फ्लॅशबॅक :
ती रात्री अकरा वाजता घरी पोहचते, तिचं नशीब चांगल म्हणून ती आई आणि बाबा यांच्या आधी घरी आली होती... नाहीतर आज आईचा ओरडा खाण्यापासून तिला कोणी वाचवू शकल नसतं .... ती देवाचे मनात आभार मानते ... आणि डायरेक्ट रूममध्ये पळते....
त्यानंतर: ती कपडे बदलून फ्रेश होऊन बेडवर येऊन झोपी जाते ....
सकाळी १० : ०० वाजता
स्थळ :- कृष्णकुंज
मीरा तिचं आवरून खाली डायनिंग टेबलवर बसते...
बाबा : मीरा काल पार्टीला गेली होतीस कशी होती पार्टी ???
मीरा: मस्त बाबा आणि तुम्हाला माहितीये प्रियाच घर खूप मोठं आहे एकदम राजवाडा ... मी तर पाहून थक्क झाले !!!!
बाबा : असणारं ना बाळा शेवटी माजी खासदार साहेबांचे घर आहे ते ....
मीरा : ते तर पाहिलं मी ...
आई : काय बोलण चाललंय बाप लेकीच ???
मीरा: काही नाही ग आई पार्टी कशी झाली ते विचारत होते बाबा ... त्या विषयी बोलत होतो ....
आई : कशी झाली पार्टी मग ??? आणि रात्री कितीला आलीस???
मीरा : छान झाली ... खूप लोक आले होते पार्टीत , नाच - गाणी, मजा - मस्ती, फुल्ल टू एन्जॉय केली मी ....🥰🥰🥰 आणि रात्री जरा उशीर झाला ग ते पार्टी उशिरा सुरू झाली ना , म्हणून नाहीतर मी वेळेत घरी आले असते ना .... सॉरी ना आई .. ती क्यूट फेस करत बोलते...🥺🥺🥺
आई : व्वा छान !!! काही हरकत नाही पण काल तुला मी पार्टीला जाऊ दिलं ना मग आज पासून 10th ची तयारी सुरू कर ... म्हणजे नंतर लोड होणार नाही... मी तुला अस म्हणत नाही 10-10 तास अभ्यास कर म्हणून रोज दोन ते तीन तास कर बास... इतकंच म्हणत आहे मी , तुला ही तुझ्या बाबा सारखं डॉक्टर व्हायचं असेल तर अभ्यास करायला हवा...
मीरा : मी आजपासून अभ्यासाला सुरुवात करते आणि अगदी मनापासून मी अभ्यास करेन .... I promise you 💞
आई : शहाणं माझं बाळ ते .... मग तू असं कर आजचं तुझ्या अभ्यासाला लागणारे सर्व सामान घेऊन ये ....
मीरा : ओके आई ... आपका हुकूम सर आखों पर ...😁😄😁 मी आजचं जाते आणि मला लागणारं स्टडी मटेरियल घेऊन येते....
*★अनुरागच घर ★*
मृगजळ :- सकाळी १० वाजता
रात्री पार्टी होती त्यामुळे घरात कुणीही लवकर उठल नव्हत सकाळचे दहा वाजले तरी कोणाचा उठायचा पत्ता नव्हता... सर्व जण निद्राधीन होते .... शिवाय अनुराग सोडून त्याला त्याच्या रोजच्या वेळेत म्हणजे सकाळी सात वाजता जाग आली पण रात्री खूप थकल्यामुळे उठून काय करायचं म्हणून बेड वर लोळत पडला होता....
अनुराग (मनात ): चला दहा वाजले उठून अंघोळ करतो आणि जिममध्ये जातो .... तो पर्यंत घरचे सर्वजण उठतील....
तो उठून करतो आणि अंघोळ करून जिम मध्ये जातो ...
एक तास जिम मध्ये व्यायाम करून झाल्यावर तो अकरा वाजता डायनिंग टेबलवर येतो तर घरातले सर्व जण नाष्टा करत होते .....
आई : ये अनु नाष्टा करून घे, भूक लागली असेल ना....
अनुराग : हो आई खूप भूक लागली आहे पटकन नाष्टा दे ....
प्रीतम : दादा तुला आज जिममध्ये जाऊन व्यायाम करायची काय गरज होती का ?? कालचा दिवशी तू पूर्ण थकला होतास ... आराम करायचा ना ....
प्रिया : प्रीत दादा , असं कसं त्याच्या शेड्युल मध्ये बदल करेल तो ... काहीही झालं तरी ही ठरलेल्या गोष्टी पूर्ण करतो तो आपल्या सारखा आळशी नाहीये तो.... 😁
काकी : तुम्हा दोघांनाही हे पूर्णपणे मान्य आहे की तुम्ही दोघं एक नंबरचे आळशी आहात....
प्रिया आणि प्रीतम दोघे पण एकदम बोलतात, हो मान्य आहे आम्हाला ...😄😄😄
तसे घरातले सर्वजण हसायला लागतात....
अनुराग : प्रीत आपण संध्याकाळी फिरायला जाऊ ... खूप दिवस झाले ... सारसबागला जाऊन आज आपण पुणे फिरुया मस्त ....(तो उत्साहित होऊन म्हणाला )
प्रितम: दादा पुण्यात काय फिरायच आम्ही तर रोजचं फिरतो असं.... तुला जायचं तर तू जा मी काही नाही...
मला कॉलेजमध्ये असाइन्मेंट सबमिट करायचा आहे आज सबमिशनची लास्ट डेट आहे....
प्रिया : मी पण नाही बाबा , तुझ तू जा...
अनुराग : ठीक आहे मी अमर सोबत जातो ...
आई : तू जातोयस तर सोबत ऐश्वर्या पण घेऊन जा ना तिला दगडूशेठ गणपतीच दर्शन घ्यायचं आहे ते ही होईल ...
ऐश्वर्या हे ऐकून नाष्टा करत असताना मध्येच थांबली तिने एक नजर प्रीतमकडे पाहिले तर तो काही रिॲक्ट न करता नाश्ता करत होता.... हे पाहून तिला खूप राग आला ती मनातच म्हणाली या गाढवाच्या प्रेमात मी कशी काय पडले काय माहीत ....😡😠😡
अनुराग : अग आई मी अमरला सोबत घेऊन जाणार आहे ... मी हिला कसं सोबत नेऊ....
आई : त्याला काय होतंय , हवं तर तिला गणपती बाप्पाच दर्शन घेऊन घरी पाठवून दे ....
अनुराग: ठीक आहे... तू म्हणतेस तस करतो...
तो नाष्टा करून उठतो आणि त्याच्या रूम मध्ये जातो....
इकडे मीराचं घर " कृष्णकुंज"
मिराचे आई बाबा हॉस्पिटल मध्ये निघून गेलेले होते ती घरात एकटी होती ... आता तिचा me time सुरू झाला होता ....
तिला मराठी इंग्लिश novels वाचण्याचा छंद होता आज तिने एक नवे इंग्लिश novel वाचायला घेतलं होतं....त्याचं नाव होत -- My life next door 🚪
It's about how neighbours fall in love with eachothers... 💗 💗 💗
ती वाचता वाचता असा विचार करू लागली की , माझ्या आयुष्यात असा कोणी येईल का ??? ज्याच्या प्रेमात मी वेडी होईन...
ती नोवेल वाचण्यात इतकी गुंग झाली की सकाळची दुपार कशी झाली तिला कळलं नाही....
दुपारचे दोन वाजता
वंदना काकी तिला बोलवायला आल्या ...
वंदना काकी : मीरा जेवणार नाही का बाळा दुपारचे दोन वाजले, मी जेवण घेऊन आले जेवून घे आणि मग वाचत बसं...
मीरा : थँक यू काकी, मला खूप भूक लागली होती आणि तुम्ही बरोबर वेळेत माझ्या रूम मध्ये जेवण घेऊन आलात ...
वंदना काकी : त्यात thank you काय बेटा... माझं कामच आहे ते ... जेव अजून काही हवं असेल तर आवाज दे ... मी येते
मीरा : ओके काकू ...😊😊😊
ती जेवण करून घेते आणि पुन्हा वाचत बसते ...
स्थळ : मृगजळ
दुपारी चार वाजता
अनुराग बाहेर जाण्यासाठी रेडी होतो....
ऐश्वर्या ही त्याच्यासोबत जाण्यासाठी रेडी होऊन हॉल मध्ये बसलेली असते ....
प्रीतमला जळवण्यासाठी खर तर ती आज अनुराग सोबत चालली होती... पण प्रीतम असा चेहरा करून तिच्या समोर होता की त्याला काही फरक पडत नाही...
अनुराग आवरून खाली येतो ....
अनुराग : आई मी येतोय बाहेर जाऊन ...आणि हो दर्शन झालं की ऐश्वर्याला टॅक्सीने घरी पाठवून देतो ...
आई : अरे ती इतक्या दिवसांनी आली आहे तिला ही तुझ्या सोबत पुणे फिरव ना काय हरकत आहे ती तुझ्या सोबत असेल तर....
अनुराग : बर ठीक आहे... आता आम्ही निघतो ....
तो घराच्या बाहेर जातो , आणि त्याच्या स्पोर्ट बाईक वर बसतो ... ऐशवर्याला बसण्याचा इशारा करतो ती पटकन बसते .... ते दोघे दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला जातात....
इकडे मीरा चार वाजले तरी novel वाचत होती .....
चार वाजता ती उठते आणि फ्रेश होवून चहा घेते त्यानंतर तिच्या लक्षात येत आज तर आईला मी स्टडी मटेरियल आणून अभ्यास करायला सुरू करेन असं सांगितलं आहे ... Novel च्या नादात विसरलेच मी अस म्हणत ती तिचं आवरून घेते आणि ड्रायव्हरला स्टडी बुक्स शॉप मध्ये सोडायला सांगते...
पुढे काय होणार यासाठी वाचत रहा माझिया प्रियाला प्रीत कळेना 💗💗💗