Shri Gajanan Vijay Granth in Marathi Spiritual Stories by Chandrashekhar Parshuram Sawant books and stories PDF | श्री गजानन विजय ग्रंथ

Featured Books
Categories
Share

श्री गजानन विजय ग्रंथ

ll श्री गणेशाय नमः ll      ll श्री हरी ll    
ह.भ.प. संतकवी श्री दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय नामें ग्रंथस्य 
अध्याय पहिला.
श्री गणेशाय नमः ll
जयजयाजी श्री गणेशा l गौरीपुत्रा, मयुरेश्वरा l उदारकिर्ती प्रतापज्योती l जयजयाजी गणपती ll१ll मोठ मोठें विद्वान l साधुसंत आणि सत्पुरुष सर्वच जण l कोणत्याही कार्यारंभी तुझें स्मरण करीत असतात ll२ll तुझ्या कृपेने आणि तुझ्या आगाध शक्ती मुळें l कार्यांत येणारी सर्व विघ्ने जळुन भस्म होतात l दयाघना अग्नी समोर कापसाचा l तो काय निभाव लागणार आहे ll३ll श्री गणेशाच्या मंगल चरणीं l मी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो l देवा, दासगणू च्या मुखातून सरस l अशी काव्यमय पद्य रचना व्हावी ll४ll मी अज्ञानी आणि मंदगती आहे l मला काव्यमय रचना करण्याचे ज्ञान नाही ll५ll  पण देवा तु माझ्या चित्तात वास केल्यास l माझे कार्य सिध्दिस जाईल l
प्रतापज्योती, जयजयाजी गणपती ll६ll मोठ मोठें विद्वान l साधुसंत आणि सत्पुरुष सर्वचजण l कोणत्याही कार्यारंभी तुझें स्मरण करीत असतात ll७ll तुझ्या कृपेने l आणि तुझ्या आगाध शक्ती मुळें l कार्यांत येणारी सर्व विघ्ने l जळुन भस्म होतात ll८ll दयाघना अग्नी समोर कापसाचा तो l काय निभाव लागणार आहे ll९ll श्री गणेशाच्या मंगल चरणीं l मी नतमस्तक होऊन l प्रार्थना करतो देवा, दासगणू च्या मुखातून सरस l अशी काव्यमय पद्य रचना व्हावी ll१०ll मी अज्ञानी आणि मंदगती आहे l मला काव्यमय रचना l करण्याचे ज्ञान नाही ll११ll पण देवा तु माझ्या चित्तात l वास केल्यास l माझे कार्य सिध्दिस जाईल ll१२ll ब्रम्हाची प्रकृती जी आदी माया सरस्वती आहे l कवीवरांची ध्येय मुर्ती l ब्रम्हकुमारी शारदा आहे ll१३ll त्या जगदंबा मातेच्या चरणी l माझे साष्टांग नमन आहे l मी अजाण लेकरू आहे ll१४ll आपण माझा अभिमान धरावास l तुझ्या कृपेची अगाध थोरवी आहे l पांगळा पहाडावर चढतो l तर मुका भर सभेत l अस्खलित व्याख्यान देतो ll१५ll या तुझ्या कीर्तीला l कमीपणा आणुन देऊ नकोस l दासगणूला ग्रंथ रचनेत तु साह्य करावेस ll१६ll हे पुराण पुरुषा l पंढरीच्या पांडुरंगा l सच्चिदानंदा, रमेशा l आपण माझ्या कडे लक्ष द्यावे ll१७ll सर्वसाक्षी जगदाधारा l तु व्यापक चराचरा l सर्वेश्वरा, तुच कर्ता करविता आहेस l तुच तु आहेस या जगतात ll१८ll जग, जन आणि जनार्दन l सगुण निर्गुण l तुच एक परिपूर्ण l माय बाप आहेस ll१९ll पुरुषोत्तमा, ऐसा तुझा आगाध महिमा आहे l जो मोठं मोठ्यांस न कळे l तेथे या गणूचा l काय पाड लागणार आहे ll२०ll असा तुझा अगाध महिमा आहे l जो सर्व सामान्यांना कळतं नाही l पुरूषोत्तमा अरे तेथे या गणूचा काय पाड लागणार आहे ll२१ll श्रीराम कृपा झाली तेंव्हा l माकडांना सुध्दा शक्ती मिळाली होती l यमुना तीरी गोकुळात बालगोपाल l बलशाली झाले होते ll२२ll तुझी कृपा होण्यासाठी l धनदौलत नको आहे l  मनापासून तुझ्या चरणी नतमस्तक होतांच l तुच सर्वांना साह्य करतोस ll२३ll संतांनी डांगोरा पिटला l म्हणून मी तुझ्या दारात आलो आहे l मला आता विन्मुख परत पाठवु नकोस ll२४ll पांडुरंगा आपण माझ्या चित्तात l बसून हे संत चरित्र लिहिण्यास मला साह्य करावे l आणि ग्रंथ कळसास न्यावा ll२५ll हे भवभयांतक भवानीवरा l निळकंठा गंगाधरा l ओंकार रुप त्र्यंबकेश्वरला l माझी विनंती आहे ll२६ll आपण माझ्या डोक्यावर l आपला वरदहस्त ठेवावा l तुझे साह्य असल्यावर l मला काळाचा ही डर नाही ll२७ll भंगार लोखंड परीसाच्या l नुसत्या स्पर्शाने 
सोनं होते ll२८ll तुझी कृपा हाच माझा परीस आहे l मी दासगणू म्हणजे लोखंड आहे l आपण मला साह्य करावे ll२९ll अजिबात दुर लोटु नये l सर्व काही तुमच्याच हातात आहे l तुम्हाला काहीच अशक्य असे नाही ll३०ll  ग्रंथ सुगम होण्यासाठी l माझे भले होण्यासाठी l आपण या लेकरास मदत करावी ll३१ll श्री जगन्माता कोल्हापूरवासीनी l माझ्या कुळाची कुलदेवता l मी तुमच्या पायावर माझा माथा ठेवतो ll३२ll  हे दुर्गे तुळजाभवानी l अपर्णे अंबे मृडानी l दासगणू च्या शिरावर नेहमी l तुझें वरद पाणी असु द्यावे ll३३ll आता मी भगवान दत्तात्रयास वंदन करीत आहे l आपण मला सदैव पावा l आणि श्री गजानन चरीत्र गाण्यास l मला सदैव प्रसादा सहीत स्फुर्ती द्यावी ll३४ll शांडिल्य ऋषी, वसिष्ठ ऋषी l गौतम ऋषीं, पराषर ऋषी l तसेच ज्ञानाच्या आकाशात l जो दिनकर आहे l त्या शंकराचार्यांना माझें नमन असो ll३५ll सर्व संत महंत l यांना माझें नमन असो l आपण सर्वांनी या l दासगणूच्या हाताने l ग्रंथाचे लेखन पुर्णत्वास न्यावे ll३६ll गहिनीनाथ, निवृत्ती l ज्ञानेश्वर, देहुकर तुकाराम l तसेच भवसागरातुन तारणहार करणारे l थोर रामदास स्वामी l या सर्वांना माझे नमन असो ll३७ll हे शिर्डीचे साई समर्था l वामन शास्त्री पुण्यवंता l तुमचा दासगणूस अभय असावा ll३८ll दासगणू हे तुमचे l तान्हे बाळ आहे l तुम्ही कठोर होउ नका l असे बोलणे मी तुमच्याच l कृपेने करीत आहे ll३९ll आपलं नातं l माय लेकराचे आहे l मायच लेकरास l बोलणे शिकविते ll४०ll लेखणीतून अक्षरे निघतात l पण खरेतर तिच्यात l आजिबात जोर नाही l लेखन करण्यासाठी l ती मात्र निमीत्ताने आहे ll४१ll दासगणूची आपणास l प्रार्थना आहे की l मी आपलीं लेखणी आहे l माझ्या कडून आपण सर्व संतांनी l माझ्या रसभरीत ग्रंथाचे l लेखन पुर्णत्वास न्यावे ll४२ll आता आपण सर्वांनी एक चित्ताने l संतकथेचे श्रवण करावे l स्वतः चे कल्याण l करुन घेण्यासाठी l श्रोतेहो आपण सावध व्हावे ll४३ll संत म्हणजे सुनिती ची मुर्ती आहे l संत भव्य कल्याणकारी पेठ आहे l कोणाही संतांनी आजवर l कोणालाही धोका दिलेला नाही ll४४ll तरी ध्यान देऊन आपण l संत चरित्राचे श्रवण करावे lअमोघ ज्ञानाचे गाडे l तेचं असतील जे ईश्वरी l तत्त्वांचे वाटाडे आहेत ll४५ll श्री गजानन महाराजांचे चरीत्र ऐकण्यासाठी l आपण मन स्वच्छ करून लक्ष द्यावे l रुक्मिणी कांत पांडुरंग l त्याला आशिर्वाद देतील ll४६ll आजवर भरतखंडात l बहुत संत झाले आहेत l पण आजकाल देशासाठी l ही एक पर्वणीच आली आहे ll४७ll हे जंबुद्वीप धन्य धन्य झाले आहे l येथे कोणत्याही सुखाची वाण नाही l संत चरण येथे अनादी l काळापासून चालत आलेले आहेत ll४८ll नारदमुनी, ध्रुव बाळ l कयाधू कुमार, उद्धव l सुदामा, सुभद्रा वर l महाबली अंजनी कुमार ll४९ll अजातशत्रू धर्मराज l जगद्गुरू शंकराचार्य l हे जे पतितांचे कल्पतरू l जे आध्यात्मिक विद्येचे l महामेरू आहेत l ते सर्व याचं देशात झाले आहेत ll५०ll मध्व - वल्लभ - रामानुज यांचा l जो ऋणी अधोक्षज l ज्याने आपले सामर्थ्य दाखवुन l धर्मांची लाज राखली होती ll५१ll नरसी मेहता, तुलसीदास l कबीर, कमाल, सुरदास l गौरंग प्रभु यांच्या लीलांचे l वर्णन करावे तरी किती ll५२ll राजकन्या मीराबाई l तिच्या तर भक्तीला पार नाही l तिच्या साठी भगवान l श्रीकृष्णांनी विष सुध्दा l प्राशन केले होते ll५३ll गोरखनाथ, जालंदरनाथ l जे योग योगेक्षवर आहेत l ज्यांचा श्री नवनाथ भक्ती सारं l नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे ll५४ll नुसती हरी भक्ती करून l ज्यांना देव पावला ते l नामा, नरहरी, सन्मती, जनी, कान्होबा ll५५ll संत सखुबाई, चोखामेळा, सावतामाळी l कुर्मदास, दामाजी पंत हे l सर्व पुण्य पुरुष आहेत ll५६ll ज्यांच्या मुळे स्वतः श्री हरी l महार बनुन बेदरास गेला होता ll५७ll मागें महिपती यानी l ज्यांची चरीत्रे गायन केली होती l ते मुकुंदराज जनार्दन बोधला निपट निरंजन ll५८ll ज्यांची चरीत्रे मागे महिपती नी l गायन केली होती, मी सविस्तर इथे देत नाही ll५९ll पण मी नम्रपणे सांगतो l आपण श्री भक्ती विजय l भक्तमाला जरूर वाचा ll६०ll  त्यानंतर त्या संतांनी l जे जे केले ते l मी तीन ग्रंथां मध्ये गायले आहे l ते आपण पहा म्हणजे आपणास कळेल ll६१ll श्री संत गजानन महाराज l हे खरोखरच त्याचं तोडीचे l महान् संत आहेत ll६२ll या अवतारी पुरुषाचा प्रभाव l तर लोकोत्तर खचितच आहे l मी जी श्री संत चरित्रे मागे गायली आहेत l ती मी सारांश रुपाने आपणास सांगितली आहेत ll६३ll माझं सुदैव आहे की मला l हे चरित्र रचण्याचा योग आला l तेच चरीत्र मी आपणास l कथित करीत आहे l तरी आपण सर्वांनी लक्ष देउन ऐका ll६४ll अकोटा जवळ मी l भला हां संत पाहिला होता l आधी माळा ओवतात l नंतर त्यात मेरूम़णी जोडतात ll६५ll  हे चरित्र रचण्याच्या वेळेस l अगदी तसेच झाले होते l वर्हाडात खामगाव तालुक्यात l शेगाव हे एक प्रख्यात गावं आहे ll६६ll
जेथे मोठ्या प्रमाणात l व्यापार चालत होता l गाव तसे लहान l पण वैभव मात्र मोठें होतें ll६७ll श्री स्वामी गजानन महाराज l यांच्या मुळे शेगांव जगात l अजरामर झाले आहे ll६८ll  सरोवरात जसे कमल उमलते l तसेच शेगांवात श्री गजानन महाराज हे l अखिल ब्रम्हांडात l सौरभें वेधिते झाले होते ll६९ll श्री गजानन महाराज l नावाचा हिरा शेगांवात आला l या अवलियाचा प्रभाव l मी मतीमंद सांगत आहे ll७०ll तरी जरा धीर धरा l आपण श्री गजानन महाराजांच्या l चरणी निस्सीम प्रेम धरावे ll७१ll त्यामुळे तुमचा नक्की l उध्दार होईल हे l आपण विसरता कामा नये l श्री गजानन महाराज नावाचा संत आला ll७२ll शेगांव निवासी थोर भाग्याचे l म्हणून संत रत्न श्री गजानन महाराज त्यांना लाभले ll७३ll संत चरण लाभते l जेथे पुण्यवंत राहती l संत हे देवा हुन श्रेष्ठ आहेत l यांत शंका नाहीं ll७४ll पाउस पडताच l पाण्याचा वर्षाव होतो l श्रोते हो अवघें मोर l जसे आनंदाने नाचू लागतात ll७५ll रामचंद्र पाटील यांनी l मला विनंती केली l कार्तिकी च्या वारीला पंढरपुरी यावं ll७६ll माझ्या मनात होते l श्री गजानन महाराज यांच्या l चरित्राचे तेथे गायन करावे ll७७ll पण ते काही l जुळून आले नाही l पुरतता माझ्या इच्छेची करण्यासाठी ll७८ll समर्थांनी रामचंद्र पाटील l यांची योजना केली होती l संतांचे धोरण कोणालाही कळत नाही ll७९ll महापुरुषांच्या आधुनिक जगातात l श्री गजानन महाराज हे l सर्व संतांचे चुडामणी आहेत ll८०ll  महापुरुषांच्या जातीची l कोणाला काही माहिती नाही l ऐतिहासिक द्रष्ट्या l  ते महत्वाचे सुद्धा नाही l जसे ब्रम्हाचा ठिकाणा कोणालाही माहीत नाही l ते ब्रम्हास पाहून l निश्चय करणे असते ll८१ll हिर्याचे तेज पाहून l सर्व मंत्रमुग्ध होतात l हिरा हां हिरा असतो l तो कोठुन आला, कसा मिळाला l हे कोणी विचारत  नाहीत ll८२ll श्री गजानन महाराज हे l ऐन तारुण्यात पदार्पण झालेले असताना l शेगांवात शके अठराशे च्या l माघ वद्य सप्तमीला प्रकट झाले ll८३ll तर कोणी म्हणतात l श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या l सज्जन गडा वरून l श्री गजानन महाराज माऊलीं येथे आले असावेत ll८४ll याला पुरावा असा कांहीच नाही l पण त्यांच्या म्हणण्यात l काही अर्थ असावा ll८५ll नाना यातनांनी गांजलेल्या l भ्रष्ट झालेल्या लोकांना l आधार म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज यांनी ll८६ll  श्री गजानन महाराज यांना l येथे पाठविण्याची योजना केली असावी ll८७ll जगाचा उद्धार करण्यासाठी l श्री गजानन महाराज यांच्या l रूपाने देवानेच अवतार घेतला असावा ll८८ll जगद्गुरू नी नेहमी भुतलावावर l असा अनुभव दिलेला आहे l मानवी रूप घेऊन l योगीराज स्वतः पृथ्वी वर जन्म घेतात ll८९ll गोरखनाथानी उकिरड्यावर l जन्म घेतला होता l कानिफनाथानी हत्ती च्या कानात l  जन्म घेतला होता ll९०ll तर चांगदेव नारायण हे तर l पाण्याच्या डोहात l आई विना प्रकटले होते ll९१ll निश्चितच येथे सुध्दा असेच l काही घडले असावे l श्री गजानन महाराज यांना l योगाची सर्व अंगे अवगत होती ll९२ll हे त्यांनी वेळोवेळी केलेल्या l अनेक लीलांवरून l पुढे कळेलच आहे ll९३ll योगिराज श्री गजानन महाराज l यांचा महिमा अपरंपार आहे l त्याचीं सर कोणालाही l येणार नाही ll९४ll श्री गजानन महाराज शेगांव निवासी l माघ महिन्यात वद्य सप्तमीला l पतीताना तारण्या साठी l प्रकटले होते ll९५ll ती कथा मी सांगतो आहे ती ऐका l
देवीदास नावाचा एक भाविक l शेगांवात रहात होता ll९६ll पातुरकरांचा हा एक सज्जन l वंशज होता l माध्यंदिन शाखेचा हां l मठाधिपती महंत होता ll९७ll त्या दिवशी त्यांच्या मुलाची l ऋतू शांती होती l त्यांच्या घरी भोजनाचा l कार्यक्रम आयोजित केला होता ll९८ll घराच्या अंगणात दारापाशी l उष्ट्या पत्रावळ्या टाकलेल्या होत्या ll९९ll त्याच वेळी श्री सिध्द योगी l तेथे येऊन बसले होते l अंगावर फक्त l जुन्या पुराण्या कापडाची बंडी l आणि पाण्यासाठी एक भोपळा l  बस एवढेच होते ll१००ll बाकी काहीही नव्हते l एक कच्ची चिलीम l त्यांच्या हातात होती l जी कुंभाराच्या भट्टीत l शेकवलेली सुध्दा नव्हती ll१ll प्राचीच्या बाल रवि प्रमाणे l नाका समोर सरळ द्रष्टी  l एकदम शांत मुद्रा होती l त्यांच्या अंगातील l तपोबल झळाळत होते ll२ll मजबूत बांधा आणि गौर  वर्णाचे l शरीर एकदम नजरेत भरत होतें l श्री गजानन महाराज माऊलींचे l वर्णन करावे तरी किती ll३ll मुर्ती अवघी दिगंबर होती l त्यांच्या चेहर्या वरील भाव l मात्र मावळलेला होता ll४ll तेथे बसून त्या टाकलेल्या पत्रावळीं मध्ये l उष्टी शीते शोधत होते l भाताचे एखादे शीतं मिळाले l तर ते तोंडांत टाकतं होते ll५ll अन्न हे परब्रह्म आहे l हा संदेश ते देत होते l उपनिषदे सांगतात lअन्न हेच ब्रम्ह निगुती l अन्नम ब्रम्हेती आहे ll६ll हे पटवून देण्यासाठी दयाघन l तिथे शीते वेचीत होते l पण हे सर्व सामान्य माणसाच्या l कल्पने पलीकडे आहे ll७ll बंकटलाल आगरवाल आपल्या स्नेह्यांच्या l बरोबर चालत असताना l त्यांनी हा प्रकार पाहिला ll८ll त्यांच्या स्नेह्यांचे नांव l दामोदर पंत कुलकर्णी होते l तो प्रकार पाहून दोघेही चकित झाले होते ll९ll हा जो कोणी आहे l तो वेड्या सारखा दिसतो आहे l पण यांची कृती l मात्र विचीत्र दिसतें आहे ll११०ll दोघे एकमेकां बरोबर बोलु लागले l खरेच यांस भुक लागली असती l तर यांनी अन्न मागीतले असते ll११ll देवीदासाने आनंदाने दिलें असते l कारण तो एक सज्जन l आणि दयाळू सद् गृहस्थ आहे ll१२ll तो दारीं आलेल्या कोणत्याही l याचकाला रिक्त हाताने l कधीच परत पाठवत नाही ll१३ll  पण या साधुच्या कृतीचा l काही तर्कच करता येत नाही l आपण येथुन यांच्या l कृतीचा अंदाज घेऊया l असे बंकटलाल पंतांसी म्हणाले ll१४ll खरे साधू या जगात l वरवर पिशा सारखे वागतात l ऐसे व्यासांनी भागवतात लिहिलेले आहे ll१५ll  कृतीतून जरी हे वेडे l दिसत असले तरी l हे कोणी ज्ञानवंत असावेत ll१६ll प्रत्यक्ष हा कोणीतरी ज्ञानाचा पंडित असावा l असे वाटते आहे l असा विचार करत l ते दोघे तेथे च् उभे होते ll१७ll या रस्त्यावर कित्येक लोक येत जात होते l पण कोणालाही माऊली दिसले नाहीत l मात्र या दोघांनी माऊलींना l बरोबर ओळखले हे लक्षात घ्या. ll१८ll रत्नपारखी च् फक्त l रत्नांची पारख करूं शकतात l हिरे आणि गारा  एकत्र असतील l तर रत्न पारखी गार टाकून बरोबर रत्ने निवडुन घेतात ll१९ll प्रथम बंकटलाल आगरवाल पुढे झाला l त्याने माउलींना विनयाने l विचारले, "आपण पत्रावळीं मध्ये l काय शोधत आहात ll१२०ll मला काही कळले नाही l आपणास भुक लागली आहे का l मी आपणास काही l खाण्यासाठी आणून देऊ का ll२१ll काही उत्तर मिळाले नाही l माउलींनी फक्त l दोघांच्या तोंडाकडे वर पाहिले ll२२ll त्यांच्याकडे पाहिले तर भव्य छाती l पिळदार दंड आणि मान l सतेज कांती, द्रष्टी एकदम स्थीर ll२३ll भृकटी ठायी लागली होती l त्या दोघांनी निजानंदी रंगलेला l असा श्री योगीराज पाहिला ll२४ll आणि त्यांनी मनोमन माउलींना वंदन केले l तर त्यांच्या चित्तांत एकदम संतोष वाटला ll२५ll देवीदास बुवांना विनंती केली l ताट वाढून पटकन बाहेर आणा ll२६ll पक्वान्नाने भरलेले ताट बाहेर l दारापाशी महाराजांच्या l समोर आणून ठेवले ll२७ll महाराज समर्थांची स्वारी l भोजनास बसली l ज्यांनी अनुपम ब्रम्ह रस l पिऊन तृप्ती चे ढेकर दिलें आहेत ll२८ll ते गुळवणी मिटक्या मारत l खाणार आहेत काय l सार्वभौम राजाला जहागिरीची ती काय l लालसा असणार आहे ll२९ll आवड निवड अशी काहीच नाही l सर्व पदार्थ एकत्र करून l दोन प्रहरी आपलीं भुक भागवली इतकेच ll१३०ll बंकटलाल पंतांसी l म्हणाले, आपण यांस वेडा समजलो l ही आपली निःसंशय मोठी चूक झाली होती ll३१ll द्वारकेला सुभद्रे साठी l अर्जुन सुध्दा असाच वेडा झाला होता l त्याला सुद्धा व्यवहारांचा l विसर पडला होता ll३२ll आणि भलभलते l चाळे करू लागला होता l हे ज्ञानवंत माउली l मुक्ती रुपें सुभद्रे साठी l वेडे झालेले दिसतात ll३३ll यांची कसोटी l आताचं घेणें नको l शेगांव निवासी l खरोखरच धन्य आहेत ll३४ll श्री समर्थ गजानन महाराज l येथे द्रष्टीस पडले l हे त्यांचे परम भाग्य आहे ll३५ll श्री गजानन महाराज माउलींना l शेगाव हे देवाने l जहागिरी म्हणून दिले आहे ll३६ll त्यावेळी दुपारी l मध्यान्ही लागलें होतें l भुमी उन्हात एकदम l तप्त झालीं होती ll३७ll पक्षी झाडांवर जाऊन l सावलीत आश्रयाला बसले होते l अशा कडक उन्हात l महाराज आनंदात बसलेले होते ll३८ll जे स्वतः साक्षात l परब्रह्म आहेत त्यांना l कसली कडक उन्हाची l परवा असणार आहे ll३९ll श्री स्वामी यथेच्छ जेवले l दोघांच्या लक्षात आले l माउलींना पाणी आणून दिले पाहिजे l "आपणास पाणी आणून देवु काय" ll१४०ll दामोदर पंतानी विचारले l हां चाकर आपणास पाणी l आणून देण्यास तयार आहे ll४१ll असे ऐकल्यावर समर्थ l हसुन म्हणाले l "मी सांगतो ते ऐका, l तुम्हाला जर गरज वाटत असेल l तर मला पाणी आणून द्या ll४२ll या जगात ब्रम्ह l ओतप्रोत भरलेले आहे l तुम्ही आम्ही असा l काहीच फरक नाही l अगदी किंचितहि नाही ll४३ll पण जग व्यवहार l तर सत्य आहे l तो तर पाळलाच पाहिजे ll४४ll अन्न भक्षण केले देहाने I त्याला पाण्याची l आवश्यकता तर आहे ll४५ll हुशार लोकांनी l हा व्यवहार समजला पाहिजे l तुम्ही तर हुशार आहात l तुम्हाला वाटत असेल तर l माझ्या साठी पाण्याची व्यवस्था करावी l म्हणजे हे सर्व संपूर्ण च् झाले ll४६ll असे बोलणे ऐकताच l दोघांना खूप आनंद झाला l बंकटलाल पंतांसी म्हणाले l आपले भाग्य किती थोर आहे ll४७ll  दामोदर पंत पाणी आणायला आंत गेले तेंव्हा l येथे काय झाले ते सांगतो, ऐका ll४८ll त्यांच्या जवळपास l एक पाण्याचा ओढा होता l तेथे पाणी पिण्यासाठी l फक्त जनावरे जात असतं ll४९ll माउली पटकन तेथे l जाऊन ते गढूळ पाणी प्यायले l आणि त्यांनी तृप्तीचा ढेकर दिला ll१५०ll पंत एका भांड्यात l पाणी घेऊन आले l तर माउलींना गढूळ पाणी l पिऊन आलेले पाहून म्हणाले ll५१ll अहो ते गढूळ पाणी l पिण्यासाठी नाही l तुम्ही ते पाणी पिऊ नका l ते पाणी जनावरांन l साठी ठिक आहे ll५२ll मी आपणास गोड, निर्मळ आणि थंडगार पाणी l पिण्यासाठी आणले आहे l त्यात वाळ‌ घालून l एकदम स्वच्छ केलेले आहे ll५३ll ते ऐकून समर्थ माउली म्हणतात l या सर्व व्यवहारिक कथा l आम्हाला सांगु नका l हे अवघं चराचर ब्रम्ह व्यापक आहे ll५४ll येथे गढूळ आणि निर्मळ l किंवा शुध्द आणि दुषीत l पाणी असे भेदभाव नाहीत l पाणी तर पाणीच असते ll५५ll गढूळ पाणी किंवा निर्मळ पाणी l सुवासिक आणि दुर्गंधीयुक्त l ही तर निःसंशय त्यांची रुपें आहेत ll५६ll मनुष्या मध्ये सुद्धा l काही फरक नसतो l ईश्वराच्या लीला आगाध आहेत ll५७ll हे मनुष्याला समजण्यास l कठीण आहे l त्याचं मन व्यवहारांत गुंतलेले आहे l त्यानं थोडं मनन करावे ll५८ll  जग कशाला उत्पन्न झाले l कशा पासून उत्पन्न झाले l हे समजून घेतले पाहिजे ll५९ll ऐसे ऐकल्यावर l दोघेही गहिवरून गेले l मनात अनन्य भावाने l समर्थांच्या पाया वर ll१६०ll लोळण घेण्यासाठी l तयार झाले तर l त्यांच्या मनांतील विचार जाणून ll६१ll माउली वायुच्या वेगाने पळत सुटले l या जगात त्यांना कोण l अडवणार आहे  l कोणाच्यात हिंमत आहे l बघता बघता माउली नाहीसे झाले ll६२ll 
या पुढील कथा l द्वितीय अध्यायांत आहे l ती ऐकण्यासाठी l आपण इथे लक्ष द्यावे l श्री गजानन विजय ग्रंथ l भाविकांना आनंद देवो l हीच हात जोडून l ईश्वराच्या चरणी दासगणूची विनंती आहे ll६३ll 
श्री हरीहरार्पणमसतु l शुभंभवतु l
इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 
प्रथमोsध्याय समाप्त ll१६४ll 
चंद्रशेखर परशुराम सावंत 
अहमदाबाद, गुजरात.
१२/०७/२०२५