If we can maintain the traditions... in Marathi Classic Stories by Ankush Shingade books and stories PDF | जर आपण संस्कार टिकवू शकलो तर.....

Featured Books
  • उजाले की ओर –संस्मरण

    स्नेहिल नमस्कार मित्रों को ताज़ा व बरसों पुराने संस्मरण का म...

  • काली रात

    "कभी-कभी अंधेरे में वो नहीं छुपा होता जिससे हम डरते हैं, बल्...

  • His Puppet - 1

    Chapter 1देहरा दून, शाम का वक्त ... ।एक करीब 21 साल की लड़की...

  • लाल बैग - 4

    Chapter 4: सुबह का सन्नाटासुबह हो चुकी थी।दरवाज़े की घंटी लग...

  • ईश्वर गाँव में रहता है

    एक बार एक शहर के संत ने अपने शिष्य से कहा,"जाओ, ईश्वर को ढूं...

Categories
Share

जर आपण संस्कार टिकवू शकलो तर.....

जर आपण संस्कार टिकवू शकलो तर........

            काही मुलं निश्चीतच वात्रट स्वभावाची असतात. हा वात्रटपणा अगदी लहानपणापासूनच मुलांमध्ये भरलेला दिसतो. परंतु त्यावेळेस ते बाळ लहान असल्यानं त्याकडे दुर्लक्ष करुन आपण सोडून देतो. परंतु तो वात्रटपणा जसजसे मुल मोठे होवू लागते. तसतसा वाढत जातो. त्यातच असा वात्रटपणा वाढला की तो त्यांच्या आईवडिलांच्या जिव्हारी लागत असतो.
        मुलं लहान असतात. ती चांगली वागत नसतात. तेव्हा त्यांचं वागणं पाहून आईवडिल व शेजारी यांना मनस्ताप वाटत नाही. परंतु ती जेव्हा मोठी होतात. तरुण होतात. तेव्हा मात्र खुद्द त्यांच्या आईवडील व शेजारी पाजारी यांना त्यांचा मनस्ताप वाटत असतो. कारण त्यांचं वात्रट वागणं. तसं वात्रट वागण्यानं खुद्द आईवडीलच नाही तर शेजाऱ्यांनाही त्रासच असतो. ज्यातून आईवडील सारखे तीळ तीळ तुटत असतात. ज्यातून त्यांच्या सुखाच्या आयुष्याचं रुपांतरण दुःखात होत असतो. 
         आपलं वागणं असं असावं की कुणाचं आयुष्य वाढेल. विशेष म्हणजे आपल्या आईवडिलांचंच आयुष्य वाढेल. परंतु काही मुलं ही आईवडिलांना मनस्ताप देण्यासाठीच जन्माला येतात की काय? असंच सारखं वाटायला लागतं. कधीकधी आईवडिलांना असं वाटतं की अशा लेकरांना विनाकारणच जन्माला घातलं. त्यांना लहानपणीच मारुन टाकलं असतं तर बरं झालं असतं. परंतु ती मुलं मोठी झाल्यानं ते शक्य होत नाही. कधीकधी मुलांच्या त्रासानं आईवडिलांनाच आत्महत्या कराविशी वाटते. 
        विशेष म्हणजे आज संस्कार नाही. संस्कार तुटत चाललेले आहेत. त्याचं कारण आईवडिलांपासून दूर राहणारी मुलं. मुलं ही उच्चशिक्षण शिकतात व उच्चशिक्षीत बनतात. ती डॉक्टर, इंजिनिअर बनतात. तशीच ती मोठमोठी पॅकेज घेवून दूर अंतरावर नोकरीला लागतात. ज्याठिकाणी मायबाप ताबडतोब पोहोचू शकत नाहीत. त्या मुलांना भेटायचंच असेल तर खुद्द मायबापांनाही फोन करुन जावं लागतं. एवढी मुलं मोकळी सुटलेली असतात. अशी नोकरी करणारी मुलं दूर अशा ठिकाणी स्वतःमध्ये संस्कार ठेवून वा बाळगून वागत नाहीत. ही मुलं एकटी असतात व हीच मुलं आपला एकटेपणा घालविण्यासाठी मित्र पकडतात. ज्या मित्रत्वात ती मुलगी असेल तर ती मुलाला मित्र बनवते व तो मुलगा असेल तर मुलीला मित्र बनवतो. त्यानंतर त्यांचं मोबाईलवर बोलणं सुरु होतं. व्हाट्सअपवर चॅटिंग सुरु होते. त्यातच वात्रट व अश्लील बोलणंही सुरु होतं आणि एवढंच नाही तर एकमेकांना बागेत भेटणं. एकमेकांचे अश्लील फोटो घेणं. बागेत बसतांना एकमेकांच्या गळ्यात गळे टाकून बसणं. रस्त्यारस्त्यावर चुंबन घेत वावरणं. ज्यांना समाजही काही म्हणू शकत नाही. अन् समाजानं काही म्हटल्यास अशी मुलं त्यांचाच भर रस्त्यावर अपमान करुन टाकतात. मग कोण म्हणायला जाणार अशा मुलांना. ही शोकांतिकाच आहे. 
         आजचे बगीचे अशाच मुलामुलींच्या टोळक्यांनी भरलेले आहेत. बागेत नंगे नाच सुरु आहेत. पुण्यातील गोष्ट जर घेतली तर तिथे फिरायला जाणं पर्यटकांना कठीण होवून बसलंय. चांगले सुसंस्कृत लोकं आपल्या इवल्याशा मुलांना, खास करुन मुलींना घेवून अशा ठिकाणी फिरायला जावू शकत नाहीत. खास करुन किल्ल्याच्या ठिकाणी. कारण किल्लेही अशा मुलांनी अश्लील वर्तनांनी सडवलेले असून चांगल्या सुसंस्कृत पालकांना भीती वाटतेय की त्यांची मुलं कधीकाळी एखादा प्रश्न आपल्या आईवडिलांना विचारणार तर नाही ना की बाबा, ही मुलं त्या झुडपात काय करीत आहेत? असा प्रश्न आईवडिलांना विचारल्यास विचार असा येवू शकतो की त्या मुलींच्या प्रश्नांवर काय उत्तर द्यावं. ही अश्लिलता सुट्टीच्या दिवशी जास्तच असते.
           तरुण तरुणींची ही अश्लिलता. या अश्लितेनं केवळ बागबगीचेच भरलेले नाहीत, तर काही महाभागांनी खास करुन हेरीटेज बांधलेले आहेत. अर्थात किल्ल्याच्या जवळपास होटल बांधलेले आहेत. याच नंग्या नाचातून हवा तसा व हवा तेवढा पैसा कमविण्यासाठी. सुट्टीच्या दिवशी हे हेरीटेज भरलेलेच असतात. एकदोन तासासाठी या. अमूक अमूक एवढं शुल्क द्या. काम करा व निघून जा. बदल्यात त्यांना जेवनखावणही मिळत असतं. ज्याचे शुल्क होटल मालकांना द्यावे लागतात. यात होटल मालकांचा पुष्कळ फायदा होत असतो. कारण काही काही होटल मालक आपल्या होटलात येणाऱ्या मुलामुलींचा गुप्त कॅमेरे लावून व्हिडिओ बनवीत असतात व ते विकून पैसा कमवीत असतात. हे मिडीयाच्या माध्यमातून कधीकधी दिसतच. आज मुलांनी विचार करावा की आपण आपल्या आईवडिलांपासून वेगळे असतो. आपल्या आत्मनिर्भरतेचा विचार करुन आपल्या आईवडिलांनी आपल्याला दूर अशा ठिकाणी पाठविलेलं असंत. त्यांनाही विचार असतो की आपलं मुल आत्मनिर्भर बनावं. त्यालाही आपल्थाशिवाय जीवन जगता यावं. आलेल्या संकटावर त्यालाही मात करता यावी. कारण तेवढ्या दूर संकट आल्यास आईवडील काही क्षणातच धावून जाणार नाहीत. 
         मुलांना ते कळतं. त्यासाठीच ते मित्र पकडत असतात. समजा संकट आलंच तर अशा मित्रांनी मदत करावी हा त्यामागील उद्देश असतो. परंतु जेव्हा अशा मित्रत्वात शरीरसुखाची मागणी होते. तेव्हा हा उद्देश विफल होतो. कारण कोणतेच मायबाप काही मुलांना अशा अश्लीलतेच्या हरकती करण्यासाठी दूर अशा ठिकाणी पाठवीत नाहीत. ते मुलांना लहानपणापासूनच संस्कार शिकवितात. संस्कारानं वागणं शिकवतात आणि मुलांनीही संस्कारांनीच वागणं शिकावं. आपण दूर जरी राहात असलो तरी. ते मित्रासमवेत बागेत फिरणं ठीक आहे. परंतु त्या बागेत मित्रासमवेत फिरत असतांना एकमेकांच्या गळ्यात गळे घालून आपण बसत असल्यास ती वाईट गोष्ट आहे. तसं करायला आपल्या आईवडीलांनी पाठविलेलं नसतंच. शिवाय आपण जर रस्त्यावर एकमेकांचे चूंबन घेत असू वा होटलमध्ये एकदोन तासासाठी जात असू, तर ती वाईट गोष्ट असते. ज्यात आईबाप साक्षीदार नसले तरी तिथंच अस्तित्वात असलेला विधाता पाहात असतो. जो आपण केलेल्या पापाची शिक्षा आपल्याला देतो. म्हणूनच अशा प्रेमप्रसंगातून झालेले विवाह फारकाळ टिकत नाहीत. ते तुटतात. कारण आपल्या आईवडीलांना असे विवाहापुर्वीचे बागेत फिरणे माहित नसते. त्यातच बागेत अश्लील अवस्थेत बसणेही माहित नसते. आपले विवाहापुर्वी लपून चोरुन होटलमध्ये एक दोन तासासाठी जाणे माहित नसते. तसेच आपले विवाहापुर्वी रस्त्यावर चुंबन घेणे, ह्या क्रिया प्रक्रिया माहित नसतात. ज्या आपल्या क्रिया प्रक्रियातून आपण आपल्या आईवडिलांना फसवत असतो. 
         विशेष सांगायचं झाल्यास असंच सांगता येईल की आपलं तरुणपणात आईवडिलांची संमती न घेता प्रेम करणं, त्यातच अश्लील हरकती करणं हे आपलं वात्रट वागणंच आहे. आपल्या आईवडिलांनी आपल्यावर विश्वास ठेवून दूर अशा ठिकाणी आपल्याला आत्मनिर्भर बनता यावं म्हणून ठेवलेलं असतं. अशावेळेस आपण जर आपल्या आईवडिलांचा विश्वासघात करुन दूर अशा ठिकाणी एकमेकांच्या प्रेमात फसून अश्लील हरकती करीत असतो. त्यावेळेस आपल्याला माहित असतं की आपल्याला कोणीच पाहात नाहीत. परंतु विधाता आपल्यावर बारिक लक्ष ठेवून असतो. तोच आपल्या आईवडिलांच्या आडून केलेल्या आपल्या कृत्याची पुढेमागे शिक्षा देतच असतो. ज्यातून आपण पौढे विवाहबद्ध झालो तरी आपल्या संसारात विघ्न येतं. कारण आपला विवाह कुठंतरी आपले संस्कार मोडून झालेला असतो. आपण आपल्यातील वात्रटपणानं आपल्यातील असलेल्या संस्काराला तोडलेलं असतं. म्हणूनच बागेत फिरण्याची वा होटलात जाण्याची बाब का असेना, तरुणपणात तशा गोष्टीचं आकर्षण वाटणारंच. आपण त्याचा तेवढा मोह न बाळगता आपल्यावर केलेले बालपणीचे संस्कार टिकवावेत. त्याच संस्कारानं वागावं. आपल्या आईवडिलांचा विश्वास तोडू नये. त्यांचाही विश्वासघात करु नये. जेणेकरुन त्यातून आपलं पुढील आयुष्य हे चांगलं ऐश्वर्यसंपन्न अवस्थेत कापता येईल. त्यात विघ्न येणार नाही. संकटं तर कोसो दूर पळवायला मार्ग सापडेल हे तेवढंच खरं. जर आपल्यात असलेला पुर्वाश्रमीचा संस्कार आपण टिकवू शकलो तर.......

                अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०