त्यांचं नातं त्यानेच संपवलं होत अन कारणही असं होत जे व्हॅलिड नव्हतं.... आज पुन्हा त्याच ठिकाणी ती बसलेली तिथे हा आलेला... जवळजवळ सहा महिने झालेले आज तिला हसतांना पाहुन तिच्या जवळ आलेला तो..
"....मी सोडून गेलो, पण तू सावरलीसच ना ग..." त्याने अगदी तिच्या कडे बघत विचारलं...
"....वाईट वाटतय का, तुझ्या शिवाय सावरलेय कि आनंद होतोय आत्ता जून दुखणं घेऊन रडून नाही दाखवणार तुला याच...?" हिने सुद्धा त्याच टोन मध्ये म्हंटल.
".. अग उलट आनंद होतोय... कस का होईना पण सावरलीस तरी..."
त्यावर मुलगी बळेच हसली...
"....हो सावरले... सावराव लागलं.. कारणं मला मदतीच्या वेळीस मदत करणार कुणी मिळालंच नाही..." हिने उपहासत्मक हसू चेहऱ्यावर आणत म्हंटल.
"...सांग मग कशी वर आलीस... त्रास झाला का.?"
"....त्रास.?" पुन्हा उपहासात्मक हसू चेहऱ्यावर आणत त्याच्याकडे पाहिलं हिने...
"...सांग....."
"....तुला त्याच्याशी काही देणंघेणं आहे का?" त्याच्या प्रत्येक शब्दला सडेतोड उत्तर होतंच हीच.
"...फक्त तू किती सफर केलंस ऐकायचंय मला.. बस..."
"....जेव्हा एखाद माणूस खोल पाण्यात पडत न तेव्हा किनाऱ्यावर असलेल्या आपल्या माणसाने आपल्याला वाचवावं ही शुल्लक अपेक्षा असते, किंबहुना विश्वास असतो कि तो आपला माणूस वाचवेलच... पण हा विश्वास खोटा ठरला कि आपला जिव आपल्यालाच वाचवावं लागतो..खरंय.. अपेक्षा तुटतात, त्रास होतो, चिडचिड होते पण आपल्याला वास्तवाची जाणीव तरी होते... कस का असेना आपल्याला कळत कोण माझं आहे न कोण नाही..."
"....एवढं टोकाचं बोलू नको... मला एक संधी देशील परत येण्याची?"
".....एकदा मरणयातना भोगून आलेय आणि त्यातून खुप कष्टानी सावरतेय तर पाया पडते तुझ्या आत्ता पुन्हा येऊ नकोस... जे माझं नाहीये त्याचा हट्ट सोडलंय मी.. माझा विश्वास, खोटा होता हे सिद्ध झालंय.. या जगात निष्पाप प्रेम करणार कुणी असेल तर ते फक्त आपले आईबाप असतात हे पटलंय मला...त्यामुळे जाईन ती पुढेच मागच्या माझ्या कोणत्याही गोष्टीला आत्ता माझ्या आयुष्यात कणभरही जागा नाहीये.." आत्मविश्वासाने म्हंटल हिने.
"....अग मी नीट करेन सगळं... एकदा संधी देऊन तर बघ.. मी जोडेन तुझं मन..." तो काकूळ तिने म्हणाला..
"... तू जोडणार खरच.? 😂 अरे जोडतात ते जे तुटलय पण माझ्या मनाचा तर चुरा झालंय चुरा. जो ना जोडता येणार ना गोळा करता.. अन करायचा प्रयत्न केला तर तुलाच त्रास होईल... अन शब्दाच म्हणशील तर मला तुझ्याच काय तर तुझ्या मुळे सर्वांच्या शब्दांवरचा विश्वास उडालाय.. जर खरंच माणसं दिलेला शब्द जागत असती ना तर आज तुझ्या बायकोच्या जागी मी असते... अन जो त्रास मी सहन केलंय ती वेळ अली नसती माझ्यावर..." डोळे लाल होत आलेले हिचे आता...
"...आय एम सॉरी.... माफ कर मला.."
"...थोडं लवकरच चुकीची जाणीव झालीय तुला...तसंही तुझ्या सॉरी ने ना माझा तुझ्यावर घालवलेला वेळ परत येणार आहे, ना तुझ्या साठी गाळ लेले अश्रू परत येणार आहेत.. ना तुझ्यामुळे मानसिक झालेला त्रास कमी होणार आहे, मग करू काय तुझ्या सॉरीच..?" हिने जाब विचारावं असच म्हंटल तस...
मला कळतंय मी मोठी चूक केलीये... पण
तस त्याला आपल्या हातानेच गप्प रहाण्याचा इशारा करत.. ".. बस! पुरे झालं आत्ता. नको ते खोटं बोलणं, नको ती नाटक, नको ते न पूर्ण करणारी वचन, नको ते न सत्यातनूतरणार स्वप्न. अरे तुझ्या या निव्वळ टाईमपास मुळे समोर चा ना स्वतःला गमाऊन बसतो, हरवतो, स्वतःला दोषी ठरवतो..एकेक दिवस काढणं कठीण जात.. त्यामुळे बस्स, आता ना तू पाहिजेस ना तुझं प्रेम ना तुझ्या त्या आठवणी....माझ्या आयुष्यात मी खुश आहे... जर मिळाला जोडीदार तर त्याच्या सोबत नाहीतर एकटी पण जिथे मला ठोकर मिळालीये तिथे पुन्हा येन नाही.." अगदी कडक शब्दात बोलली ही आणि उठून निघूनही गेली.. तो मात्र ही गेलेल्या दिशेकडे नजर लावून बसला.. अन आपण सोन्याच्या नादात गमवलेल्या हिऱ्याला आठवून स्वतःच्या नशिबाला दोष देत बसला...
क्रमश..
लेखिका
स्वाती साबळे