दे तरी कोणाचे कॉल मॅसेज येऊन गेले असतील.
मेघा : ते नंतर बघ, आधी हे खा...!😊
* असं बोलुन ती तिला चमच्याने एक घास भरवते. अंजु पण त्याच चमच्याने एक घास घेऊन मेघाला भरवते. सिद बाजुला उभा असतो. ती त्याला पण जवळ बोलावते आणि त्यातील एक घास त्यालाही भरवते. मॉम त्या तिघांकडे पहात मनोमन विचार करतात. ' यांच्या मैत्रीला कोणाची नजर नको लागायला. हि मैत्री अशीच कायम राहू दे.'
ते तिघेही एकत्र मिळुन तो टिफीन संपवतात. ते खाऊन झाल्यावर मेघा तिला तिचा मोबाईल देते.
मोबाईल हातात आल्यावर ती थोडी खुश होते आणि सर्वात आधी कॉल लिस्ट चेक करते. पण तिथे तिला हवा असलेला कॉल आला नव्हता. म्हणुन ती मॅसेज बॉक्स ओपन करून बघते. तिथेही तिला अपेक्षित असणारा कोणताही मॅसेज आलेला नव्हता. ते पाहुन तिचा चेहरा पडतो. ती लगेच प्रेमला कॉल लावते. पण त्याचा कॉल लागत नव्हता. पुन्हा पुन्हा ती त्याला कॉल करण्याचा प्रयत्न करत होती पण त्याला काही कॉल लागत नव्हता. त्यामुळे ती थोडी अस्वस्थ होते. तिला पाहून मेघा बोलते.
मेघा : प्रेमला कॉल करतेय ना...? नाही लागणार त्याचा कॉल, गावी आहे ना तो, तिकडे रेंज वगैरे नसेल त्याच्या मोबाईल ला.
अंजली : असं कसं कॉल लागत नाही, तु तुझ्या मोबाईल वरून कॉल कर बघु.
मेघा : अरे...! मी खुपदा ट्राय केला, पण आउट ऑफ कव्हरेज येतोय.
अंजली : आत्ता करून बघ ना एकदा...!
मेघा : बरं बघते...!
* असं बोलुन मेघा तिच्या समोरच प्रेमला कॉल करते, पण कॉल लागत नव्हता.
त्याचा कॉल लागत नाही हे पाहून अंजलीला थोडे टेन्शन येते. तिच्या मनात पुन्हा वेगवेगळे विचार यायला लागले होते.
काय झालं असेल नक्की...?
त्याने मोबाईल बंद करून ठेवला असेल का...?
हे सर्व जे झालं आहे ते त्याला कळले असेल का...?
या सर्व विचारांनी ती अस्वस्थ होऊन जाते, तिला असं पाहून मेघा बोलते.
मेघा : अगं...! टेन्शन नको घेऊ, आपण थोड्या वेळाने पुन्हा ट्राय करू त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा.
अंजली : त्याला हे सर्व कळलं असेल का...? म्हणुन तर त्याने मोबाईल बंद करून ठेवला नसेल ना...?
मेघा : अरे...! त्याला कसं कळेल, तो तर गावी निघुन गेला ना... मग.
अंजली : ते मला माहित नाही पण, मला त्याच्याशी बोलल्याशिवाय चैन पडणार नाही. प्लीज काही तरी करा. सिद तु तरी काही कर....मला बोलायचं आहे त्याच्याशी....😔🙏🏻
* तिची ही अवस्था पाहून मॉम थोड्या रागातच बोलू लागल्या...
मॉम : बस् झालं आता....! तुला कळत नाही का, त्याचा मोबाईल लागत नाही ते. काय वेडेपणा आहे हा...? आधी नीट बरी हो, नंतर बघू हे सर्व...!
अंजली : मॉम...! असं का बोलतेय तु...?
मॉम : मग कसं बोलू...? काय चाललंय तुझं...? परिस्थिती काय आहे...? थोडा धीर घे, आणि झालं तेवढं पुरे झालं. आता जरा थोडे दिवस तरी हा विषय बंद करा.
अंजली : मॉम तुला सर्व माहित असुन सुद्धा तु अशी बोलतेय. मी नाही राहु शकत त्याच्याशिवाय...😔
मॉम : अंजु...! 😠
अंजली : मला तर आता असं वाटतंय की, तुम्ही सर्वजण मिळुन माझ्यापासून काहीतरी लपवत आहात. नक्की काय झालंय प्रेम सोबत... तो असा अचानक गावी का गेला...? खरं काय ते सांगाल का मला कोणीतरी... प्लीज...😔🙏🏻
* तिला असं रडताना पाहून मेघा तिच्या जवळ जाऊन तिला मिठी मारत बोलते...
मेघा : हे बघ... मॉम बोलतायत तेही बरोबर आहे. सध्या वातावरण थोडं क्रिटिकल आहे. आणि आत्ता फक्त एकच प्लस पॉईंट आहे की, प्रेम जिथे कुठे आहे तिथे तो सेफ आहे. त्यामुळे तु उगाच त्रास करून घेऊ नको. कधी ना कधी तो परत येईलच. तोपर्यंत तु जरा स्वतःला आवर आणि शांत रहा.
अंजली : पण तो कसा आहे, कुठे आहे, नक्की गावीच आहे का, हे कसं समजून घ्यायचं...? कॉल पण लागत नाही त्याचा...काय करू मी...?
मेघा : अंजु...! प्लिज... थोडी रिलॅक्स हो, सर्व काही ठिक होईल. थोडे दिवस जाऊ देत, मग बघु आपण.
अंजली : काय बघणार आहोत आपण तेव्हा...! आणि तो परत येईल कशावरून...? किती दिवस वाट बघत बसू मी...?😥
मेघा : हे बघ आत्ता तरी तु लवकर बरी होऊन घरी जाणं महत्वाचं आहे. हो की नाही...?
अंजली : मी बरीच आहे...! मला काय होणार आहे...? पण मी प्रेम सोबत नक्की काय झालंय ते जाणून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही.
मॉम : म्हणजे काय करणार आहेस तु...?
अंजली : मी डॅड ना विचारेन, काय केलंय त्यांनी त्याच्यासोबत, असाच तो मला न सांगता गावी जाणार नाही. काहीतरी घडलंय हे नक्की.
मॉम : म्हणजे आम्ही सर्वजण सांगतोय ते तुला ऐकायचं नाही तर...! तुला जे हवं ते कर मग... आणि त्याचे परिणाम काय होतील याचा पण थोडा विचार कर.
मेघा : मॉम बरोबर बोलतेय, तु प्लिज ऐक ना आमचं. आत्ता तरी काही गोंधळ घालू नको, जेणेकरून परिस्थिती अजुन बिघडेल. प्लिज शांत रहा. कोणाला काही बोलू नकोस. तुला काय वाटतं की आम्हाला तुझी काळजी नाही का...? तसं असेल तर मग मॉम बोलतायत तसं कर तुला हवं ते मग...!
* थोडा वेळ सर्व शांत असतात....
अंजली : ठिक आहे...! तुम्हाला वाटतंय ना माझ्या शांत राहण्याने सर्व काही नॉर्मल होईल. तर ठिक आहे. मी नाही बोलणार काही...! कोणालाच.😔
* असं बोलुन ती पुन्हा रडू लागली होती. ते पाहून मेघा तिला जवळ घेऊन तिला शांत करण्याचा प्रयत्न करते.
मेघा : रिलॅक्स...! आम्ही सर्व आहोत तुझ्यासोबत.
* अंजली मेघाला बिलगुन रडत होती. थोड्या वेळाने ती थोडी शांत झाली. आणि रूम मधील वातावरण पण एकदम शांत झाले होते.
काही वेळाने तिचे डॅड तिथे पोचतात. अंजलिकडे पाहून ते बोलतात....
डॅड : कशी आहेस बेटा...?
अंजली : ठिक आहे....!😔
डॅड : डॉक्टर वगैरे आलेले का चेकअप साठी...?
मॉम : नाही आले अजुन तरी...!
डॅड : ओके...! मी बघतो बाहेर सिस्टर ना विचारून.
*असं बोलुन ते बाहेर निघुन जातात. आणि थोड्या वेळात डॉक्टर सोबत ते रूम मधे येतात.
डॉक्टर अंजलीचे चेकअप करतात. "सर्व काही नॉर्मल आहे." असे बोलुन डॉक्टर बाहेर निघुन जात असतात. जाताना ते डॅड ना सोबत यायला सांगतात.
डॉक्टर त्यांना त्यांच्या केबिन मधे घेऊन जातात आणि त्यांच्याशी बोलतात...
डॉक्टर : हे बघा साहेब, मी तिला आज संध्याकाळी डिस्चार्ज देतोय. पण तिला घरी घेऊन गेल्यावर तुम्ही काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी ते म्हणजे,
काही दिवस तिला त्रास होईल असे काही तिला बोलू किंवा वागु नका, जेणेकरून ती पुन्हा असं काहीतरी करेल. कारण अशा केसेस मधे मुलं पालकांचं काही ऐकत नाहीत. त्यामुळे पालकांनी थोडे पेशन्स ठेवायला हवेत. आणखी एक गोष्ट आहे, तुम्ही तिला मेडिटेशन साठी तिला आवडणाऱ्या एखाद्या ठिकाणी घेऊन जा, किंवा एखाद्या काऊंसलरकडे घेऊन जाऊ शकता. आणि जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर चर्च मधे जाऊन फादर सोबत हा विषय बोला. त्यांना तिच्याशी बोलू द्या. जर तिची ईच्छा असेल तर.
डॅड : हो डॉक्टर, तुम्ही बोलत आहात तसे मी तिच्यासाठी सर्व काही प्रयत्न करेन. मला पण तिला असं पाहवत नाही. आणि खरच थँकयू वेरी मच, तुम्ही एवढं सर्व बोललात त्याबद्दल...🙏🏻
डॉक्टर : अहो मी पण एका मुलीचा बाप आहे, मी समजु शकतो, अशा परिस्थितीत काय होतं ते...! एक काळजी घ्या, घरी गेल्यावर तुम्ही तिला जास्त वेळ एकटी सोडु नका. काही दिवस तिच्यासोबत कोणीतरी रहा. होईल रिकवर ती लवकरच. गुड लक.👍🏻
डॅड : थॅन्क्स डॉक्टर... 🙏🏻
* डॉक्टरांशी बोलुन ते त्यांच्या केबिन मधुन बाहेर पडतात आणि अंजुच्या रूम मधे येतात. ते आत येताच सर्वजण शांत होतात. त्यांना पाहून मॉम बोलतात...
मॉम : काय बोलले डॉक्टर...?
डॅड : जास्त काही नाही...! संध्याकाळी सोडतील बोलले.
मॉम : बरं झालं...!
डॅड : मी जरा ऑफिसला जाऊन येतो थोडं काम आहे अर्जंट, तिचा लंच झाल्यावर तुम्ही पण खाली जाऊन कॅन्टीन मधे काहीतरी खाऊन या.
मॉम : ठिक आहे, तुम्ही पण खाऊन घ्या काहीतरी तिकडे.
डॅड : हो....!
* असं बोलुन ते जाताना अंजुजवळ जाऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला ' टेक केअर' बोलुन ते बाहेर निघुन जातात.
मेघा अंजूला थोडे जोक्स वगैरे करून हसवण्याचा प्रयत्न करत असते. अंजु पण तिच्या जोक वर इच्छा नसतानाही हसत होती.
गप्पा चालु असतात तेवढ्यात अंजुसाठी लंच येतो. मॉम तिला स्वतःच्या हातांनी भरवत असतात. बोलत बोलत ती थोडंसं खाऊन झाल्यावर मॉम ना बोलते.
अंजली : मला बस् झालं आता, तुम्ही सर्वजण खाली जाऊन खाऊन या काहीतरी.
मॉम : मला भुक नाही, मेघा तु आणि सिद जाऊन लंच करून या. मी थांबते हिच्याजवळ.
अंजली : तुझा काय उपवास आहे का...? जा तु पण त्यांच्यासोबत.
मेघा : हो मॉम... तुम्ही पण काही खाल्ले नाही सकाळपासून.
मॉम : अगं... उपमा कोणी खाल्ला मग...?
मेघा : तो एवढासा उपमा जिरला पण असेल आत्ता पर्यंत, चला तुम्ही... नाहीतर आम्ही पण नाही जाणार.
मॉम : अरे...! असं काय करताय, इथे कोणी नको का...?
अंजली : काही गरज नाही इथे थांबण्याची, मी एकदम बरी आहे आता. तु जा बघु त्यांच्यासोबत.
मॉम : बरं बाई जाते...! मी आल्यावर गोळ्या देते, तोपर्यंत आराम कर, जास्त वेळ मोबाईल बघत बसू नको.
अंजली : हो... हो...! आता जाशील का...?
* मॉम त्या दोघांसोबत खाली कॅन्टीन मधे येतात. मेघा दोघांना विचारून खायला ऑर्डर करते.
रूम मधे अंजली एकटीच असते. सर्वत्र शांतता पसरलेली होती. हळु हळु ती पुन्हा प्रेमच्या विचारांमध्ये हरवुन जाते...
कुठे असेल तो...? कसा असेल तो...? काय करत असेल...? माझी आठवण येत असेल का त्याला...? तो परत येईल की नाही....? मोबाईल का बंद करून ठेवला असेल त्याने...? तिच्या डोक्यात अशा अनेक प्रश्नांची गर्दी व्हायला लागली होती, त्यामुळे ती अस्वस्थ होत होती. नकळत डोळ्यातुन पाणी येत होते. आणि त्या विचारांनी तिचे डोके दुखायला लागले होते. त्या अवस्थेत ती पुन्हा पुन्हा प्रेमला कॉल लावण्याचा प्रयत्न करत होती. पण त्याचा कॉल काही लागत नव्हता. अशात काय करावे हे तिला समजत नव्हते.
त्याआधी सर्वांनी तिची समजुत काढली होती. थोडंसं आपण पण त्यांचं ऐकायला हवं. आधीच माझ्याकडून घडलेल्या या सर्व प्रकारामुळे सर्वांनाच खुप त्रास झाला आहे. मला त्यांना अजुन त्रास होऊ द्यायचा नाही. मला यातुन सावरलच पाहिजे. असं मनाशीच बोलुन ती आपले डोळे पुसते. आणि गॉड ला प्रे करते. ' प्रेम जिथे कुठे असेल तिथे त्याला सुखरूप ठेव आणि लवकरात लवकर आमची भेट होऊ दे.'
थोड्या वेळाने मेघा, सिद आणि मॉम तिच्या रूम मधे येतात. सर्वजण थोडा वेळ गप्पा मारत बसलेले असतात. मधेच तिच्या चेकअप साठी नर्स येऊन जाते. इच्छा नसतानाही ती त्यांच्या बोलण्यात सामील होत होती. मेघाच्या जोक वरती मधे मधे थोडंसं हसत होती.
संध्याकाळचे पाच वाजले होते. तिच्या डिस्चार्ज ची प्रोसेस चालु झाली होती. तेवढ्यात तिचे डॅड पण आले होते. त्यांनी हॉस्पीटल चे बिल पेड केले व सर्व प्रोसेस पुर्ण झाल्यावर आवरून ते सर्वजण खाली आले.
तिचे डॅड पार्किंग मधुन गाडी घेऊन गेट वर आले. त्यांनी अंजुला पुढे बसायला सांगितले. मॉम आणि मेघा मागे बसल्या. सिद त्याची बाईक घेऊन त्यांच्या सोबतच हॉस्पीटल मधुन तिच्या घरी आला.
घरी पोचल्यावर मेघा आणि सिद थोडा वेळ थांबुन त्यांच्या घरी निघुन गेले. थोड्या वेळाने मेघा तिच्या छोट्या बहिणीला त्यांच्याकडे सोडुन गेली. जाताना पुन्हा एकदा ती अंजुच्या रूम मधे जाऊन तिला मिठी मारत बोलली...
मेघा : आय लव यू मेरी जान... टेक केअर.
* अंजली काहीच बोलली नाही. फक्त तिला होकार देत तिला बाय केले.
मॉम फ्रेश होऊन स्वयंपाक करण्यात व्यस्त झाल्या होत्या. थोडा वेळ ती तिच्या रूम मधे एकटीच होती. काही वेळाने डॅड तिच्या रूम मधे येऊन तिला बोलतात...
डॅड : आता बरं वाटतंय ना, घरी आल्यावर...!🙂
अंजली : हो...!😊
डॅड : मग आता लवकर बरी हो...! कॉलेज ला पण जायचं आहे ना...!
अंजली : होय...!
* डॅड ना विचारण्यासाठी तिच्या मनात खुप प्रश्न होते पण ती स्वतःला कंट्रोल करून शांतच राहते.
डॅड थोडा वेळ तिच्याशी बोलुन तिच्या रूम मधुन बाहेर येतात. मग ती तिच्या छोट्या बहिणीसोबत थोडा वेळ घालवते.
रात्रीचे जेवण झाल्यावर मॉम आज तिच्या सोबत तिच्या रूम मधेच झोपतात. रात्री खुप वेळा ऊठुन त्या अंजलीला पहात असतात. तिला दिलेल्या गोळ्यांमुळे तिला सकाळपर्यंत चांगली झोप लागली होती. सकाळी सात वाजता ती झोपेतुन जागी झाली. थोडा वेळ तशीच बेडवर पडून होती.
काही वेळाने मॉम नी आवाज दिल्यावर ती बाहेर आली. डॅड ऑफिस ला जायला निघत होते. त्यांना बाय करून ती ब्रश करून अंघोळीला जाते.
मॉम नी आज ब्रेकफास्ट मधे तिच्यासाठी ब्रेड आम्लेट बनवले होते. ती आपल्या छोट्या बहिणीसोबत ती खात बसली होती. तेवढ्यात डोअर बेल वाजली. तिने ऊठुन डोअर ओपन केला. बाहेर मेघा उभी होती. अंजलीला पाहून ती बोलली....
मेघा : गुड मॉर्निंग डिअर...! हाऊ आर यू...?😊
अंजली : आय एम फाइन...! 🙂
मेघा : आत तरी येऊ देशील...?
* असं बोलुन ती तिला घेऊनच आत येते. ती कोच वर बसताच मॉम तिच्यासाठी ब्रेड आम्लेट ची डिश घेऊन येक्तत आणि तिला देत बोलतात.
मॉम : अगदी वेळेवर आलीस बघ...!
मेघा : अरे व्वा...! तशी मी घरून ब्रेकफास्ट करून आलीय, पण तुम्ही एवढ्या प्रेमाने बनवलं आहे मग नको कसं बोलू....! खातेच मग....😋
अंजली : तुझ्यासाठी हे नॉर्मल आहे....!😊
मेघा : हा...! ते तर आहेच...! आम्ही डाएट वगैरे काही करत नाही. 😊
मॉम : अरे मग अजुन एक आणू का...?😊
मेघा : नको...! सध्या एवढं पुरेसं आहे...! नाहीतर दुपारी जेवण जाणार नाही मग....! मम्मीचे ऐकुन घ्यावं लागेल मग...!😋
मॉम : अगं खा तु पोटभर....! मी सांगेन तिला हवं तर...!
मेघा : नको नको...! मी मॅनेज करेन ते...!😋
मॉम : बरं ठिक आहे...! तुम्ही खाऊन घ्या मी आहेच किचन मधे, आणि हवं असेल तर अजुन घ्या...!
मेघा : हो मॉम...!👍🏻
* ब्रेकफास्ट झाल्यानंतर दोघी तिच्या रूम मधे जाऊन गप्पा मारत बसतात. साहजिकच विषय प्रेमचाच होता. त्यामधे मेघा तिची कशीबशी समजूत घालून ती काही वेळाने घरी निघुन जाते.
काही दिवस असेच निघुन जातात. त्या दरम्यान तिचे डॅड तिला एका काऊंसलर कडे घेऊन जातात. त्यांच्याकडे तिची ट्रिटमेंट चालू करतात. काही दिवस ती त्यांच्याकडे जाऊन ट्रिटमेंट घेऊ लागली होती. मधे मधे चर्च ला जाऊन फादर सोबत पण या विषयावर बोलत होती.
हळु हळु ती मेंटली या गोष्टींवर ठाम होते की, काही झाले तरी असे पाऊल पुन्हा कधी उचलणार नाही, जेणेकरून मॉम डॅड ना त्रास होईल.
अंजली आता कॉलेजला जाऊ लागली होती. घरी आल्यावर ती एकटीच तिच्या रूम मधे जाऊन बसत होती. कोणाशी जास्त बोलत नव्हती. मेघा, सिद यांना पण ती कधी स्वताहून कॉल करत नव्हती. त्यांचा कॉल आला तरी, आधीसारखी ती त्यांच्याशी बोलत नव्हती. जास्त करून ती आता एकटीच राहू लागली होती. त्यामधे तिने खाण्यापिण्याकडे पण दुर्लक्ष केले होते. आणि हळू हळू त्याचा परिणाम तिच्या तब्येतीवर होऊ लागला होता.
काही दिवसांतच तिची तब्येत पूर्ण खालावली होती. या सर्व गोष्टीचे टेन्शन मॉम ना येत होते. एक दिवस मॉम अंजलीच्या डॅड सोबत या विषयावर बोलतात.
ते दोघे तिला पुन्हा एका मोठ्या डॉक्टरकडे घेऊन जातात. तिथे तिच्या काही टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्या रिपोर्ट नुसार ते डॉक्टर तिच्या डॅडना एक सल्ला देतात. त्यामधे ते सांगतात. " अंजलीला झालेला आजार हा मानसिक आजार आहे. आपण त्यावर तिला कोणत्याही गोळ्या किंवा औषध देऊन बरा करू शकत नाही. या परिस्थिती मधे तिला जे हवं ते देण्याचा प्रयत्न करा, तिला आवडणाऱ्या गोष्टी करा, जेणेकरून ती आनंदी राहील. ती अशीच जर एकटी टेन्शन मधे राहू लागली तर पुढे गोष्टी खुप अवघड होतील. त्यामुळे तिची काळजी घ्या."
त्यांच्या या सल्ल्याने मॉम डॅड दोघेही टेन्शन मधे येतात. त्यानंतर दोघेही ठरवून तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. तिच्यासोबत वेळ घालवतात. खास तिच्यासाठी एक पिकनिक प्लॅन करतात. काही दिवस तिला मनालीला फिरायला घेऊन जातात.
पण त्यांच्या या प्रयत्नांना हवे तसे यश मिळत नव्हते. तिची तब्येत अजुनच खालावत चालली होती. ते पुन्हा तिला डॉक्टरांकडे घेऊन जातात. डॉक्टर यावेळी पण तोच सल्ला देतात. त्यासोबत एक गोष्ट सांगतात. " तुमची मुलगी ज्या गोष्टीसाठी झुरत आहे, एकतर ती गोष्ट तिला मिळाली पाहिजे, किंवा तिला या गोष्टीची खात्री पटली पाहिजे की, ती गोष्ट तिला मिळणे अशक्य आहे. बस् एवढच....! दुसरा कोणता मार्ग नाही तिला यातुन बाहेर काढण्याचा. बाकी तुम्ही विचार करा याबद्दल आणि निर्णय घ्या. एवढच मी सांगु शकतो."
डॉक्टरांच्या या अशा बोलण्याने डॅड थोडे टेन्शन मधे येतात. काही दिवस विचार करून ते प्रेमला भेटण्याचा निर्णय घेतात. त्याच्याबद्दल चौकशी केल्यानंतर त्यांना समजतं की, प्रेम गावावरून परत आला आहे. आणि एका ठिकाणी जॉब करत आहे.
त्यांना मिळालेल्या माहितीवरून एक दिवस ते त्याला भेटण्यासाठी गाडी घेऊन त्याच्या कंपनी जवळ जातात. कंपनीच्या बाहेरच ते त्याची वाट पहात थांबलेले होते. संध्याकाळचे सहा वाजले होते.
प्रेम त्या कंपनीमधून घरी जाण्यासाठी बाहेर पडतो, आणि रस्त्याच्या एका बाजूने चालत निघतो.
गाडीमधे बसलेल्या अंजलीच्या डॅड ची त्याच्यावर नजर पडते. तो थोडा जवळ आल्यावर त्यांची खात्री पटते की तो प्रेमच आहे.
तो जसा त्यांच्या गाडीजवळ येतो तसे ते गाडीमधून उतरून बाहेर येतात आणि त्याच्या समोर उभे राहतात.
असं अचानक समोर आलेल्या अंजलीच्या डॅड ना पाहून तो दचकतो. तो मनात खुप घाबरलेला असतो.
काही क्षणातच त्याच्या डोक्यात नको ते प्रश्न येऊ लागतात. त्याची उत्तरं शोधण्याअगोदरच डॅड त्याला बोलतात.
डॅड : घाबरू नको...! मी फक्त तुला भेटायला आलोय, मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे.
* तो तरीही घाबरूनच त्यांना बोलतो...
प्रेम : साहेब...! काही चुकले आहे माझे, तुम्ही बोललात तसच मी केलं. त्या दिवसापासून मी कोणालाही कॉल सुद्धा केलेला नाही. आणि कोणालाच हे माहित नाही की, मी इकडे आलो आहे.
डॅड : हो...! ते मला माहित आहे. पण मला एका दुसऱ्या विषयावर तुझ्याशी बोलायचं आहे.
प्रेम : कोणता विषय...? अजुन काही झालं आहे का...?
डॅड : हे सर्व आपण इथे नाही बोलू शकत, तु गाडीत बस, आपण दुसरीकडे कुठे तरी जाऊन बोलू.
* त्यांच्या अशा बोलण्याने प्रेम थोडा टेन्शन मधे येतो. 'गाडीत बसवून हे मला कुठे घेऊन जाणार आहेत ? आणि आज त्यांच्यासोबत मेघाचे वडील पण नाहीत.!' काय होणार आहे देव जाणे. असा विचार करून तो त्यांना होकार देऊन गाडीत बसण्यासाठी मागचा दरवाजा ओपन करतो. पण डॅड त्याला पुढे बसण्यासाठी बोलतात. म्हणुन तो पुढे त्यांच्या बाजूच्या सीटवर बसतो.
गाडी तिथून निघते... वाटेत खुप वेळ दोघेही शांतच असतात. प्रेमचे टेन्शन वाढत चालले होते. म्हणुन अखेरीस प्रेम त्यांना बोलतो...
प्रेम : साहेब... काय झालं आहे ते तरी सांगाल का...?
डॅड : तु जास्त टेन्शन घेऊ नको, बोलू आपण तिथे पोचल्यावर....
* त्यांच्या अशा बोलण्याने प्रेम शांत होतो. तो मनामध्ये एकच विचार करत असतो...
' नक्की काय झालं असेल...?
त्यांची गाडी त्याच्या कंपनीच्या रोड वरून बाहेर पडुन शहराच्या मेन रोड वरून भरघाव वेगाने पुढे चालली होती...
क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️