Calling the Goddess in Marathi Spiritual Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | देवीचे बोलावणे

Featured Books
Categories
Share

देवीचे बोलावणे

देवाला जावे निवांत दर्शन घ्यावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते पण आजकाल गर्दीमुळे देवदर्शन निवांत होईलच याची खात्री नसते मला मात्र देवदर्शन घ्यायची इच्छा होते तेव्हा कशी कोण जाणे देवळात गर्दी कमी असते आणि देवाचा आणि माझा आमने सामने सुसंवाद सुद्धा होतो असा अनुभव नेहेमीच येतो तसेच बाहेर गावी देवदर्शनाला जायचे असेल तर तशा प्रवासाचा योग जुळून यायला लागतो मगच तुमचे दर्शन घडते दर्शनासाठी देव आपल्याला बोलावून घेतो अशीही श्रद्धा असते असा अनुभव मलाही आला देवी त्रिपुरसुंदरीच्या बाबतीत.. पुतण्याचे लग्न राजस्थानी मुलीशी त्यांच्या पद्धतीने व्हायचे होते कारण मुलीचे घर बांसवाडा राजस्थान इथे होते तिथेच साखरपुडा व लग्न कार्यक्रम व्हायचा होता खरेतर एका वेगळ्याच दुसऱ्या महत्त्वाच्या कामामुळे तिथे जाणे जमणार नव्हते त्यामुळे घरच्या लोकांसोबत जाण्यासाठी झालेले बुकिंग आधी रद्द केले होते...जाऊदे या लग्नाला जायचा योग नाही असे म्हणून सोडून दिले होते काही दिवसांनी समजले की ज्या कामासाठी आम्ही बुकिंग रद्द केले होते ते काम लांबले होते मग परत बघितले घरच्या लोकांच्या सोबत नाही पण निदान आमचे आम्हाला तरी जायला मिळते का आणि खरेच मुंबईतून वेगळ्या रेल्वे चे बुकिंग आम्हला मिळाले आणि राजस्थानला लग्नाला जायचे आमचे पक्के झाले आमचे बुकिंग झाल्यावर प्रथम तिथे जवळपास पाहण्यासारखे काय आहे याची गुगल वरून माहिती काढली तेव्हा या त्रिपुरसुंदरी देवीच्या देवळा विषयी समजले हे देऊळ एक शक्तिपीठ मानले जाते मनात आले..लग्नाच्या निमित्याने खरेच देवीने मला भेटायला बोलावणे पाठवले होते लगेचच देवीसाठी एक छान बनारसी साडी घेऊन ठेवली रतलाम जवळ असलेले बांसवाडा तसे मोठे गाव आहे इथे रेल्वे स्टेशन नाहीपण हेलिपॅड आहे कारण वसुंधरा राजे निवडणुकी पूर्वी येथे येऊन नवस बोलल्या होत्या त्यांचा नवस पूर्ण झाला तेव्हा त्या परत येथे येऊन गेल्या स्वतः मोदीजी सुद्धा इथे येऊन गेले दर्शन घेऊन गेले आहेत अशी या देवीची महती आहे  कार्यालयातील  साखरपुडा,  मेहंदी, हळदी , बारात, लग्न सागळे विधी दोन दिवस झकास पार पडले आता परतीची वेळआली ..त्रिपुरसुंदरीचे दर्शन घ्यायचे होते आमच्या घरच्या सगळ्यांची रेल्वे उशिरा होती त्यामुळे ते सर्व जेवणानंतर दर्शनाला जाणार होते आमची रेल्वे लवकर असल्याने आम्ही नाश्ता करुन निघणार होतो तत्पूर्वी आम्ही दर्शनाला निघालो  मुलीच्या मामासोबत आम्ही कारमधुन निघालो अर्धा तास प्रवास होता अत्यंत सुंदर आणि प्रशस्त अशा त्या मंदिरात गेल्यावर प्रसन्न वाटले त्या दिवशी रविवार होता पण आश्चर्य म्हणजे देवळात अजिबात गर्दी नव्हती गेल्या गेल्या वॉचमनने सलाम ठोकला आत जाताच प्रथम नोंद वही मध्ये देवी साठी काय देणार आहात याची नोंद करायची होती मी बनारसी साडी लिहिले लगेचच पावती पण मिळाली साडी देवीला नेसवायचा मुहूर्त दोन महिन्या नंतर होता कारण लोकांनी आधीच साड्या भेट देऊन बुकिंग करून ठेवले होते बोलता बोलता आम्ही कोल्हापूरहून आलो असे समजल्यावर यादी नोंद करणाऱ्या पुजाऱ्याची कोल्हापूरच्या अंबाबाईवर श्रद्धा होती त्याने लगेचच आम्हाला  तुमच्या मोबाईल मध्ये अंबाबाईचे फोटो आहेत का असे विचारले अंबाबाईचे भक्त व कोल्हापूर निवासी असल्याने देवीचे अनेक प्रकारचे फोटो अहो च्या मोबाईल मध्ये असतातच त्यांनी लगेच त्यातले फोटो त्यांच्या मोबाईलवर मागून घेतले अहो नी सुद्धा आनंदाने पाठवले अतिशय खुश होऊन ते आम्हाला आत देवळात घेऊन गेले आतील पुजाऱ्याना त्यांनी आमची ओळख करून दिल्यावर मी साडी चोळी व सोबत आणलेला नारळ हार अर्पण केला दक्षिणा ठेवली ओटी साग्रसंगीत भरून झाल्यावर त्यांनी मला मी अर्पण केलेला व त्यांनी फोडलेला अर्धा नारळ ,साखरफुटाणे प्रसाद दिला सोबत आणखी एक प्रसादाचा बॉक्स पण होता शिवाय एक पुर्ण नारळ सुद्धा दिला नंतर ते स्वतः आतुन बाहेर आले त्यांनी दोन केशरी धागे मंत्र म्हणुन आम्हा उभयतांच्या हातात बांधलेलाल रंगाची शुभ अशी एक राजस्थानी चुनरी आमच्या दोघांच्या डोक्यावर एकत्रित ओढली व पुन्हा देवीची प्रार्थना केली आम्ही भारावलो व देवीसमोर दहा मिनिटे शांत बसुन राहिलो परत जाताना त्यांनी आम्हाला व मुलीच्या मामांना देवीचा मोठा फोटो सुद्धा दिला या अशा देवीच्या दर्शना मुळे आम्ही  खुपच आनंदी झालो जेंव्हा कार्यालयात परत पोचलो तेव्हा मुलीच्या मामांनी घडलेला सारा प्रसंग सर्व नातेवाईकांना सांगितला त्या सगळ्यांना फारच नवल वाटले त्यांच्या म्हणण्या प्रमाणे इतकी वर्ष आम्ही ईथे राहतो आहे पण असे साग्रसंगीत दर्शन आम्हाला कधीच घडले नाही देवीचा फोटो सुद्धा इतक्या वेळा दर्शनाला गेलो तरी नाही मिळाला रविवारी तर एवढी गर्दी असते की मोठी लाईन असते दर्शन रांगेत तासंतास उभे रहावे लागते तुम्ही खरेच नशीबवान आहात देवीने तुम्हाला इतक्या जवळ बोलावून दर्शन दिले म्हणजे देवीची कृपा आहे तुमच्यावर.आम्ही फक्त नतमस्तक होऊन त्यांना नमस्कार केला खरच नवल होते ....रद्द केलेले बुकिंग परात मिळणे रविवार असून इतके निवांत दर्शन होणे...खरेच आम्ही देवाचे लाडके आहोत हे असे अनुभव आम्हाला आजपर्यंत असंख्य वेळेस आले आहेतदेवाची कृपा आहे ती अशीच राहू दे 🙏God's Feveret ❤️