प्रिन्सी तर झोपली होती ! पण आम्हा दोघांना झोप येत नव्हती . कारण हे दोघे कधी असे उशिरा नव्हते आले ... मनन ची आई सतत मला सांगायची ... अहो ! कुठे आहेत ते बघा ? इतका उशीर झाला त्यांना ? मी म्हणायचो असूदे ! एक दिवस त्यांना जरा वेळ देऊ दे! एकमेकांना ! येतील ते थोड्यावेळात ! उगाच त्यांना सारखं कॉल करून त्रास नको द्यायला !
त्या रात्री आम्ही त्या दोघांची खूप वाट पाहिली ..वाट पाहता पाहता सूर्य समोर येऊन उभा राहिला होता . पण हे दोघं काही घरी आले नाही . आमच्या दोघांची काळजी खूपच वाढली होती. काही करावं आम्हाला काही सूचेनासे झाले होते. आम्ही दोघेही वाट पाहत पाहत अगदीच डोळ्यांमध्ये काळजी आणि अश्रू आणून रोखून होतो आणि स्वतःच्याच मनाला स्वतः समजावत होतो की काहीतरी कारणास्तव उशीर झाला असेल... येतील .... ते ...येतील...! येतील ...!
असं करून आम्ही त्यांची वाट पहात बसलो होतो . रात्रभर एकमेकांना फक्त आधार... खोटा आधार आणि खोटी समजूत आम्ही देत होतो !
काही वेळातच माझ्या फोनवर एक फोन आला . नंबरही सेव नव्हता ! आम्हाला वाटलं कदाचित या दोघांचा फोन लागत नसावा किंवा नेटवर्कमध्ये नसावा... स्विच ऑफ असावा चार्जिंग संपली असावी ...असे अनेक गोष्टींचे विचार मनात आणून तो फोन मी उचलला ! फोन पोलीस स्टेशन मधून होता... पोलीस स्टेशन मधून फोन हे ऐकताच मी खाली बसून गेलो ! पोलिसांचं बोलणं सुरु झालं... तुम्ही मनन आणि दीपा यांना ओळखता का ? त्यांच्या फोन मध्ये तुमचा नंबर सापडला ! तुम्ही जर त्यांना ओळखत असाल तर तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये या! तुम्ही आलात तर आम्हाला ही मदत होईल... शेवटी म्हणाले , आपण आता भेटल्यानंतरच बोलू ! तुम्ही ताबडतोब या! असं म्हणून पोलिसांनी फोन ठेवून दिला!
त्यांनी तर त्यांचं म्हणणं पूर्ण केलं होतं पण मला समजून चुकलं होतं मी काहीही न बोलता निशब्द फोन ठेवून दिला होता ! हि फक्त माझ्याकडे एकटक पाहत होती आणि सतत विचारत होती... कोणाचा फोन आहे ? काय म्हणत आहे ? कोणाचा फोन आहे ? आणि मी फोन ठेवल्यानंतरही म्हणाली ...अहो कोणाचा फोन होता ...तुम्ही बोलले का नाही... तुम्ही काही बोलले नाही.... माझ्याकडे द्यायचा ना फोन ... मी बोललो असते काय झालं आहे? तुम्ही काही सांगणार का ? असे बरेच प्रश्न ती मला सतत विचारत होती ! तिच्या एकही प्रश्नाचा उत्तर माझ्याकडे तेव्हा नव्हतं ! मी फक्त इतकंच म्हणालो," पोलीस स्टेशन मधून फोन आला होता, आपल्याला ताबडतोब तिकडे बोलावलं आहे! तु प्रिन्सी सोबत घरी थांब.... मी जाऊन येतो ! माझं हे म्हणणं ऐकून तीही घाबरली .. माझ्या जवळ आली आणि माझा हात पकडून म्हणाली ..' काय झालं आहे , पोलीस स्टेशनमध्ये का बोलावलं आहे ? हे दोघे ठीक तर आहेत ना ? ' मी तिच्यावर चिडून म्हणालो...' आता हे तिथे गेल्याशिवाय मला कसं कळणार ? पोलिसांनी फक्त मला तिथे बोलावलं आहे , त्या दोघांच्या फोन मध्ये तुमचा नंबर सापडला फक्त इतकंच म्हणाले .. हे ऐकल्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकली. तीही खाली पडली ! अक्षरशः जमिनीवर कोसळली आणि रडू लागली आणि म्हणाली ,'काय झालं माझ्या मुलांना ! कुठे आहे ते? सुखरूप्त आहेत ना ? थांबा तुम्ही एकटे जाऊ नका ! मी ही प्रिन्सिला घेते ..आपण एकत्र जाऊया ! मी तुम्हाला एकट्याला नाही सोडू शकत आता !
प्रिन्सीला झोपेतूनच उचलून घेऊन आम्ही दोघेही पोलीस स्टेशन कडे निघालो .. पोलीस स्टेशनमध्ये पोहोचताच , मी गडबडीमध्ये विचारू लागलो दीपा आणि मनन कुठे आहेत?
एक पोलीस इन्स्पेक्टर त्यांच्या खुर्ची वरून उठून आमच्या जवळ येऊन उभा राहिला . ( मला हात लावून म्हणाला ) या बाबा.. या इकडे बसा ...त्यांनी आम्हाला दोघांनाही खुर्ची दिली बसण्यासाठी ! आणि म्हणाला तुम्ही दीपा आणि मनन चे कोण आहात ? मी म्हणालो, ' आम्ही मननचे आई वडील आहोत आणि दीपा ही आमची सून ! तितक्यात पोलीस पुढे म्हणाले, ठीक आहे बाबा ! हे पाणी घ्या ! मी म्हणालो पाणी वगैरे काहीही नको ! आधी आमची मुले कुठे आहेत ते सांगा ! पोलीस म्हणाले , ते दोघेही आता या जगात नाही ! त्यांच्या गाडिचा रात्री अपघात झाला आहे ! अपघात नक्की कसा झाला याचा तपास सुरू आहे. हे ऐकून आमच्या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली होती. ज्या गोष्टीची आम्हाला भीती होती तीच आमच्या समोर येऊन उभी राहिली होती ! ही तर जोरात रडू लागली होती पण मी रडू ही शकत नव्हतो ...मी फक्त प्रिन्सिचा विचार करत होतो ! कारण त्या मुलीला आता तिचे आई-वडील यानंतर कधीच दिसणार नव्हते आणि इतक्या लहान वयामध्ये तिने तिच्या आई-वडिलांना गमावलं होतं... ज्या वयामध्ये तिची त्यांच्यासोबत ओळख होणार होती... त्याच वयासोबत मध्ये तिने आई-वडिलांची ओळख गमावून बसली होती !
प्रिन्सीचा तो केवीळवाणी झोपेतला चेहरा पाहून माझा जीव कासावीस झाला होता !
या मुलीला झोपेतून उठल्यानंतर काय सांगावे ..तिचे मम्मी-पप्पा कुठे आहेत ! तिला जरी स्पष्ट बोलता येत नसलं... तरी ती तिच्या मम्मी पप्पांची व्यवस्थित वाट बघत असतं आणि तिला कळत ही होतं की ते कधी घरी येणार ...ते किती वेळाने घरी येणार ...आता तिला समजावून सांगणे आणि तिचं म्हणणं आमच्यासमोर व्यक्त करणे हेही कठीण होत.... तिला तिच्या भाषेत समजावणे कठीण होत.... आता हे सगळंच आमच्यासाठी खूप कठीण होतं ...म्हणून आम्ही तो शहर सोडून दुसरीकडे म्हणजेच इथे राहण्यासाठी जायचे ठरवले.. आम्ही तर पुढे तपासाची ही चौकशी केली नाही आणि कोणत्याच प्रकारचे चौकशी केली नाही फक्त प्रिन्सिसाठी आम्ही एखादी जागा सहा सहा महिन्यांत सोडून दुसरीकडे राहण्यासाठी जात आहोत !!!
आजी आजोबांच्या डोळ्यांमध्ये पाणी होते आणि आमच्या दोघांच्याही !!!
खूप वाईट झालं होतं ! प्रिन्सी सोबत आणि तिच्या आई-वडिलांसोबतही आणि तिच्यासोबत झालेली घटना ही आजी-आजोबांनाही आयुष्यभर त्रास देणारी होती.. ते दोघेही या घटनेतून सावरलेले नव्हते !!