कुंकवाच्या शक्तीनंच घडलं ऑपरेशन सिंदूर?
कुंकू..... कुंकूला हिंदू धर्मात विशेष असं महत्व आहे. त्याला सौभाग्याचं लक्षण समजलं जातं नव्हे तर प्रत्येक सणासुदीला महिला वर्ग कुंकू लावून सण साजरे करतांना दिसतात. कुंकू हे स्रियांच्या सौंदर्यातील सोळा श्रृंगारापैकी एक वस्तू आहे. ते विजयाचं प्रतिक आहे. एवढंच नाही तर अगदी विवाह करतांना नवरदेव नवरीच्या भांगात कुंकू भरुन तिचा पत्नी म्हणून स्विकार करतो. असे करतांना स्री आपल्या घरी विजयोत्सव साजरा करते. कारण तिनं आपल्या सौंदर्यानं मोहीत करुन कुणालातरी आणलेलं असतं.
पुर्वी जगात मातृसत्ताक कुटूंब पद्धती होती. ज्यात विवाह झाल्यानंतर एक पुरुष हा स्रियांच्या घरी राहायला येत असे. याचाच अर्थ तो घरजावई बनत असे. परंतु कालांतरानं काळ बदलला व हुशार पुरुषानं अतिशय अक्कल हुशारी वापरुन स्रिला गुलाम करण्यासाठी घरजावई प्रथा बदलवली व तो स्रिला आपल्या घरी घेऊन जावू लागला. मात्र त्याला स्रिया कुंकू का बरं लावतात. हे माहीत नसल्यानं केवळ कुंकवाला सौभाग्याचं लक्षण समजून कुंकू लावण्याची प्रथा तशीच ठेवली.
स्री ही स्वतःच्या माथ्यावर कुंकू लावून घेते. याचा अर्थ ती कुंकू लावण्याला विजयाचं प्रतिक मानते. ज्यानुसार नवरीचे स्वतःला कुंकू लावणे म्हणजे तिनं नवरदेवाला जिंकणे होय. म्हणूनच अलिकडील काळात स्रीने विवाहप्रसंगी आपल्या पतीला जिंकलेले असल्यानं आजकाल पतीचे हुकूम चालत नाही तर स्रियांचेच हुकूम चालतात. तसं पाहिल्यास पुर्वीही काही ठिकाणी मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात असून पतीचं अर्थात पुरुषांचं महिलेसमोर काहीच चालत नसे. त्याचं कारण आहे कुंकू.
कुंकू हे पुर्वी आत्मसंरक्षण म्हणून वापरले जाई. त्यासाठी कुंकू हे गेरु, अस्सल हळद व सापाचे किंवा विंचवाचे विष यापासून तयार केले जायचे. त्याचं कारण होतं आत्मसंरक्षण. कधीकधी स्रिया एकट्या असत. तेव्हा येथीलच पुरुषी समाज तिला एकटं पाहून तिचा विनयभंग करण्याचा वा तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करीत असे. अशावेळेस ती आपल्या कपाळावरील कुंकू बोटाने घेवून प्रेमाप्रेमानं अत्याचार करणाऱ्या पुरुषांच्या तोंडात ते बोट टाकत असे. ज्यातून बलात्कार करणाऱ्या पुरुषांचा मृत्यू होत असे व त्यातून अशा स्रियांची बलात्कारातून मुक्ती होत असे. स्री आपल्या हुशारीनं बलात्कारातून स्वतःची मुक्ती करीत असल्यानं कुंकवाला पुढील काळात विजयाचं प्रतिक म्हणून दर्जा मिळाला. कुंकू एक शक्ती म्हणून उदयाला आलं.
कुंकवाचा शोध हा राक्षस विजयापासून लागला असेल असे वाटते. एखाद्यावेळेस एखाद्या राक्षसावर विजय मिळाल्यावर ती स्री त्या राक्षसाच्या रक्ताचा टिळा आपल्या कपाळावर लावत असे आणि विजयोत्सव साजरा करीत असे. हे रक्त चिलकालबाधक टिकत नव्हतं. त्यामुळं पशूबळी देवून त्यांच्या रक्ताचा टिळा लावण्याची पद्धत सुरु झाली. परंतु दररोज पशूही काफणं सहज शक्य होत नव्हतं. म्हणूनच त्यानंतर स्रियांनी तो विजय चिरकाल आठवणीत राहावा म्हणून मातीचा टिळा लावण्याची प्रथा सुरु केली. असा टिळा लावणाऱ्या स्रियांच्या वाट्याला कोणी जात नसे. कारण तिला शूर स्री मानलं जात असे. पुढं हा टिळा दुरुन दिसत नसल्यानं व तो दिसावा यासाठी हळदीचा टिळा लावण्याची पद्धती सुरु झाली. परंतु हळद ही रंगानं पिवळी असल्यानं ती दिसावी. यावर शोध सुरु झाला. त्यानंतर विचार केल्या गेला की राक्षसांचं रक्त लाल असतं. कुंकवाचाही रंग लाल असावा. त्यानंतर कुंकवाला लाल रंग देण्यासाठी त्यात लाल माती मिसळून त्याचा टिळा लावण्याची पद्धती सुरु झाली. परंतु ती लाल माती पाहिजे त्या प्रमाणात लाल नसायची. पुढे गेरुचा शोध लागल्यानंतर त्यात गेरु मिसळण्याची पद्धत सुरु झाली. त्यानंतर त्यात बरंच संशोधन झालं व आज त्यात बऱ्याच गोष्टी समाविष्ट केल्या गेल्या व आजचा कुंकू तयार झाला.
आज कुंकवाचा वापर सौभाग्याचं लक्षण व सौभाग्य रक्षण म्हणून लेवलं जातं. कोणी कुंकू लावण्याच्या प्रथेला महालक्ष्मीचा आशिर्वाद मानतात तर कोणी त्याला शिवपार्वतीचाही आशिर्वाद मानतात.
पहलगाम हल्ला. हा हल्ला कुंकवासी संबंधीत असून या हल्ल्यात आतंकवाद्यांनी सामान्य माणसांना शिर्षस्थानी घेवून त्यांची हत्या केली. हा भ्याड हल्लाच होता. तसं पाहिल्यास ते आतंकवादी मर्द नव्हते. कारण मर्द गर असते तर ते सैनिकांशी लझले असते. त्यांनी सामान्य माणसांना मारलं नसतंच. तसं त्यांना भारताच्या कुंकवाबद्दल माहित नसेल की भारतीय कुंकूत किती ताकद आहे. ते कुंकवाला मारुन तर गेले. परंतु ज्यांनी कुंकू लावलं होतं. जे कुंकू आज्ञाचक्र जागृत करत असतं. ते मिटल्यानं पुढं जावून हे कुंकू खवळलं. ज्यातून ऑपरेशन सिंदूर झालं व सव्वीस लोकांच्या बदल्यात तब्बल शंढर आतंकवादी मारले गेले. त्यातच पाकिस्तानचीही नशा उतरली. ही शक्तीच आहे कुंकवाची की त्या कुंकवानं आतंकवाद्यांचे नव्हे तर पाकिस्तानचे हालहाल केले. जर कुंकू मिटलं नसतं तर कदाचीत आतंकवाद्यांचा आतंकवादीपणा तेवढा आपल्या भारताच्या निदर्शनास आला नसता. जेवढा आजमितीस दिसला. आज कुंकू मिटवलं गेलं, म्हणून ऑपरेशन सिंदूर घडलं. यापुर्वी कधीच ऑपरेशन सिंदूर घडलं नव्हतं.
महत्वाचं सांगायचं झाल्यास हे कुंकू आहे. भारतात याला विजयाचं प्रतिक मानतात. भारताची शान आहे कुंकू. जर या देशातील तमाम कुंकूधारी भगीनीच्या कोणी वाट्याला गेलं ना. तर ते कुंकू त्याला कधीच सोडत नाही. हा इतिहास आहे. ज्याला कुंकवाचा इतिहास माहित नसेल, त्यानं तो माहित करुन घ्यावा. म्हणजे कळेल की कुंकू खरंच काय आहे ते. मगच कुंकवावरुन वार करावा. स्वतःला बेचिराख करुन घ्यायचे असेल तर. कारण कुंकवात कुणालाही बेचिराख करण्याची ताकद नक्कीच आहे, यात तीळाचीही शंका नाही.
ऑपरेशन सिंदूरवरुन लक्षात येते की भारतात साधी कुंकू न लावलेली नागीण नागराजाला कोणी काही केल्यास त्याला सोडत नाही. मग ही पहलगामची कुंकूधारी महिला होती. जणू नागीणच. ती कशी सोडणार होती. कदाचीत त्यामुळंच ऑपरेशन सिंदूर करता आलं. ऑपरेशन सिंदूर निमित्याने कुंकवात आजही शक्ती आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं नव्हे तर कोणी जर कुंकवावरुन वाट्याला जात असाल तर भष्म व्हाल. हाच संदेश पहलगाम प्रकरणाने दिलेला आहे. मग ती सामान्य जनता का असेना. कुंकू कुंकू असतं, ती माती नाही. हे ऑपरेशन सिंदूरवरुन दिसलं. हे तेवढंच खरं.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०