European Highlights - 5 in Marathi Travel stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | युरोपियन हायलाईट - भाग 5

Featured Books
Categories
Share

युरोपियन हायलाईट - भाग 5

 जर्मनी 

अमस्टरडॅमचा निरोप घेऊन जर्मनीत कलोन गावात गेलो. हे ऱ्हाईन नदीच्या तीरावरील सर्वात मोठे गाव आहे .अनेकांचे आवडते परफ्यूम यू डी कलोन याचा उगम इथलाच आहे कलोन याचा अर्थ पवित्र पाणी असा होतो .कोलोन हे बर्लिन , हॅम्बुर्ग आणि म्युनिक नंतर जर्मनीतील चौथे सर्वात मोठे शहर आहे . कोलोन हे शहर ऱ्हाईन नदीच्या दोन्ही बाजूला वसलेले आहे . शहरातील प्रसिद्ध कोलोन कॅथेड्रल हे कोलोनच्या कॅथोलिक आर्चबिशपचे आसन आहे. कोलोन विद्यापीठ हे युरोपमधील सर्वात जुन्या आणि मोठ्या विद्यापीठांपैकी एक आहे, जिथे सुमारे 50000 पेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत. दुसऱ्या महायुद्धादरम्यान मित्र राष्ट्रांच्या विमानांच्या बॉम्बस्फोटासाठी कॅथेड्रलचे जुळे शिखर हे सहज ओळखता येणारे नेव्हिगेशनल लँडमार्क होते. युद्धादरम्यान कॅथेड्रलला हवाई बॉम्बने चौदा धक्के दिले . तेव्हा खूप नुकसान झाले असले तरी ते पूर्णपणे सपाट झालेल्या शहरात सुद्धा घट्ट उभे राहिले.हे कॅथेड्रल तेराव्या शतकापासून बांधतायत . ते मुद्दाम अपूर्ण ठेवतात. सतत रिपेअरींग किंवा नवीन बांधकाम अथवा बदल सुरू ठेवतात. कारण हे पूर्ण झालं तर तो जगाचा शेवटचा दिवस असणार आहे असा समज आहे देश कोणताही असो माणूस म्हणले की  असले समज किंवा अशा अंधश्रद्धा असतातच मग  तो समाज कितीही शैक्षणिक आणि वैज्ञानिक प्रगती केलेला असला तरी या गोष्टी बदलू शकत नाही..हे भलेमोठे चर्च सेंट पिटर कॅथेड्रल चर्च म्हणून ओळखले जाते .इथे दररोज 30000 पेक्षाही अधिक  लोक भेट देतातहे कॅथेड्रल प्रंचंड अवाढव्य आहे  अतिविशाल आणि काळसर रंगाचे  आहे .हे गाथीक शैलीतील चर्च आहे जे उत्तर युरोपातले सर्वात मोठे मानले जाते याला 1996 मध्ये युनेस्को विश्व धरोहर म्हणून घोषित केले आहे आतमध्ये खुप जुन्या काळची ख्रिस्त कालीन चित्रे, रंगीत जुनी ग्लास पेंटिंग पाहायला मिळतात .आठ वाजता कलोनच्या कॅथेड्रलचा घंटानाद होऊ लागला त्याचा आवाज खुप मोठा होता .तेथून जवळच्या छोट्या रस्त्यावर एका इंडियन हॉटेल मध्ये रुचकर जेवण मिळाले .यानंतर दुसऱ्या दिवशी आमची टूर जर्मन स्विस आणि एका बाजुला फ्रांस बॉर्डरवर असलेल्या  ब्लॅक फॉरेस्ट कडे निघाली .१९ व्या शतकापर्यंत, ब्लॅक फॉरेस्ट जर्मन मुख्य प्रवाहापासून तुटलेले होते.  आज मात्र जर्मन लोक त्यांच्या धावपळीच्या कामाच्या जीवनातून तसेच वैद्यकीय आजारांपासून बरे होण्यासाठी येथे येतात  बहुतेकदा जर्मनीच्या उदार सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेद्वारे यांच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च केला जातो.प्राचीन रोमन लोकांना येथील घनदाट जंगल दुर्गम आणि रहस्यमय वाटले, म्हणून त्यांनी त्याला "काळे" म्हटले. आज मात्र जर्मन आणि पर्यटक दोघेही या सर्वात रोमँटिक जर्मन प्रदेशाकडे आकर्षित होतात डोंगरभाग असल्याने गिर्यारोहणाच्या संधी, लोक संग्रहालये, छोटी छोटी  गावे आणि कोकिळा घड्याळांची फॅक्टरी हे सर्व पर्यटकांना आकर्षित करते गाडीतून जाताना रस्त्यात आजूबाजूला चित्रासारखी  लहान टुमदार गावे दिसत होती .अतिशय घनदाट आणि हिरवेगार जंगल इथे आहे .इथे तुम्हाला हिरव्या रंगाच्या अनेकविध छटा पाहायला मिळतात .आजूबाजूला चोहीकडे उंचच्या उंच डोंगर रांगा आणि मध्यभागी खोलात हे जंगल .वृक्षांची गर्दी इतकी घनदाट आहे की दिवसा सुद्धा अंधार पडल्याचा भास होतो म्हणुन सुद्धा ह्याला ब्लॅक फॉरेस्ट म्हणत असावेत आपण खातो तो ब्लॅक फॉरेस्ट केक इथलेच प्रॉडक्ट आहे .इथल्या ड्रुबा गावात कक्कू  (कोकिळा)क्लॉक फॅक्टरी आहे .जेथे ओरिजिनल जर्मन घड्याळे मिळतात .ड्रुब्बा कक्कू क्लॉक फॅक्टरी, टिटिसी इथे असून ड्रुब्बाची स्थापना १९५५ च्या सुमारास जर्मनीतील सर्वात लोकप्रिय सुट्टीचे ठिकाण असलेल्या ब्लॅक फॉरेस्टमध्ये झाली. त्याची सुरुवात टिटिसी सरोवरावर स्मरणिका विकणाऱ्या आणि बोट ट्रिप देणाऱ्या दुकानापासून झाली.सन १७०० पासून इथे घड्याळांची निर्मिती केली जाते .तिथं कक्कू क्लॉकच घर तयार केलं आहे.ते फार प्रेक्षणीय आहे .दर तासाला घड्याळातील कोकिळा बाहेर येऊन टोले देऊन जाते या क्लॉकचे प्रात्यक्षिक म्हणुन प्रत्येक तासाला इथे पाच मिनिटाचा शो दाखवला जातो तो बघण्यासारखा असतो .तसेच वरच्या क्लॉक शॉप मध्ये या घड्याळाचा इतिहास व त्याचे तयार होणे याविषयी तिथल्या सेल्समन कडून छान माहिती दिली जाते .तिथं एक भारतीय रेस्टॉरंट आहे तिथे गरमागरम जेवण आणि सोबत चाट खाऊन ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री चा आस्वाद घेतला .आमच्या एका मैत्रिणीचा त्याच दिवशी वाढदिवस होताअर्थातच हा केक कापूनच तिचा वाढदिवस साजरा झाला आणि संपूर्ण ग्रुपला त्याचा आस्वाद घेता आला इथली पेस्ट्री सुद्धा खुप वेगळ्या चवीची आणि चविष्ट होती---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------