Koun? 28 in Marathi Fiction Stories by Gajendra Kudmate books and stories PDF | कोण? - 28

Featured Books
  • एक अनोखा डर

    एक अनोखा डर लेखक: विजय शर्मा एरीशब्द संख्या: लगभग १५००रात के...

  • Haunted Road

    उस सड़क के बारे में गांव के बुजुर्ग कहते थे कि सूरज ढलने के...

  • वो इश्क जो अधूरा था - भाग 18

    अपूर्व की ऑंखें अन्वेषा के जवाब का इन्तजार कर रही थी। "मतलब...

  • अनकही मोहब्बत - 7

    ‎‎ Part 7 -‎‎Simmi के पास अब बस कुछ ही दिन बचे थे शादी के।‎घ...

  • डायरी

    आज फिर एक बाऱ हाथों में पेन और और डायरी है, ऐसा नहीं की पहली...

Categories
Share

कोण? - 28

भाग – २८

      सावली आता घरून निघून थेट पियुषचा घरी जाऊन पोहोचली होती. तेथे जाऊन तीने तो कागद पियुषला दाखवला आणि म्हणाली, “ पियुष हा नंबर तू तुझ्या सिस्टम वर अपलोड कर आणि हा नंबर कुठे जातो येतो आणि काय कुणाशी बोलतो याची सगळी माहिती मला रेकोर्ड करून दे.” पियुषने सावलीला विचारले, “ हा कुणाचा नंबर आहे सावली.” सावलीने म्हटले, “ ते मी नंतर तुला सांगेन आधी हे काम तू कर. त्याचबरोबर मला अनोळख्या नंबरने कॉल आलेला होता तो नंबर सुद्धा ट्रेस कर मला वाटते नक्की हा नंबर त्या मला फोन करण्याचा असणार ज्याचाबाद्द्ल मला माहिती काढायची आणि जाऊन त्याची कॉलर पकडायची आहे.” सावली यावेळेस एकतर फार आवेशात होती आणि दुसरे तिला कोमलची चिंता होत होती. तर पियुषने सावलीचा सांगण्यावरून ते दोन्हीही नंबर त्याचा सिस्टम मध्ये अपलोड केले. मग सावली त्याला म्हणाली, “ अरे ते तू काल माझ्या फोनमध्ये घरी लावलेल्या कॅमेराची रेकोर्डिंग २४ तास दिसण्याची सेटिंग करून देणार होता ना तर ती सेटिंग आज आणि आताच करून दे.” सावलीचे आजचे ते रूप बघून पियुषला तीला काहीच विचारायचे धाडस होत नव्हते. तो गुमान तीचा म्हणण्याप्रमाणे तसेच करत होता. तीतक्यात सावलीचा फोन वाजला आणि सावलीने तो नंबर बघीतला. तीने ताबडतोब पियुषला इशारा केला आणि पियुषने रेकोर्डिंग सुरु केली आणि पियुष तो नंबर ट्रेस करण्याचा मार्गावर लागला होता.

    सावलीने मग तो फोन उचलला आणि बोलली, “ हेलो कोण बोलता तुम्ही, कोण पाहिजे तुम्हाला.” मग तो व्यक्ती बोलला, “ ऐ शहाणी, जास्त शहाणी बनते काय तू. कसले नाटक करते आहेस तू, माझा फोन उचलत नाही आणि आता अशी बोलून राहिली कि मला आणि माझा आवाज ओळखत नाही.” मग पियुषचा इशारा मिळाल्यावर सावली बोलू लागली, “ माफ करा मी काल तुमचा कॉल उचलला नाही कारण कि मी शुद्धीवर नव्हते. आधल्या दिवशी संपूर्ण दिवस काम करून मी एवढे थकले होते कि माझे अंग अंग दुखू लागले होते. म्हणून मी त्यासाठी औषध घेतले होते. त्यातल्या त्यात माझ्याकडून चुकीने ते औषध प्रमाणापेक्षा जास्त घेण्यात आले आणि मी संपूर्ण दिवस झोपूनच राहिले.” तेव्हा तो व्यक्ती चीढून बोलला, “ मला काय मूर्ख समजतेस काय साली, तुला फार माज आलेला आहे. तुझा तो माज मला उतरवावे लागेल.” मग तो व्यक्ती थोडा अश्लील भाषेत बोलला, “ काय ग छ्मीया तुझे अंग अंग दुखत होते तर औषध घेण्यापेक्षा माझा फोन उचलायचा होता. मी परस्पर येऊन मनसोक्त तुझ्या कांचन कायेची मसाज करून दिली असती. त्याने तुलाही बरे वाटले असते आणि मलाही मजा आली असती.”

     त्याचे ते अश्लील आणि उद्धट बोलने ऐकून सावली म्हणाली, “ अरे नामर्दा तुला माझा समोर येण्याची भीती वाटते म्हणून सारखा लपूनछपून मला फोन करतोस आणि धमक्या देतोस. तू काय माझा अंगाला हात लावशील, माझ्या अंगाला हात लावण्यासाठी तुला फार मोठे काळीज ठेवावे लागेल.” तेव्हा तो व्यक्ती बोलला, “ काय म्हटलेस तू छ्मीया, मला नामर्द म्हणतेस एकदा भेट तू तुला दाखवतो मी माझी मर्दानगी.” आता सावलीला एक युक्ती सापडली होती, तीने त्याला आणखी उत्तेजीत करण्यासाठी त्याचसोबत वेडे वाकडे बोलण्यास सुरुवात केली. ती म्हणाली, “ ठीक आहे तुला तुझी मर्दानगी दाखवायची आहे ना तर सांग कुठे येऊ मी तुला भेटायला. तेव्हा तू दाखव आपली मर्दानगी मला आणि मी पण बघते तुझ्यात किती मर्दानगी आहे म्हणून.” सावलीचा अशा बोलण्याने तो समोरील व्यक्ती आता फारच उत्तेजीत आणि रागात येऊन गेला होता. तो त्याच रागाचा आवेशात बोलला, “ मला चुनौती देतेस तर ठीक आहे मी तुला एक पत्ता पाठवतो आणि सोबत वेळ सुद्धा पाठवतो. तू त्या वेळेस त्या ठिकाणी मला येऊन भेट. आणखी एक गोष्ट लक्षात ठेव येतांना मात्र एकटी ये आणि जर भीती वाटत असेल तर आताच माझी क्षमा मागून घे.”    

    सावलीचा डोक्यावर आता तीचा मानसीक ताण जास्तीच स्वार झालेला होता. त्याचा भारात ती काय बोलते आहे आणि काय करते आहे हे तीला काहीच माहित नव्हते. ती त्याचाच भारात बोलली, “ ठीक आहे मी एकटीच येते मग तुला बघते.” असे म्हणून सावलीने फोन ठेवला. मग पियुषने सावलीला हाक दिली, तो म्हणाला, “ खूपच छान सावली, काय धाडसाने तू त्याला तोंड दिले आणि त्याला जवळ जवळ अर्धा तास बोलण्यात गुंतवून ठेवले. आता हा नंबरच नाही तर हा फोन कुठेही असोत तो आपण ट्रेस करू शकतो.” मग सावली अनभिग्यपणे उत्तरली, “ कसला फोन आणि कसला नंबर, तू काय करतोस इथे.” सावलीचे ते बोलने ऐकून पियुष थोड्या वेळेसाठी आश्चर्यचकित राहिला आणि मग बोलला, “ अग सावली तू माझ्या घरी आलेली आहे आणि .....” अशाप्रकारे त्याने सावलीला संपूर्ण बोलने सविस्तर सांगीतले. आता मात्र सावलीला स्मरण झाले होते कि ती कुठल्या कामासाठी पियुषकडे आलेली होती. पियुष मात्र नजर चुकवून सावलीकडे गोंधळलेल्या नजरेने बघू लागला होता. सावली तीचा विचारात मग्न असतांना सावलीचा फोनवर एक मेसेज आला.

          शेष पुढील भागात.............