Even an experience in Marathi Anything by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | एका अनुभव असाही

Featured Books
Categories
Share

एका अनुभव असाही

एका नामवंत कंपनी कडून नॉर्थ ईस्ट टूर बुक केली होती टूर ठीक चालली होती हॉटेल सर्व थ्री स्टार होती पण खाणे पिणे फारसे ठीक नव्हते डोंगराळ भाग असल्याने फार काही पिकत नाही दूध अमूल पॅक महाराष्ट्रातून मागवलेले ताक दही अतिशय बेकार भाज्या फळे फारशा मिळत नाहीत ज्या होत्या त्या पांचट अन्न गडबडीत अर्धे कच्चे शिजवलेले आम्ही टूर च्या गडबडीत तसेच खाऊन बाहेर पडणार कित्येक वेळ ब्रेड चे तुकडे कॉर्न फ्लेक्स यावर भागवले...आपल्यासारखे चवदार जेवण नाही आणि कुठल्या मिठाई पण नाहीत मसाले सुद्धा कोणते वापरत होते कोण जाणेकधी कधी खायला पण नको वाटायचे अन्नाला नावे नको ठेवायला असो ते तरी काय करणार त्यांना जे मिळते ते त्यांच्या पद्धतीने देत होते जायच्या दिवशी देवी दर्शन झाल्यावर ट्रिप चे सगळे मेंबर विखुरलेकुणी मित्रांना भेटायला कुणी शॉपिंगला.. कुणी आणखी काही..टूर लीडर दोघेही कुठेतरी गेले होते मग आम्ही दोघेच दुपारी विमानतळावर पोचलो इमिग्रेशन चे सर्व सोपस्कार झाले आणि आम्ही दोघेच मुख्य टर्मिनल कडे निघालो संपूर्ण ट्रिप मध्ये सर्वांस एकत्र घेऊन जाणारे दोन टूर लीडर तेव्हाच नेमके कुठे गायब होतं कोण जाणे..अशात मला अपघात झाला एका चुकीच्या जिन्यावर आम्ही दोघे चढलो वर गेल्यावर लक्षात आले मग परत खाली उतरलो शेवटच्या चार पायऱ्या उतरताना कशी कोण जाणे मी गडगडत खाली आले आणि डोक्यावर पडलेतरीही मी उठायचा प्रयत्न केला तोपर्यंत casualty कडून खुर्ची घेऊन दोघी नर्स आल्या अहो आणि त्यांनी मला खुर्चीवर बसवले व casualty मध्ये घेऊन गेलेडॉक्टर नी मला झोपायला सांगून एक इंजेक्शन दिले बीपी वगैरे पाहिले सर्व नॉर्मल होते मी चांगली चालत बोलत होते मात्र डोक्याला व बरगड्याला मार लागला होता मला त्या दिवशी सकाळीच थोडे अपचन झाले होते इतकी जोरात पडल्याने तिथेच जोरदार उलटी झाली मग मात्र ते आम्हाला सोडायला तयार होईनात विमानात तुम्हाला काही झाले तर काय करणार. असे म्हणू लागले त्यांनी आमच्या बॅग परत मागवून घेतल्या प्रसंग तसा कठीण होता पण आम्ही दोघेही घट्ट होतो तिला विचारले असता मी तुम्हाला उद्याचे तिकीट देईन पण येथील डॉक्टरचे फिटनेस सर्टिफिकेट लागेल...आम्ही बरेच समजावले की आम्ही लिहून देतो आम्ही आमच्या जबाबदारीवर जातो आहे असे...अहो म्हणाले मी तर एक डॉक्टर आहेपण ती ऐकायला तयार नव्हती परका प्रदेश ओळखीचे कोणी नाही आता इथे निदान एक दिवस तरी काढायला लागणार होता आता कोणत्या हॉटेलला जावे हॉस्पिटल कोणते बघावे...थोडी चौकशी केल्यावर जवळचे एक हॉटेल समजले ताबडतोब सामान घेऊन हॉटेलला गेलो माझे दुखणे वाढले होते डोके आणि बरगड्याना मार बसलेला दुखत होते तातडीने अहो नी त्यांच्या जवळ असलेली औषधे सुरू केली हॉटेलमध्ये एक तासभर झोपून परत तेथील स्वस्तिक हॉस्पिटल येथे गेलो केस पेपर काढला परत माझ्या तपासण्या झाल्या सर्व ओके होते डॉक्टरनी ताबडतोब विमान प्रवासाची हरकत नाही असे सर्टिफिकेट दिले परत हॉटेल वर आलो अहोंनी दिलेली औषधे चालूच होती मी ती घेऊन झोपून गेले मधल्या काळात आम्हा दोघांना काहीच खायची इच्छा नव्हती मला तर कॉफी सुद्धा नको होती आहोनी काहीतरी किरकोळ खाल्ले बरगडी ,डोके दुखत होतेच..फक्त एकाच अंगावर झोपता येत होते मी जी झोपले ती सकाळी आठला उठले आहोनी दिलेले डोस परिणाम करीत होते सकाळी उठले हळुहळू आंघोळ आवरली चहा बिस्किटे खाल्लीरूम बाराला सोडायची होती पण हॉटेल मालकाने तासभर आणखी परवानगी दिली एक वाजता खाली येऊन बसलो आम्ही काहीच खाल्ले नव्हते मग हॉटेल मालकाने लिंबू सरबत करून दिले बाहेरून थोडी केळी मागवून दिली दोन वाजता एअरपोर्ट साठी निघालो सर्व सोपस्कार झाले त्यांनी सर्टिफिकेट चेक केली विमान मुंबईला पोचल्यावर जवळजवळ दीड दिवसानी मी डोसा कॉफी घेतली आता बरे वाटत होते या सर्व काळात टूर लीडर एकदाही फोन करत नव्हते लांबून ग्रुपवर वरवरची चौकशी चालू होती आता मी ठीक आहे थोडाफार त्रास आहे तो होईल हळुहळू कमी आई अंबाबाईच्या कृपेने आणि अहो नी प्रेमाने घेतलेल्या काळजी मुळे व दिलेल्या औषधाने लवकर बरी झाले व सुखरूप आपल्या घरी परत आले या दीड दिवसाच्या काळात अनेक अनोळखी लोकांनी सुद्धा खूप मदत केलीमाझे नशिब व देवाची कृपा म्हणून घडलेल्या विचित्र प्रसंगातून सहिसलामत सुटका झाली अगदी यमदेवाच्या दाराची घंटी वाजवून परत आले म्हणायचे देव न करो ...हा प्रसंग जर दुसऱ्या मेंबर च्या वाटेला आला असता तर खूप भयानक झाले असते असे वाटले इमिग्रेशन च्या वेळी सर्व ग्रुप एकत्र असता आणि टूर लीडर सोबत असता तर कदाचित हा प्रसंग माझ्यावर आला नसता आयुष्यात कधीकधी असे प्रसंग घडतात घडले म्हणायचे आणि पुढे चालू लागायचे देवाचे खूप आभार 🙏